रस्त्यावर गाडी चालवताना मास्क लावण्याचा उपयोग होतो का?

रस्त्यावर गाडी चालवताना मास्क लावण्याचा उपयोग होतो का?

बर्‍याचदा टीव्हीवर कार्यक्रम बघताना किंवा
तुम्ही दिल्ली, मुंबईत राहत असाल तर तेथील
रस्त्यावर वाहने चालवणार्‍या अनेक व्यक्ती तोंडावर
कापडी मास्क बांधून गाड्या चालवताना दिसतात.
हवेच्या प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम या व्यक्ती
खरेच टाळू शकतात का? असा प्रश्न पडणे
स्वाभाविकच आहे. हवेच्या प्रदूषणाचे प्रमुख कारण
म्हणजे वाहनांचा धूर हे होय. या प्रदूषित हवेत
काजळी, सल्फर डायऑसाइड, अमोनिया,
अल्डिहाईड, नायट्रोजनचे ऑसाइड, तसेच अत्यंत
सूक्ष्म अशा आकारमानाची धूळ असते. याखेरीज
कार्बन मोनॉसाइड व शिसेही असते.
आपल्या असे लक्षात येईल की, आपण
रहदारीच्या ठिकाणी गाडी चालवत असताना
सभोवतालच्या प्रदूषित हवेत बरेचसे विषारी वायू
असतात (जसे कार्बन मोनॉसाइड, सल्फर
डायऑसाइड, अमोनिया इत्यादी.) कापडी वा
इतर प्रकारच्या मास्कमुळे हवेला नाकात जाण्यास
अटकाव होत नाही. तसे करणेही हानीकारक
ठरेल, कारण असा अभेद्य मास्कमुळे व्यक्तीला
जीवनावश्यक असा प्राणवायू मिळणार नाही व
व्यक्ती गुदमरेल. वायूखेरीज अत्यंत सूक्ष्म अशी
धूळसुद्धा या कापडी आवरणाच्या आरपार जाऊ
शकते. साहजिकच अशा विषारी वायूंचे व धुळीचे
व्हायचे ते दुष्परिणाम कापडी मास्क असो वा नसो,
व्यक्तीला होणारच. फक्त आपण सुरक्षित असल्याचा
वा हवेच्या प्रदूषणापासून वाचत असल्याचा भ्रम
तेवढा असेल. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना
असे मास्क लावण्याऐवजी वाहनाची वेळेवर दुरुस्ती
व देखभाल, पेट्रोल व ऑईलचे योग्य प्रमाण,
सिग्नलच्या ठिकाणी गाडी बंद करणे, उगाचच
अ‍ॅसीलेटर रेझ न करणे, मर्यादेपेक्षा जास्त वेगात
गाडी न चालवणे इत्यादी गोष्टींकडे जास्त लक्ष
दिल्यास आपल्या सभोवतालची हवा प्रदूषित होणार
नाही व आपल्याला तसेच इतरांनाही प्रदूषणाचे
दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत.

मेंदूसाठी आवश्यक जीवनसत्व

0

मेंदूसाठी आवश्यक जीवनसत्व
जीवनसत्व ब २ – दुध, पनीर, हिरव्या भाज्या, टोमॅटो यातून मिळू शकते. तसेच जीवनसत्व
ब६ हे कडधान्ये, शेंगदाणे, बटाटे, फळे, हिरव्या भाज्या यातून मिळते. या जीवनसत्वामुळे मेंदू
स्वस्थ राहतो. जीवनसत्व बी १२- हे दुध, दही, पनीर यातून मिळते.
जीवनसत्व क – यामुळे मेंदू स्वस्थ राहतो. स्ट्रोबेरी, आवळा, लिंबू, पत्ताकोबी यातून
जीवनसत्व क मिळते.

सुविचार

उन्नत होणे आणि पुढे जाणे हेच प्रत्येक जिवाचे लक्ष्य असते.

गुलकंद-नारळ करंज्या

0

गुलकंद-नारळ करंज्या

साहित्य : २ वाट्या बारीक रवा, १
वाटी मैदा, पाव चमचा मीठ, ८ टे. स्पून पातळ
डालडाचे मोहन. सारणासाठी २ मोठे नारळ, ३
वाट्या साखर, अर्धा चमचा वेलदोड्यांची पूड,
२ टे. स्पून बेदाणे, ८-१० बदाम, सारणामध्ये
१ लहान बाटली गुलकंद घालावा व थोडा
खवा किंवा ७-८ पेढे कुस्करून घालावे.
कृती : रवा, मैदा व तूप एकत्र करावे.
नंतर दुधात व पाण्यात पीठ भिजवावे.
साधारण तासभराने फूडप्रोसेसरमध्ये तिंबून
घ्यावे. त्याच्या बेताच्या आकाराच्या लाट्या
कराव्यात, वाळू देऊ नयेत यासाठी ओल्या
कपड्याखाली झाकून ठेवाव्या. ओल्या
खोबर्‍याचे साखर घालून सारण करून
घ्यावे. त्यात गुलकंद, वेलदोड्यांची पूड व
बदामाची साले काढून केलेले काप घालावे.
थोडा खवा भाजून घेऊन घालावा किंवा
पेढे तसेच कुसकरून टाकले तरी चालतात.
रवा-मैद्याच्या पीठाच्या पातळ पुर्‍या लाटून,
त्यात सारण भरून करंज्या करून बाजूने कडा
चांगल्या जुळवून, नंतर कापणीने कापून मंद
गॅसवर तळाव्यात

चेहर्‍यावरील मुरुमांसाठी

चेहर्‍यावरील मुरुमांसाठी
चेहर्‍यावर मुरुम असतील तर तुळस,
पुदिना, कडूलिंबाच्या पानाची पेस्ट १५ ते २०
मिनिटे लावून ठेवा.

सल्ला

0

रात्री-बेरात्री दात दुखायला लागला
तर दोन थेंब लवंगाचे तेल, थोडासा कापूर
दुखणार्‍या दाताखाली धरले तर दुखणे कमी
होते.

वास्तू

0

* कृष्णाच्या प्रत्येक स्वरूपात असे
काहीतरी असते ज्याने मनात सकारात्मकतेचा
भाव उत्पन्न होतो. स्वयंपाक घरात आपण
कृष्णाचे लोणी खातानाचा फोटो लावला तर
अतिशय लाभ देणारा असतो.
* झाडू, फडके व डस्टबीन या वस्तू
नेहमी लपवूनच ठेवाव्यात. त्या स्वयंपाकघर,
डायनिंग रुम, बेडरुम इ. ठिकाणी उघड्यावर
ठेवू नयेत.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

पिंकीला बघायला एक मुलगा येतो,
मुलगा : तु दिसायला सुंदर आहेस,
पिंकी : धन्यवाद!
मुलगा : पण तुझ्या बापाची लायकी आहे का मला कार देण्याची?
पिंकी : माझ्या बापाची लायकी तर विमान द्यायची आहे,
पण तुझ्या बापाची लायकी आहे का विमानतळ बनवायची…

दैनिक पंचांग शनिवार, दि. ३ फेब्रुवारी २०२४

शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष कृष्णपक्ष, विशाखा अहोरात्र
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
राशिभविष्य


मेष : मंगळाचेच घनिष्ठा नक्षत्र आज  प्रभावी असल्याने कार्यक्षेत्रात आपण उत्तम
कामगिरी दाखवाल. आपले नेतृत्वगुण, हिंमत व मेहनती स्वभाव आपणास निश्चितच चांगले
फळ देईल.

वृषभ : भागीदारी व्यवसायात लाभ होतील. जोडीदाराच्या नक्षत्रातील राशीस्वामीचे
अष्टमातील भ्रमण आपणास सध्यात री महत्वपुर्ण निर्णय घेण्यास लगाम लावत आहे.

मिथुन : संध्याकाळी साडेसात पर्यंत तरीवाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावा.
कामावर लक्ष केंद्रीत करून हातातील काम पुर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.

कर्क : भाग्याची साथ लाभेल. आपण
घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. जुने मित्र
मंडळी भेटतील. दिवस अत्यंत आनंददायी
वातावरणात व्यतीत होईल.

सिंह: वाहन जपून चालवावे. आरोग्याची काळजी घ्यावी. नियोजनपूर्वक कृती करावी.
कुणाच्या वादात पडू नये. आपले काम मेहनत व सातत्य राखून पार पाडावे.

कन्या : पंचमातील बुध असंगत आहे. सध्या तरी कामाच्या नियोजनावर भर द्यावा
लागेल. दिवस सकारात्मक असेल. वाहनपिडा सतावेल.

तूळ :  प्रॉपर्टी संदर्भात कार्य फायदेशीर ठरतील. घरात आनंदी वातावरण असेल.
जळवचे प्रवासाचे बेत आखाल. छोट्या-मोठ्या दुखापती उदा.कापणे, चिरणे आदींचा संभव
आहे. म्हणून जपून कामे करावीत.

वृश्चिक :  जुनी येणी वसूल होईल. आर्थिक कामात उन्नती साधाल. बौध्दिक कामात यश
लाभेल. वाहन सावकाश चालवावे.

धनु :  कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढेल.व्यवहार फायदेशीर ठरतील. भागीदारीत फायदा
होईल मात्र संगनमत ठेवावे लागेल. मागील परिश्रम फळास येतील.

मकर : मानसिक स्थिती सांभाळून शांततेत निर्णय घ्यावे. भागीदारी व्यवसायात
लाभ होऊ शकतो. मागील उधारी वसुल होईल. स्थावर जंगम मालमत्तांचे व्यवहार करा.

कुंभ :  वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. अनावश्यक खर्च होऊ शकतो.
व्यवहार काळजीपुर्वक करावे.

मीन : दिवस आनंदी असेल. हाती घेतलेले काम उत्तमरित्या पुर्ण करू शकाल.
सकारात्मक दिवस ठरेल.

संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा ..!

बायको : कुठे आहात?
नवरा : ऑफिसमध्ये आहे. का गं काय झालं?
बायको : काही नाही हो, आपली शेजारची बाई पळून गेली म्हणून विचारले…