दैनिक पंचांग बुधवार, दि. ७ फेब्रुवारी २०२४

0
82

प्रदोष, शके १९४५ शोभननामसंवत्सर, पौष कृष्णपक्ष, पू.षा.२८|३७
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल.

वृषभ : बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील.

मिथुन : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो.

कर्क : आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आर्थिक बाबतीत उन्नती होईल.

सिंह : मुलांसाठी आणि पत्नीसाठी वेळ द्यावा. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल.

कन्या : आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल.

तूळ : महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल.

वृश्चिक : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील.

धनु : घरात राहून साफसफाई करायची असल्यास काही कारणांमुळे विघ्न येतील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल.

मकर : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या.

कुंभ : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्‍यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल.

मीन : आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. व्यापार-व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर