लाल भोपळी मिरचीची चटणी

0
61

लाल भोपळी मिरचीची चटणी

साहित्य : अर्धा किलो लाल भोपळी
मिरच्या, पंधरा-वीस बेडगी मिरच्या, दोन
वाट्या टोमॅटोच्या फोडी, अर्धी वाटी चिंचेचा
कोळ, एक मोठा चमचा जिरं, पाव वाटी तेल,
तीन मोठे चमचे उडदाची डाळ, चिमूटभर
मेथीची पूड, मीठ, चवीला साखर.
कृति : तेल तापवून त्यात जिरे आणि
उडदाची डाळ घालावी. डाळीचा रंग गुलाबी
झाला की मेथी आणि मिरच्यांचे तुकडे घालून
परतावे. त्यात टोमॅटो घालून परतावे. आपण
वांगी भाजतो तशा लाल भोपळी मिरच्या
गॅसवर भाजाव्या आणि गरम असतानाच
पेपर नॅपकीनमध्ये गुंडाळून दोन-तीन मिनिटे
ठेवाव्या. नॅपकीननंच त्यांची साल पुसून
काढावी.
टोमॅटो, भोपळी मिरचीचे परतलेले
तुकडे, मीठ, साखर घालून मिसरमध्ये
चटणी वाटावी.