खेळामुळे शिस्त लागून एकाग्रता वाढते

0
20

नगर – प्रत्येकाने किमान एक तास मैदानी खेळ खेळावा. खेळामुळे सकारात्मक हार्मोन्स तयार होऊन तुम्ही आनंदी राहता. खेळाच्या माध्यमातून शिस्त लागते, एकाग्रता वाढते. अपयश पचविण्याची ताकद निर्माण होते असे प्रतिपादन बालरोग तज्ञ डॉटर श्याम तारडे यांनी केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या बाई इचरजबाई बाई फिरोदिया प्रशालेच्या वार्षिक
खेळ मेळावा संस्थेच्या रुपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर पार पडला. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात सहभागी होऊन आपले क्रीडा कौशल्य दाखवले. विद्यार्थ्यांचे ध्वजसंचलन, तसेच त्यांनी
सादर केलेली कवायत लक्षवेधी ठरली. डॉ. तारडे म्हणाले की, या पुढील काळात जागतिक पातळीवरती स्थूलता ही गंभीर समस्या निर्माण होण्याची शयता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार सुमारे २.७ कोटी
स्थूल बालके राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थूलतेमुळे रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, नैराश्य यासारखे अनेक दीर्घ आजार सुरू होतात असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सिसोदिया यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वैभव वाघ यांनी करून दिला. कार्यक्रमाची माहिती विशाल तांदळे यांनी दिली. सूत्रसंचालन शकुंतला देसरडा व कांचन नेहुल
यांनी केले. सविता शेळके यांनी आभार मानले. पालक हे मुलांचे आदर्श आहेत. पालकांनीही खेळासाठी वेळ द्यावा. दोन वर्षापर्यंतच्या मुलांना मोबाईल नकोच. मुलांनी एक तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही मोबाईल यासारख्या साधनांचा वापर करू
नये असेही डॉ. तारडे यांनी सांगितले.