वास्तू

0


* घरात ज्या स्थानावर कृष्णाचा
फोटो असतो तिथे सकारात्मक ऊर्जेचा
प्रवाह असतो. वास्तूनुसार घरात जर आपण
वासुदेवाने कृष्णाला टोकरीत नेतानाचा
फोटो लावावा. यामुळे बर्‍याच अडचणी कमी
होतात.
* तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर
किंवा प्रवेशद्वारासमोर आरसा लावू नये कारण
तो अपशकून ठरतो.
संकलक  : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सल्ला

0


स्वयंपाक घरातील स्टीलची बेसिन्स खूपदा मळगट दिसू लागतील तेव्हा घासणीने
घासावे.

कोपर्‍यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी

 


ग्लिसरीनचा वापर हाताच्या कोपर्‍यांचा व गुडघ्याचा काळेपणा दूर करण्यासाठी त्या भागावर
ग्लीसरीन लावावे. कोमट पाण्यात जाडसर कपडा भिजवून त्याने रगडावे.

डिंक मिक्स

0

डिंक मिक्स


साहित्य : १ किलो लोणी, खसखस, खारीक पूड, बदाम पूड, खडीसाखर,
खोबर्‍याचा कीस, सुंठपूड, तयार डिंक पूड.

कृती : डिंकपूडीचे दोन भाग करावे. निम्मी साजूक तुपात भाजून घ्यावी व निम्मी तशीच ठेवावी. खोबर्‍याचा कीस, खसखस भाजून घ्यावे. लोणी कढवत ठेवावे. त्यात भाजलेली डिंक पूड, खारीक पूड, बदामपूड, खडीसाखर, भाजलेला खोबर्‍याचा कीस आणि सुंठ पूड घालावी. हे मिश्रण राहिलेल्या निम्म्या डिंकपूडीवर ओतावे त्याबरोबर डिंक फुलून येईल. लगेच तो बरणीत भरावा. ह्या डिंकात औषधी गुण तयार होतात. बाळंतिणीला हा डिंक चांगला असतो.

 

विमानात मैैल्याची विल्हेवाट कशी लावतात?

विमानात मैैल्याची विल्हेवाट कशी लावतात?

बसच्या प्रवासात केव्हातरी तुमची ‘तशी’ गडबड झालीच असेल निदान तुमच्या बरोबरच्या कोणाला तरी त्रास झालाच असेल. चालू बसमध्ये शौचास लागल्यास प्रचंड गोंधळ होऊ शकतो. कंडटरला विनवण्या करून एखाद्या स्टॉपवर गाडी जास्त वेळ थांबवावी लागते. तिथल्या तुटपुंज्या सोयींचा वापर करून धावतपळत गाडीत यावे तर प्रवाश्यांच्या त्रासिक नजरांना व प्रसंगी टोमण्यांनाही सामोरे जावे लागते. आपण अगदी शरमून जातो. याऊलट रेल्वेचा प्रवास याबाबतीत खूपच सोयीचा असतो; परंतु मैल्याच्या विल्हेवाटीची ही पद्धतही आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य नसते. विष्ठा सरळ रेल्वेच्या रूळामधील जागेत पडत असल्याने माती व पाणी यांंचे प्रदूषण होतेच. विमानामध्ये मैल्याच्या विल्हेवाटीची काय व्यवस्था असेल? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तेथे रेल्वेसारखा मार्ग तर वापरता येणार नाही. मग काय करत असतील? विमानात एक विशिष्ट अशी व्यवस्था असते तेथील संडासातून मैला एका टाकीत नेला जातो. या टाकीत फॉर्माल्डीहाईड, क्वाटर्नरी अमोनियम संयुग, रंगद्रव्य तसेच दुर्गंधीनाशक पदार्थ असतात. त्यामुळे मैला निर्जंतुक होतो व दुर्गंधीही येत नाही. विमान जमिनीवर आल्यानंतर या टाकीतील मैल्याची विल्हेवाट लावतात. विमानातील ही व्यवस्था आरोग्याच्या दृष्टीनेही चांगली असते. विष्ठेचा पाणी वा अन्नाशी संपर्क येऊ शकत नसल्याने रोगांचा प्रसार होत नाही.

सुविचार 

अपयश नव्हे; पण निकृष्ट प्रतीचे ध्येय हाच गुन्हा आहे.

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. २ फेब्रुवारी २०२४

कालाष्टमी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, पौष कृष्णपक्ष, स्वाती २९|५१
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. संततीसौख्य लाभेल. मागील उधारी वसुल होईल.

वृषभ : पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल. मागील बाकी व उधारी वसुल होईल. जुन्या मित्रांची भेट होईल.

मिथुन : कार्यात अडचणी येण्याची शयता आहे. आरोग्याची काळजी घ्या. जुन्या मित्रांची भेट होईल.

कर्क : सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल.

सिंह : आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील. उधारी उसनवारी मिळेल.

कन्या : जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल.

तूळ : परिस्थिती अनुकूल राहील याची काळजी घ्या. आरोग्य उत्तम राहिल. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा.

वृश्चिक : चांगले प्रदर्शन करण्यास अडचणी येतील. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. मनस्थिती उत्तम राहिल. दैनंदिन कार्ये पूर्ण झाल्याने उत्साह वाढेल.

धनु : कौटुंबिक जीवन उत्तम असेल आणि घरातील मंडळी फारच आनंदात राहणार आहे. मागील येणी वसुल होईल. शारिरीक व्याधी बळावतील.

मकर : भावनांच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे. आर्थिक विषयांमध्ये स्थिती सहयोगात्मक राहील. कार्यालयीन सहकार्‍यांकडून मदतीची अपेक्षा नको.

कुंभ : सहकार्‍यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आपणास नवीन संधी मिळण्याची शयता आहे. आर्थिक स्थिती सर्वसाधारण राहिल.

मीन : ग्रहदशेत एक महत्त्वपूर्ण बदल झाल्याने स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. भावंडांकडून मदत मिळेल. शेजार्‍यांशी वाद घालू नये.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

मध मास्क

मध मास्क
चमचाभर मध, चमचाभर ओटामिल,
३-४ थेंब लिंबाचा रस व चमचाभर दूध
एकत्र करून पेस्ट बनवा. ती उघडी रोमछिद्रे
असलेल्या त्वचेवर लावा. १५ मिनिटांनी
धुवा.

सल्ला

0

बेसन फेटताना त्यात चमचाभर
खाण्याचा सोडा टाकल्यास बेसन जास्त काळ
फेटावे लागत नाही व भजीही फुलतात.

वास्तू

0

ज्या वास्तूची पूर्व दिशा बंदिस्त असते;
म्हणजे दारे, खिडया, बाल्कनी, अंगण व्हरांडा
या ऐवजी भिंत असते, तिथे सूर्यप्रकाश आणि
वारा निसर्गतःच येत नाही. अशा बंदिस्त
ठिकाणा शौचालय, धान्याचे कोठार किंवा
निरुपयोगी सामान, जुने फर्निचर, रद्दी अशी
भरताड असते. त्या गृहिणीला वैधव्य, पोटच्या
अपत्यांचा अवेळी किंवा तारुण्यात मृत्यू अशा
गंभीर यातनांना सामोरे जावे लागते. कधी
तर त्यांना पुत्रप्राप्तीही होत नाही. झाल्यास
संततींना शारीरिक व्यंगांचा त्रास होतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.