स्वयंपाक करत असताना स्वयंपाक
करणारी व्यक्ती आरशात दिसावी. त्यामुळे
स्वयंपाक घरातील अपघात कमी होतात,
समृध्दी येते.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
प्रदोष, शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष कृष्णपक्ष, पू.षा.२८|३७
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल.
वृषभ : बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील.
मिथुन : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो.
कर्क : आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आर्थिक बाबतीत उन्नती होईल.
सिंह : मुलांसाठी आणि पत्नीसाठी वेळ द्यावा. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल.
कन्या : आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल.
तूळ : महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल.
वृश्चिक : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील.
धनु : घरात राहून साफसफाई करायची असल्यास काही कारणांमुळे विघ्न येतील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल.
मकर : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या.
कुंभ : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल.
मीन : आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. व्यापार-व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
नर्व्ह गॅसचे काय परिणाम होतात?
दुसर्या महायुद्धाच्या काळात नर्व्ह गॅस म्हणून
ओळखली जाणारी अनेक रसायने विकसित केली
गेली; परंतु लष्करी गोपनियतेच्या नावाखाली
त्यांची माहिती लपवून ठेवण्यात आली. नर्व्ह गॅस
हे सामान्य तापमानाला रंगहीन व गंधहीन अशा
द्रव्याच्या स्वरूपात असतात. तापमान वाढवल्यास
मात्र त्याची विषारी वाफ सर्वत्र पसरते व दुष्परिणाम
दिसून येतात. ही वाफ श्वासावाटे, तोंडावाटे वा
डोळ्यांतील आवरणातून शरीरात प्रवेश करते. स्नायू
व चेतातंतू यांच्या जोडामध्ये अॅसेटाईल कोलीन
नावाचा रासायनिक पदार्थ नैसर्गिकपणे सोडला
जात असतो. या पदार्थाच्या प्रभावाखाली स्नायूंचे
आकुंचन होते. आकुंचनाचे कार्य झाले म्हणजे
कोलीन इस्टरेज या विकराची अॅसेटाईल कोलीनवर
क्रिया होते व ते निकामी केले जाते. त्यामुळे स्नायू
परत शिथिल होतात. नर्व्ह गॅसमधील रासायनिक
पदार्थ या कोलीन इस्टरेजला निकामी करतात.
साहजिकच स्नायू आकुंचनाच्या अवस्थेत राहतात.
परिणामी हातापायाला गोळे, झटके, श्वास घ्यायला
त्रास, नाकातून पाणी गळणे, नीट न दिसणे अशी
लक्षणे दिसून येतात. असे झाल्यावर सैनिकांचे
मनोबल खचते व ते पळापळ करू लागतात.
जास्त प्रमाणात नर्व्ह गॅस शरीरात गेल्यास श्वसनास
प्रचंड त्रास होऊन मृत्यू ओढवतो. इराकमध्ये आठ
वर्षांपूर्वी झालेल्या इराक-कुवैत, इराक-अमेरिका
युद्धाच्या वेळी, इराक असे नर्व्ह गॅस वापरेल अशी
भीती व्यक्त करण्यात आली होती.
नूडल्स धिरडे
साहित्य : १ कप उकडलेली नूडल्स,
दीड कप मैदा, एक लहान चमचा मीठ,
अर्धा चमचा काळेमिरे पूड, दोन चीज यूब्स,
तळण्यासाठी तेल, दूध आवश्यकतेनुसार,
सुया लाल मिरच्या.
कृती : सर्वप्रथम मिसरमध्ये मैदा,
मीठ व काळे मिरे पूड घालून नंतर त्यात
दूध घालून मिश्रणाला एकजीव करावे. आता
नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडेसे
उकडलेले नूडल्स ठेवावे. त्यावर एक चमचा
तयार मिश्रण घालून चांगले पसरवून घ्यावे.
वरून चीज व लाल मिरच्यांचे तुकडे घालून
गुलाबी होईपर्यंत दोन्ही बाजूने परतून घ्यावे.
सर्व्ह करताना सॉस व चटणी घालावी.
डायनिंग टेबल किचनमध्येच
पश्चिमेकडे ठेवावे. किचन नेहमी स्वच्छ ठेवावे.
कचरा किंवा कचर्याची पेटी स्वयंपाक घरात
न ठेवल्यास अतिउत्तम. स्वयंपाकाचा गॅस
ओट्याच्या उजव्या बाजूस ठेवावा. आजच्या
चौकस गृहिणी किचनच्या रंगसंगतीकडेही
चोखंदळपणे लक्ष देतात. रंगसंगती शयतो
साधी असावी. स्वयंपाक घरातील भिंतींवर
निळा किंवा पांढरा रंग लावल्यास अतिउत्तम.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.