पाककला

0
21

नूडल्स धिरडे
साहित्य : १ कप उकडलेली नूडल्स,
दीड कप मैदा, एक लहान चमचा मीठ,
अर्धा चमचा काळेमिरे पूड, दोन चीज यूब्स,
तळण्यासाठी तेल, दूध आवश्यकतेनुसार,
सुया लाल मिरच्या.
कृती : सर्वप्रथम मिसरमध्ये मैदा,
मीठ व काळे मिरे पूड घालून नंतर त्यात
दूध घालून मिश्रणाला एकजीव करावे. आता
नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडेसे
उकडलेले नूडल्स ठेवावे. त्यावर एक चमचा
तयार मिश्रण घालून चांगले पसरवून घ्यावे.
वरून चीज व लाल मिरच्यांचे तुकडे घालून
गुलाबी होईपर्यंत दोन्ही बाजूने परतून घ्यावे.
सर्व्ह करताना सॉस व चटणी घालावी.