—, शके १९४५ शोभननामसंवत्सर,पौष शुलपक्ष, श्रवण १२|४९
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक. वाहने व उपकरणे सावकाश चालवावीत.
वृषभ : शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील. व्यापारात नवीन लाभदायी करार होतील.
मानसिक शांति मिळेल. अध्यात्मिक क्षेत्राकडे आपण आज वाटचाल कराल.
मिथुन : कामे अपुरी राहतील. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. अनपेक्षित फायदा करून देणार्या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल.
कर्क : खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल. निश्चितेने काम करा. चांगली बातमी मिळेल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता.
सिंह : कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे. मागील उधारी उसनवारी वसूल होईल.
कन्या : आपल्या विवेकबुध्दीच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. खिशाला आर्थिक झळ बसण्याचा संभव आहे.
तूळ : आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्यांवर थोपू नका. वेळेच महत्व समजा.
वृश्चिक : आई-वडीलांची चिंता सतावेल. कार्यालयातील सहकार्यांकडून मार्गदर्शन मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. कामे कौशल्यपुर्ण करावी लागतील. वाहन व गृहखरेदीसाठी चांगला दिवस.
धनु : आपली वैचारिक पातळी चांगली ठेवा. वडीलोपार्जित मालमत्तेचे व्यवहार मार्गी लागतील. भाऊबंद डोके वर काढण्याची शयता आहे. जुन्या गुरुजन वर्गाची भेट होईल. पत्नीकडून सहकार्य मिळेल.
मकर : खूप दिवसांपासून नियोजित राहिलेले काम आज मार्गी लागेल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. वाहने व उपकरणे
सावकाश चालवा. मागील केलेले संकल्प आज पुर्णत्वास येतील.
कुंभ : पितृचिंता सतावेल. धाकट्या भावंडांची शैक्षणिक चिंता राहिल. दिवस कालच्या दिवसाइतका आनंदी जाणार
नाही. अनेक प्रकारच्या अडचणी संभवतात. हितशत्रुंकडून त्रास संभवतो.
मीन : गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल. इतरांची देणी आपण परत कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. कार्यालयातील वरिष्ठांची मर्जी संपादन केल्यास कामातील समस्या दूर होतील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.