सल्ला

0

* दही लावताना जर त्यात थोडीशी
तांदळाची पेज घातली तर दही चक्क्यासारखे
घट्ट होते.

वास्तू

0

झपाट्याने प्रगती होण्यासाठी

* हिंस्त्र पशूंची चित्रे घरात लावणेही
वास्तुशास्त्रीय दृष्टीने अशुभ, प्रगतीविरोधी
मानले आहे.
* कुटुंबाची झपाट्याने भरभराट
होण्यासाठी, प्रगतीच्या संधी प्राप्त होण्यासाठी
घराच्या उत्तर दिशेस पाण्याचे किंवा झर्‍याचे
चित्र/छायाचित्र लावावे. उत्तर दिशेस फिश
एक्वेरियम ठेवणे किंवा कासवाचे चित्र/
छायाचित्र लावणेही लाभदायक ठरते.

सुरकुत्या

* संत्रा, लिंबूच्या साली सुकवून
पावडर बनवावी. त्यात मध, मलाई एकत्र
करून चेहऱ्यावर लावावे. रुक्ष त्वचा मुलायम
होईल व सुरकुत्या नाहीशा होतील.

संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

नवरा : माझ्या छातीत खुप दुखायला लागलय,
ताबडतोब ॲम्ब्युलन्सला फोन लाव
बायको : हो लावते, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा!
नवरा : राहू दे, थोड बरं वाटतय आता

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

बढाई अंगाशी आली 

एका गावातील एक माणूस बरीच वर्षे प्रवासाला गेला होता. अनेक ठिकाणी प्रवास करून तो आपल्या गावी परतला. आपण प्रवासात किती गमती-जमती, किती मौज-मजा पाहिल्या, ते तिखट-मीठ लावून तो आपल्या शेजारी लोकांना, भेटे त्याला सांगू लागला. एकदा तर त्याने एक लोणकढी थाप ठोकून दिली. म्हणाला, “मी करणावतीला गेलो असता तेथील माणसे चांगली पंधरा-सोळा हात उंच उड्या मारीत असलेली पाहून मला मोठे नवल वाटले. मग त्यांनी अशी उंच उडी मारण्याची पैज माझ्याशीच लावली. तेव्हा मी इतकी उंच उडी मारली की, त्यांच्यापैकी कोणालाही माझी बरोबरी करता आली नाही.” ऐकणारी माणसे मनात म्हणत, काय थापाड्या आहे! उघडपणे कोणीही त्याचे म्हणणे मान्य करीत नसे; म्हणून तो वेगवेगळ्या शपथा घेऊन लोकांची खात्री पटवायचा प्रयत्न करीत असे. एकदा असाच तो अशी थाप जमलेल्या लोकांसमोर मारू लागला असता घोळयातील एक माणूस उठला आणि म्हणाला, “अरे, अशा शपथा कशाला घेतोस? त्यापेक्षा तशीच उडी येथे मारून दाखव ना!” हे ऐकताच तो बढाईखोर माणूस गप्प बसला आणि त्याने तेथून काढता पाय घेतला. तात्पर्य ः आपण पाहिलेल्या काही घटना फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते; पण कधी-कधी त्यांची फजितीही होते.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

अपघात का होतात?

दुसर्‍यांनी अपघात केला की ‘फार जोरात गाडी चालवतो’, ‘लक्षच नसतं समोर’, ‘ओव्हरटेक करत असेल’, ‘तिघांना घेऊन लूना चालवावीच कशाला?’ ‘लायसेन्स कसे काय मिळाले कोणाला माहीत’ असे अनेक उद्गार ऐकायला मिळतात. दुसरीकडे ‘रस्त्यावर चिखल होता’, ‘स्पीड ब्रेकर आहे, पण त्याबद्दल सूचनाच नाही’, ‘केवढे खड्डे आहेत रस्त्यावर’, ‘बाजूला चालणारा माणूस एकदम मध्ये आला’ यातील एखादे स्पष्टीकरण दिले जात असते. यावरून अपघात का होतात, याचा थोडा अंदाज आपल्याला येतो. गाडी चालवणारा, वाहने व रस्ते या तिन्हींमुळे अपघात होऊ शकतात. खूप वेगात गाडी चालवणे,ओव्हरटेक करणे, खूप ताणतणाव, अतिश्रम, जागरण, मद्यपान व इतर व्यसने, गाडीचे ब्रेक नीट नसणे, गाडीची देखभाल व्यवस्थित न करणे, तांत्रिक अडचणी निर्माण होणे, रस्ता खराब असणे, पुरेसा उजेड नसणे, हवामान चांगले नसणे, खूप पाऊस, वावटळ, रस्त्यावर खड्डे असणे, स्पीड ब्रेकर अयोग्य जागी असणे, रस्त्यावर प्राणी असणे, एकाच रस्त्यावर पादचारी, हातगाड्या, बैलगाड्या, ट्राम, बस, ट्रक अशी सर्वच प्रकारची वाहतूक असणे; अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात. मद्यपान हे अपघातामागील महत्त्वाचे कारण आहे. रस्त्यावरील अपघातांपैकी ३० ते ५०% अपघातांचे कारण मद्यपान हेच असते. काही जणांमध्ये अपघात होण्याची शयता इतरांहून जास्त असते. धांदरटपणा, वेगाची आवड व दुसर्‍या वाहनाला पुढे जाऊ न देण्याची वृत्ती; यामुळंही अपघात होतात. भारतात दरवर्षी ६०,००० लोक रस्त्यावर होणार्‍या अपघातात मरण पावतात. “टाळता येत नाही तो अपघात” वा “देवाच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालणार” अशा विचारांमुळे ‘अपघात टाळता येतात’ या सत्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होऊ शकते. उपरोक्त सर्व कारणांबाबत योग्य ती काळजी घेतल्यास अपघातांचे प्रमाण बरेचसे कमी करता येईल. योग्य ती काळजी घेऊन काम केल्यास घरगुती अपघात व उद्योगधंद्याच्या ठिकाणातील अपघातही कमी करता येतील.

हसा आणि सातायुशी व्हा !

गण्या : मला तुमच्या मुलीशी लग्न करायचयं
मुलीचा बाप : तुझी कमाई किती?
गण्या : ११ हजार
मुलीचा बाप : मी तिला महिना १० हजार रुपये फक्त पॉकेट मनी
म्हणून देतो
गण्या : ते धरुनच सांगितलं….

चेहरा तजेलदार होण्यासाठी

चेहरा तजेलदार होण्यासाठी

* एक कप दूध चांगलं आटवावे. दाट झाल्यावर एक लिंबू पिळून दूध थंड करावे.
रात्री झोपताना ते चेहऱ्यावर लावून चोळावे. रात्रभर लावून ठेवावे. सकाळी धुवून घ्यावे.
यामुळ

* मसूर डाळ बारीक वाटून दुधात घुसळून घ्यावी आणि चेहऱ्यावर लावावी. १०
मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. आठवडाभर हा उपाय सकाळ-संध्याकाळ करावा.

म्हैसूर पाक

0

म्हैसूर पाक

साहित्य : ३ लहान वाट्या ताजे बेसन, ३ वाट्या साखर, ५ वाट्या तूप, वेलदोडे पूड अर्धा चमचा, थोडे बदाम काप.

कृती : २ मोठा चमचा तूप डाळीच्या पिठाला चोळा व मंद गॅसवर थोडे भाजा. दुसरीकडे २ वाट्या पाणी व ३ वाट्या साखरेचा पाक करा. त्यात भाजलेले बेसन घाला व घोटा. दुसऱ्या गॅसवर तूप गरम करत ठेवा.दर २ मिनिटांनी ३ मोठे चमचे गरम तूप बेसनात घालत राहा. साधारण १ वाटी तूप उरेपर्यंत तूप घालून हलवत राहा. बेसनाचे मिश्रण चौकोनी
ट्रेमध्ये घालून हलवा. म्हणजे सगळीकडे सारखे पसरेल. आता पातेल्यात उरलेले १ वाटी गरम तूप पूर्ण म्हैसूरपाकावर ओता असे केल्याने जाळी छान पडते.

मेथ्यांमुळे रक्तदाब होतो कमी

0

मेथ्यांमुळे रक्तदाब होतो कमी

मेथ्यांमुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांना फायदा होतो. रक्तदाबाचे वाढलेले प्रमाण कमी होऊन कालांतराने गोळ्यांचे डोस कमी करता येतात. मेथ्यांमुळे त्वचेवर येणारी मुरुमे कमी होऊन त्वचेचा तजेला वाढतो. मेथ्यांमुळे त्वचेवर येणारी मुरुमे कमी होऊन त्वचेचा तजेला वाढतो. मेथ्यांमुळे आरोग्यप्राप्ती होते.