दैनिक पंचांग शुक्रवार, दि. २६ जानेवारी २०२४

वत्सर, पौष कृष्णपक्ष, पुष्य १०|२८ सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित कराल. मागील वर्षीची शिल्लक असलेली कामे होतील.

वृषभ : मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल.

मिथुन : प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च होईल.

कर्क : व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. व्यापार-व्यवसायिकांना दिवस संमिश्र. शत्रूंपासून दूर राहा.

सिंह : काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांचा पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल.

कन्या : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल.

तूळ : कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा.
भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय आहे.

वृश्चिक : एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. देवाण-घेवाण टाळा. आपले धाडस वाढेल.

धनु : आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. आर्थिक उन्नति होईल. आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील.

मकर : एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आपली प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे.

कुंभ : प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील.

मीन : आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक नुकसानाची शयता आहे. कामांची गती मंदावेल. शांत रहा.

                                                                                     संकलक ः अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

फॅमिली डॉटर म्हणजे काय ?

खरे तर हा प्रश्न विचारावा लागणे म्हणजेच
वैद्यकीय व्यावसायिक व समाज यांच्यातील पारंपरिक
नात्यात बिघाड झाल्याचे लक्षण होय. पूर्वी बारा
बलुतेदारांसारखाच तेरावा डॉटर असायचा. या
डॉटरांची व तुमच्या कुटुंबाची वर्षानुवर्षा-पासूनची
ओळख असायची. स्नेहबंध असायचे. डॉटरांना
घरातील सर्व व्यक्तींची इत्यंभूत माहिती असायची.
त्या व्यक्तींना कोणकोणत्या वयात काय काय रोग
झाले, अपघात झाले याची सर्व माहिती असायची.
या डॉटरांना घरातील सर्वच वडीलधार्‍यांप्रमाणे मान
देत. बारीकसारीक रोगांपासून ते गंभीर रोगांपर्यंत
सर्वच बाबींसाठी डॉटरांचा सल्ला घेतला जाई.
त्यांनी सांगितल्यास, सुचवल्यास मगच तालुयाच्या
वा जिल्ह्याच्या ठिकाणच्या मोठ्या दवाखान्याकडे
रुग्णाला नेले जाई. असे हे ‘फॅमिली डॉटर’ सर्वच
विषयात तज्ञ असत. घसा बसला काय, डोळे आले
काय, टायफॉईड झाला काय किंवा बाळंतपण असले
काय त्यांच्याकडे सर्वांसाठी उपचार असत. बरे, फी
देखील कमी. औषधेही दवाखान्यातच तयार करून
पुड्या बांधून देत असत. एवढे असून डॉटरांना
पोटापाण्याला कमी पडत नसे. शेतकरी गहू/ तांदूळ
देत. इतर माल देत. मानसन्मान वेगळाच. अशा या
डॉटरांनाच ‘फॅमिली डॉटर’ म्हणतात.
आज मात्र समाजातील मूल्यांची घसरण,
धंदेवाईकपणा, पैशात सर्व काही मोजण्याची प्रवृत्ती,
पैसा हेच सर्वस्व आदी गोष्टींमुळे या सुरेख संकल्पनेचा
पूर्ण बोजवारा उडालाय. त्यामुळे वैद्यकीय सेवा प्रचंड
महागलीय. वैद्यकांचा धंदा खूप स्पर्धात्मक झालाय,
विशेषज्ञाचे अमाप पीक आलेय. उच्चशिक्षित डॉटर
वाढले तरी सर्व लोकांना मात्र त्याचा फायदा होऊ
शकत नाही. डॉटरांवरचा लोकांचा विश्वास, आदर
कमी झालाय. त्यामुळे ती सेवाही आता ग्राहक
संरक्षण कायद्याअंतर्गत आणण्यात आली आहे.
सर्व गोष्टींना डॉटर व समाज हे दोन्ही सारखेच
जबाबदार आहेत.
यावर उपाय काय? फॅमिली डॉटर या
व्यवस्थेचे समाजात पुनरुज्जीवन करणे व तिचा
विकास करणे हाच या समस्येवरचा परिणामकारक
व कायमस्वरूपी उपाय होय

आरोग्यदायी वेलची

0

आरोग्यदायी वेलची
जेवण झाल्यावर थोडीशी वेलची चघळावी. वेलचीच्या सेवनामुळे पोट साफ होण्यास मदत
होते. वेलची खाल्ल्यामुळे भूक चांगली लागते. वेलची चावून खाल्ली, तर अ‍ॅसिडीटी दूर होते,
शिवाय जळजळही थांबते.

सुविचार

पुस्तके म्हणजे जागृत देवता आहे. त्यांची सेवा करून त्वरित वरदान मिळवता येते.

लाल भोपळी मिरचीची चटणी

0

लाल भोपळी मिरचीची चटणी

साहित्य : अर्धा किलो लाल भोपळी
मिरच्या, पंधरा-वीस बेडगी मिरच्या, दोन
वाट्या टोमॅटोच्या फोडी, अर्धी वाटी चिंचेचा
कोळ, एक मोठा चमचा जिरं, पाव वाटी तेल,
तीन मोठे चमचे उडदाची डाळ, चिमूटभर
मेथीची पूड, मीठ, चवीला साखर.
कृति : तेल तापवून त्यात जिरे आणि
उडदाची डाळ घालावी. डाळीचा रंग गुलाबी
झाला की मेथी आणि मिरच्यांचे तुकडे घालून
परतावे. त्यात टोमॅटो घालून परतावे. आपण
वांगी भाजतो तशा लाल भोपळी मिरच्या
गॅसवर भाजाव्या आणि गरम असतानाच
पेपर नॅपकीनमध्ये गुंडाळून दोन-तीन मिनिटे
ठेवाव्या. नॅपकीननंच त्यांची साल पुसून
काढावी.
टोमॅटो, भोपळी मिरचीचे परतलेले
तुकडे, मीठ, साखर घालून मिसरमध्ये
चटणी वाटावी.

वास्तू

0

असे झोपावे
आपले बेड असे ठेवा की आपले डोके
दक्षिणेकडे वा पूर्वेकडे राहील. पश्चिमेकडे
डोके करून झोपणे टाळा.

सल्ला

0

शिजवताना जास्त तेल घातल्यास
व जास्त वेळ जाळावर ठेवल्यास भाज्यांची
पौष्टीकता नष्ट होते.

तेजस्वी त्वचा

* बदाम, गुलाबाची फुले, चारोळी
व उगाळलेले जायफळ रात्री दुधात भिजवा.
सकाळी वाटून त्याचे उटणे बनवा. यामुळे
चेहर्‍यावरील डाग नाहीसे होऊन त्वचा तेजस्वी
होते.
* लिंबाचा रस आणि खोबरेल तेल
केसांना लावण्याने कोंड्यापासून आराम
मिळतो.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

अंधुक दृष्टी असणार्‍या एका आजोबांची काळी टोपी जोराच्या वार्‍याने उडाली.
ते बिचारे टोपीमागे धावू लागले,
तेवढ्यात जवळच्या चाळीतील खिडकीतून एक बाई ओरडली,
“अहो बाबा, काय पाहिजे तुम्हाला?”
आजोबा : “मी माझी काळी टोपी शोधतोय.”
बाई : “ती टोपी नाही, तुम्ही माझ्या काळ्या कोंबडीच्या मागे
मघापासून पळताय.”

दैनिक पंचांग गुरुवार, दि. २५ जानेवारी २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष शुलपक्ष, पुनर्वसु अहोरात्र
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकार्‍यांपासून लाभ मिळेल. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.

वृषभ : महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.

मिथुन : राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. काम व इच्छित योजनेला अमलात आणावे.

कर्क : कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. शांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा.

सिंह : नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील.

कन्या : आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.

तूळ : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. आरोग्य नरम-गरम राहील. व्यापारय्व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. मागील उधारी वसुल होईल.

वृश्चिक : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपले काम धाडसाने करा. काही नवीन संधी मिळतील. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील.

धनु : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. लांबचे प्रवास टाळा.

मकर : आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे. आपण जे करण्याची इच्छा
ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

कुंभ : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. घरातील
वातावरण आनंददायी राहील.

मीन : गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील.

                                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.