मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
15

फॅमिली डॉटर म्हणजे काय ?

खरे तर हा प्रश्न विचारावा लागणे म्हणजेच
वैद्यकीय व्यावसायिक व समाज यांच्यातील पारंपरिक
नात्यात बिघाड झाल्याचे लक्षण होय. पूर्वी बारा
बलुतेदारांसारखाच तेरावा डॉटर असायचा. या
डॉटरांची व तुमच्या कुटुंबाची वर्षानुवर्षा-पासूनची
ओळख असायची. स्नेहबंध असायचे. डॉटरांना
घरातील सर्व व्यक्तींची इत्यंभूत माहिती असायची.
त्या व्यक्तींना कोणकोणत्या वयात काय काय रोग
झाले, अपघात झाले याची सर्व माहिती असायची.
या डॉटरांना घरातील सर्वच वडीलधार्‍यांप्रमाणे मान
देत. बारीकसारीक रोगांपासून ते गंभीर रोगांपर्यंत
सर्वच बाबींसाठी डॉटरांचा सल्ला घेतला जाई.
त्यांनी सांगितल्यास, सुचवल्यास मगच तालुयाच्या
वा जिल्ह्याच्या ठिकाणच्या मोठ्या दवाखान्याकडे
रुग्णाला नेले जाई. असे हे ‘फॅमिली डॉटर’ सर्वच
विषयात तज्ञ असत. घसा बसला काय, डोळे आले
काय, टायफॉईड झाला काय किंवा बाळंतपण असले
काय त्यांच्याकडे सर्वांसाठी उपचार असत. बरे, फी
देखील कमी. औषधेही दवाखान्यातच तयार करून
पुड्या बांधून देत असत. एवढे असून डॉटरांना
पोटापाण्याला कमी पडत नसे. शेतकरी गहू/ तांदूळ
देत. इतर माल देत. मानसन्मान वेगळाच. अशा या
डॉटरांनाच ‘फॅमिली डॉटर’ म्हणतात.
आज मात्र समाजातील मूल्यांची घसरण,
धंदेवाईकपणा, पैशात सर्व काही मोजण्याची प्रवृत्ती,
पैसा हेच सर्वस्व आदी गोष्टींमुळे या सुरेख संकल्पनेचा
पूर्ण बोजवारा उडालाय. त्यामुळे वैद्यकीय सेवा प्रचंड
महागलीय. वैद्यकांचा धंदा खूप स्पर्धात्मक झालाय,
विशेषज्ञाचे अमाप पीक आलेय. उच्चशिक्षित डॉटर
वाढले तरी सर्व लोकांना मात्र त्याचा फायदा होऊ
शकत नाही. डॉटरांवरचा लोकांचा विश्वास, आदर
कमी झालाय. त्यामुळे ती सेवाही आता ग्राहक
संरक्षण कायद्याअंतर्गत आणण्यात आली आहे.
सर्व गोष्टींना डॉटर व समाज हे दोन्ही सारखेच
जबाबदार आहेत.
यावर उपाय काय? फॅमिली डॉटर या
व्यवस्थेचे समाजात पुनरुज्जीवन करणे व तिचा
विकास करणे हाच या समस्येवरचा परिणामकारक
व कायमस्वरूपी उपाय होय