पायाला कांदा लावून झोपणे फायदेशीर

0

पायाला कांदा लावून झोपणे फायदेशीर

कांद्यातील अँटी बॅटेरिअल आणि अँटी वायरल तत्त्वांमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत
होते. रात्री झोपताना पायमोजे घालून त्यात कांद्याच्या चकत्या ठेवण्याने शरीरातल्या घातक
जिवाणूंचा आणि किटाणूंचा नाश होतो, तसेच रक्तशुद्धी साधते. कांद्यामधील फॉस्फरिक अ‍ॅमसिड
रक्तामध्ये शोषलं जातं आणि रक्तशुद्धी होते. कांद्याच्या उग्र वासामुळे खोलीतील हवा शुद्ध
होतेच पण पायाची दुर्गंधीही नाहिशी होते. याने घातक रसायनं आणि विषारी तत्त्व शरीराबाहेर
टाकण्यास मदत होते.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

लहान मुलांना व स्त्रियांना दाढीमिशा का नसतात?

स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात
असणारी वेगळी जननेंद्रिये, पुरुषात पूबीज कोष
शरीराच्या बाहेरच्या भागात, तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज
कोष ओटीपोटात असतात. पौगंडावस्थेत वा वयात
येत असताना मेंदूच्या नियंत्रणाखाली मुलांमध्ये
टेस्टेस्टेरॉन, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टरॉन
हे हॉर्मोन्स स्रवायला सुरुवात होते. या हॉर्मोन्समुळे
मुलामुलींमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात.
त्यांच्या पूबीज व स्त्रीबीज कोषात पुनरुत्पादनासाठी
आवश्यक असणारी पूबीजे (शुक्राणू) व स्त्रीबीजे
(अंडी) अनुक्रमे तयार होतात.
दुय्यम लैंगिक लक्षणांत आवाज फाटणे, कंठ
फुटणे, काखेत व जननेंद्रियांवर केस येणे यांचा
समावेश मुले-मुली दोहोंत होतो. मुलींमध्ये स्तनांची
वाढ होते. मेदाचे साठे वाढतात. मासिक पाळी सुरू
होते. मुलांमध्ये दाढी- मिशा येऊ लागतात. बिजाची
निर्मिती होऊ लागते.
मुला-मुलींमध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स स्रवत
असल्याने मुलींना दाढी-मिशा येत नाहीत, तर
मुलांमध्ये स्तनांची वाढ होत नाही. एक लक्षात
घ्यायला हवे की, मुलींमध्ये टेस्टोस्टेरॉन असतो,
पण तो अत्यंत अल्प प्रमाणात असतो व मुलांमध्येही
अत्यल्प प्रमाणात इस्टोजेन असतो. काही वैगुण्यामुळे
वा विकारांमुळे या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढल्यास
मुलींमध्ये दाढी-मिशासारखी पुरुषी लक्षणे, तर
मुलांमध्ये स्तनांची वाढ होण्यासारखी बायकी लक्षणे
दिसून येतात.

सुविचार

परिश्रमातच मनुष्याची माणुसकी आहे.

खांडवी

0

खांडवी

साहित्य : १ वाटी तांदळाचा रवा,
१ वाटी साखर किंवा गूळ, आले कीस २,
३ चमचे, २ वाट्या नारळाचे दूध, पाव चमचा
वेलदोड्यांची पूड, तूप, चिमूटभर मीठ, थोडा
रोझ इसेन्स किंवा गुलाबपाणी
कृती : तांदूळ धुऊन कपड्यावर
पसरून वाळवावे. नंतर त्यांचा रवा काढावा.
तुपावर रवा चांगला भाजून घ्यावा. नारळाच्या
दुधात साखर विरघळून घ्यावी. दुधाला उकळी
आली की त्यात वाटलेले आले, मीठ व
भाजलेला रवा घालावा इसेन्स व वेलदोड्यांची
पूड घालावी. चांगले ढवळून झाकण ठेवावे.
गॅस मंद ठेवावा. नंतर बाजूने थोडे तूप सोडून
ढवळावे व तूप लावलेल्या थाळीत घालून
थापावे. वरून थोडे ओले खोबरे घालून थापावे.
गार झाल्यावर मोठ्या वड्या पाडाव्यात.

सल्ला

0

मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढावी
यासाठी तुळशीची पाने ५ ते १० रोज स्वच्छ
धुवून खाण्यास द्यावी.

आवळा, रिठा व शिकेकाईची पेस्ट

आवळा, रिठा व शिकेकाईची पेस्ट
बनवून केसांना लावा व नंतर धुवा-अ‍ॅलोव्हेरा
जेल केसांना १५ मिनिटं लावून ठेवा व नंतर
धुवा.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

सर : ‘त्याने भांडी घासली’ आणि ‘त्याला भांडी घासावी लागली’ या
दोन वायात काय फरक आहे?
गण्या : ‘पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे आणि दुसर्‍या वाक्यात
कर्ता विवाहीत आहे.

दैनिक पंचांग बुधवार, दि. २४ जानेवारी २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष शुलपक्ष, पुनर्वसु अहोरात्र
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : आपणास गरज असेल तेव्हा कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग
मोकळा होईल.

वृषभ : मित्रांचे सहकार्य मिळेल. कार्यात सहकार्यांचा सहयोग मिळेल. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील.

मिथुन : आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला संताप येईल, असे कही बोलू नका. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ मिळेल.

कर्क : कामात व्यस्तता अधिक असल्यामुळे आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू शकतो. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील.

सिंह : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात.

कन्या : प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा एखादी प्रणयपूर्ण संध्याकाळ आपल्यासाठी आनंदायक असेल.

तूळ : आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. शत्रूंपासून सावध राहा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक : व्यापार-व्यवसायात देवाणय्घेवाण टाळा. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही.

धनु : शत्रूंपासून सावध राहा. व्यापारय्व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. मुले त्रास देऊ शकतात. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.

मकर : आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक आणि अर्थपूर्ण होण्याची शयता आहे.

कुंभ : एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या येण्याची शयता. नोकरदार मंडळींनो
काळजीपूर्वक काम करा.

मीन : काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. काम व इच्छित योजनेला अमलात आणावे.

                                                                                  संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

विषारी दारू पिल्याने लोकांचे मृत्यू का होतात?

सूरा पिऊन दिल्लीत शेकडो लोक मृत्यूमुखी
पडले. मुंबईतही विषारी दारूमुळे लोक बळी पडले.
अधूनमधून वृत्तपत्रात विषारी दारूच्या बातम्या येतच
असतात. विषारी दारू म्हणजे काय व ती पिल्याने
लोक का मरतात, ते आता पाहू.
सामान्यपणे ज्या दारूचा पिण्यासाठी उपयोग
केला जातो, त्यात एथाईल अल्कोहोल असते.
दारूमुळे व्यसन लागते व इतर अनेक तोटे होतात.
नशा येते, अपघात होऊ शकतात व गुन्हेगारी प्रवृत्ती
वाढतात. हे खरे असले तरी, रक्तातील एथाईल
अल्कोहोलचे प्रमाण जोपर्यंत दर शंभर मि.ली.त
४०० ते ५०० मि.ग्रॅ. इतके वा त्याहून जास्त होत
नाही, तोपर्यंत मृत्यू येण्याची शयता कमी असते.
याउलट विषारी दारू अल्प प्रमाणात प्यायली
तरी मृत्यू येतो. विषारी दारू म्हणजे मिथाईल
अल्कोहोल. मळी वा लाकडाच्या विघटनापासून
हे अल्कोहोल तयार होते. वैद्यकशास्त्रात वापरल्या
जाणार्‍या स्पिरीटचा कोणी पिण्यासाठी वापर करू
नये, म्हणून त्यात मिथाईल अल्कोहोल टाकतात.
तरीही मद्यपी स्पिरीटही पिण्यासाठी वापरतात व
विषबाधा होते. मिथाईल अल्कोहोल ६० ते २४०
मि.ली. इतके पिल्यास प्रौढांचा खात्रीने मृत्यू होतो.
२४ ते ३६ तासांत व्यक्ती मृत्यूमुखी पडते.
मिथाईल अल्कोहोल शरीरातून फार संथगतीने
उत्सर्जित केले जाते. त्याचे चयापचय होऊन
फॉर्मिल्डिहाईड व फॉर्मिक अ‍ॅसिड हे विषारी पदार्थ
तयार होतात. या विषारी पदार्थांमुळेच विषबाधेची
लक्षणे दिसतात. विषारी दारू प्यायल्यानंतर
सुरुवातीला डोके दुखते, चक्कर येते, मळमळ
व उलट्या होतात; तसेच पोटात दुखते. नंतर
स्नायूंमध्ये शक्ती राहत नाही व हृदयाचे कार्यही
मंदावते. डोळ्यांवर फारच विपरीत परिणाम होतात.
काही वेळा तात्पुरते अंधत्व येते; पण दृष्टीसाठी
आवश्यक असणारे चेतातंतू नष्ट झाल्यास वा निकामी
झाल्यास कायमचे अंधत्वही येते. नंतर व्यक्तीचा
मृत्यू ओढवतो. या विषबाधेमध्ये डायलिसीसचा
वापर करून रोग्याचे प्राण वाचवता येतात. इतर
उपचार लक्षणांवर आधारित असे असतात.
दारू पिणे वाईटच, पण त्यातही स्वस्त मिळते
म्हणून कोणतीही दारू पिणे अतिशय वाईट. कारण
अशा दारूत मिथाईल अल्कोहोल असू शकते व
त्यामुळे जीवदेखील जाऊ शकतो.

सुविचार

श्रद्धेच्या जलसिंचनाने परिश्रमांच्या वृक्षाला फळांचा बहर येतो.