दैनिक पंचांग मंगळवार, दि. ६ फेब्रुवारी २०२४

षट्तिला एकादशी, शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष कृष्णपक्ष, ज्येष्ठा
०७|३५ मूळ ३०|२७
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : काही अडचणींनंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम.

मिथुन : कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी.

कर्क : आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका.

सिंह : यथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. मागील उधारी वसुल होईल.

कन्या : बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील.

तूळ : दिवस चांगला आहे. आपल्या छान वागण्याने इतरांना हवेहवेसे वाटू शकता.

वृश्चिक : मित्रांबरोबर सामुदायिक उपक्रम किंवा पिकनिकच्या रूपात दिवसाचा आनंद घेऊ शकता.

धनु : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे.

मकर : आज पैसे आणि बळाची विशेष भूमिका राहील. केव्हातरी एखाद्या सामाजिक समारंभात आपल्या विचारांचा परिणाम होईल.

कुंभ : महत्वाच्या बातम्या मिळाल्याने आपण एक सुखद परिस्थितीत आपणास बघाल.

मीन : जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका.

                                                                                     संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

फॉसी जॉ म्हणजे काय?

फॉसी जॉ म्हणजे काय?
तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात तुम्ही फॉसी जॉ
विषयी वाचले असेल. पिवळ्या फॉस्फरसमुळे हा रोग
होते, हेही तुम्हाला माहीत असेल. या आजाराची
थोडयात माहिती घेऊ.
आजकाल हा रोग जास्त आढळत नाही.
काडेपेट्यांच्या कारखान्यात जेव्हा पिवळ्या
फॉस्फरसचा वापर केला जायचा, तेव्हा हा रोग
जास्त आढळून यायचा. या कारखान्यात काम
करणार्‍या लोकांच्या श्वासावाटे पिवळा फॉस्फरस
त्यांच्या शरीरात जात असे. अनेक महिन्यांनंतर वा
वर्षांनंतर या व्यक्तीमध्ये फॉसी जॉ ची लक्षणे दिसून
येत. किडलेल्या दातावर पिवळ्या फॉस्फरसचा
प्रामुख्याने परिणाम होतो. सुरुवातीला दातदुखी
होते, मग जबडा सुजतो, दात सैल होतात, हिरड्या
खराब होतात व जबड्याचे हाडही रोगग्रस्त होते.
यालाच फॉसी जॉ असे म्हणतात. जबड्याच्या हाडात
पू होतो व तो काही रंध्रांतून बाहेर येऊ लागतो.
याला दुर्गंधी असते. हाडाचे आपोआप फ्रॅचरही
होऊ शकते. जबड्यातील या लक्षणाखेरीज थकवा,
रक्तक्षय व सांधेदुखीही दिसून येते. यकृतही रोगग्रस्त
होते.
हा रोग टाळण्यासाठी अशा प्रकारच्या
कारखान्यात काम करणार्‍या व्यक्तींची वारंवार
वैद्यकीय तपासणी करायला हवी. क्ष-किरण
तपासणीचाही त्यात अंतर्भाव असावा. दुसरे व
महत्त्वाचे म्हणजे पिवळ्या फॉस्फरसऐवजी दुसर्‍या
सुरक्षित अशा पदार्थांचा या कारखान्यात वापर
करावा. असा उपयोग सुरू झाल्यानेच आजकाल
आपल्याला फॉसी जॉ हा रोग क्वचितच आढळून
येतो.

आजार टाळण्यासाठी हे पदार्थ दूर ठेवा

0

आजार टाळण्यासाठी हे पदार्थ दूर ठेवा
नेहमी लक्षात ठेवा की, तुमच्या आहाराचे प्रमाण योग्य असावे. तुमच्या आहारातून सगळ्यात
आधी स्टार्चचे प्रमाण अधिक असणारे म्हणजे भात, बटाटा, ब्रेड असे पदार्थ काढून टाका.
शीतपेय पिण्याची सवय सोडण्याचा प्रयत्न करा. ही सवय तुमच्या शरीरासाठी फायदेशीर नाही.
दुध घालून चहा किंवा कॉफी पिण्याच्या सवयीला सुद्धा बाय बाय करा.

सुविचार

आत्म्यामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असते.  : रवींद्रनाथ टागोर.

गुलकंद-नारळ करंज्या

0

गुलकंद-नारळ करंज्या

साहित्य : २ वाट्या बारीक रवा, १
वाटी मैदा, पाव चमचा मीठ, ८ टे. स्पून पातळ
डालडाचे मोहन. सारणासाठी २ मोठे नारळ, ३
वाट्या साखर, अर्धा चमचा वेलदोड्यांची पूड,
२ टे. स्पून बेदाणे, ८-१० बदाम, सारणामध्ये
१ लहान बाटली गुलकंद घालावा व थोडा
खवा किंवा ७-८ पेढे कुस्करून घालावे.
कृती : रवा, मैदा व तूप एकत्र करावे.
नंतर दुधात व पाण्यात पीठ भिजवावे.
साधारण तासभराने फूडप्रोसेसरमध्ये तिंबून
घ्यावे. त्याच्या बेताच्या आकाराच्या लाट्या
कराव्यात, वाळू देऊ नयेत यासाठी ओल्या
कपड्याखाली झाकून ठेवाव्या. ओल्या
खोबर्‍याचे साखर घालून सारण करून
घ्यावे. त्यात गुलकंद, वेलदोड्यांची पूड व
बदामाची साले काढून केलेले काप घालावे.
थोडा खवा भाजून घेऊन घालावा किंवा
पेढे तसेच कुसकरून टाकले तरी चालतात.
रवा-मैद्याच्या पीठाच्या पातळ पुर्‍या लाटून,
त्यात सारण भरून करंज्या करून बाजूने कडा
चांगल्या जुळवून, नंतर कापणीने कापून मंद
गॅसवर तळाव्यात.

वास्तू

0

घराच्या मुख्य दरवाजासमोर कचरा,
विजेचा खांब, दुसर्‍या घराचा जिना अत्यंत
अशुभ.

डोळे सतेज करण्यासाठी

डोळे सतेज करण्यासाठी
थंड पाणी सेल त्वचा तुकतुकीत
राखण्यास व रक्ताभिसरण व्यवस्थित
करण्यासाठी प्रभावी असते. कुस्करलेला
बटाटा रेशमी कापडात बांधून रोज थोडा
वेळ डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांखालील
काळवंडलेपणा नाहीसा होतो.

सल्ला

0

भारतामध्ये प्राचीन काळापासून लोक
शंखपुष्पीचे सेवन करीत आहेत. याचा ब्रेन
टॉनिकच्या रूपातही उपयोग केला जातो.
डोके शांत करण्यात व टेन्शन दूर करण्यात
हे मदत करते. लहान मुलांची स्मरणशक्ती
वाढविण्यात आणि ध्यान केंद्रित करण्यासाठी
ही एक सर्वांत लाभदायक हर्ब आहे. नर्व्हस
विकनेसशी संबंधित कित्येक डिसऑर्डर्स
आणि मानसिक व शारीरिक थकवा, तसेच
स्मरणशक्ती गमावणे यासारख्या समस्यांच्या
उपचारासाठी शंखपुष्पीचा उपयोग केला
जातो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

वडिलांनी राजूची झडती घेतली,
सिगरेट, मुलींचे नंबर निघाले…
वडिलांनी राजूला बदड बदड बदडले…
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
राजू रडत रडत,पप्पा हि पॅन्ट माझी नाही तुमची आहे.

दैनिक पंचांग रविवार, दि. ४ फेब्रुवारी २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष कृष्णपक्ष, विशाखा ०७|२१
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : आज आपणास कठोर श्रम करावे लागतील. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. मागील उधारी वसुल होईल.

वृषभ : आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील.

मिथुन : व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. आजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका.

कर्क : एखाद्या जीवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा.

सिंह : चांगले भोजन मिळेल. मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल.
कन्या : काळजीपूर्वक कार्य करा. नोकरीत असलेल्या व्यक्तींनी कार्यात सहकार्य घेऊन चालावे.

तूळ : हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका.

वृश्चिक : शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेटची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा.

धनु : वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल.

मकर : आजच्या दिवसाचा उपयोग नाती-संबंधात नवीन उर्जा भरण्यासाठी करा. आरोप-प्रत्यारोपांपासून दूर रहा. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल.

कुंभ : भावनात्मक स्वभावाचे असल्यामुळे आपणास नुकसान होणे शय आहे म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. मानसिक स्थिती
आल्हाददायक राहील व वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्न वातावरण राहील.

मीन : वडिलधार्‍यांचा आधार मिळाल्याने अडकलेली कार्य पूर्ण होईल. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर चांगला
काळ व्यतीत होईल.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर