दैनिक पंचांग गुरुवार, दि. २५ जानेवारी २०२४

0
82

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष शुलपक्ष, पुनर्वसु अहोरात्र
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकार्‍यांपासून लाभ मिळेल. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.

वृषभ : महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.

मिथुन : राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. काम व इच्छित योजनेला अमलात आणावे.

कर्क : कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. शांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा.

सिंह : नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील.

कन्या : आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.

तूळ : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. आरोग्य नरम-गरम राहील. व्यापारय्व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. मागील उधारी वसुल होईल.

वृश्चिक : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपले काम धाडसाने करा. काही नवीन संधी मिळतील. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील.

धनु : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. लांबचे प्रवास टाळा.

मकर : आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे. आपण जे करण्याची इच्छा
ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

कुंभ : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. घरातील
वातावरण आनंददायी राहील.

मीन : गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील.

                                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.