दैनिक पंचांग शुक्रवार, दि. २ फेब्रुवारी २०२४

0
207

कालाष्टमी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, पौष कृष्णपक्ष, स्वाती २९|५१
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. संततीसौख्य लाभेल. मागील उधारी वसुल होईल.

वृषभ : पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल. मागील बाकी व उधारी वसुल होईल. जुन्या मित्रांची भेट होईल.

मिथुन : कार्यात अडचणी येण्याची शयता आहे. आरोग्याची काळजी घ्या. जुन्या मित्रांची भेट होईल.

कर्क : सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल.

सिंह : आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे. इच्छित कार्य पूर्ण होतील. उधारी उसनवारी मिळेल.

कन्या : जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल.

तूळ : परिस्थिती अनुकूल राहील याची काळजी घ्या. आरोग्य उत्तम राहिल. जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा.

वृश्चिक : चांगले प्रदर्शन करण्यास अडचणी येतील. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. मनस्थिती उत्तम राहिल. दैनंदिन कार्ये पूर्ण झाल्याने उत्साह वाढेल.

धनु : कौटुंबिक जीवन उत्तम असेल आणि घरातील मंडळी फारच आनंदात राहणार आहे. मागील येणी वसुल होईल. शारिरीक व्याधी बळावतील.

मकर : भावनांच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे. आर्थिक विषयांमध्ये स्थिती सहयोगात्मक राहील. कार्यालयीन सहकार्‍यांकडून मदतीची अपेक्षा नको.

कुंभ : सहकार्‍यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आपणास नवीन संधी मिळण्याची शयता आहे. आर्थिक स्थिती सर्वसाधारण राहिल.

मीन : ग्रहदशेत एक महत्त्वपूर्ण बदल झाल्याने स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. भावंडांकडून मदत मिळेल. शेजार्‍यांशी वाद घालू नये.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.