बासमती शृंगार

0
55

बासमती शृंगार

साहित्य : २ वाट्या बासमती तांदूळ,
१ वाटी खवा, ३ मोठे चमचे साजूक तूप,
३ वाट्या साखर, अर्धी वाटी काजू-बदाम
काप पाव चमचा बेदाणे, १ चमचा वेलदोडा
पूड, पाव चमचा केशर (दुधात भिजवून), १
मोठा चमचा गुलाबपाणी (इसेन्स नव्हे) आणि
थोड्या गुलाब पाकळ्या.
कृती : तांदूळ स्वच्छ धुवून निथळावे.
तांदळाच्या दुप्पट पाणी घेऊन ते उकळून
त्यात मोकळा सळसळीत भात शिजवावा
आणि परातीत पसरून गार होऊ द्यावा.
साखरेचा तीनतारी पाक करून त्यात खवा,
केशर, वेलदोडा पूड घालावी. जाड बुडाच्या
भांड्यात तूप तापवून काजू-बदाम-बेदाणे
परतून त्यावर भात घालावा. साखरेचा पाक,
गुलाबपाणी घालून सगळे अलगद मिसळावे.
मंद आचेवर तवा ठेवून त्यावर भांडे ठेवावे.
घट्ट झाकण ठेवून पाक जिरून वाफ येऊ
द्यावी. वाढताना भाताच्या मुदी पाडून वर
गुलाबपाकळी लावावी.