डोळ्यांचे सौंदर्य
भुवयांच्या सौंदर्यासाठी
आठवड्यातून एकदा त्यावर जैतून वा जवसाचे तेल लावून चोळावे. कधी कधी बर्फाचा तुकडा घासावा व टर्किश टॉवेलने कोमट पाण्यात भिजवून पिळून भुवयांवर दाबून धरावा यामुळे भुवयांचे केस मुलायम व काळे होतात. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे झाल्यास रोज दुधावरील साय काळ्या वर्तुळांवर लावावी. कच्चा बटाटा मधोमध चिरून डोळ्यांवर ठेवून झोपावे. बटाटा काळ्या वर्तुळांना स्पर्श करील असा ठेवावा. २०-३० मिनिटांनी धुवावे.