मान लांब होण्यासाठी

मानेची निगा


* मान खूपच नाजूक असल्याने खूप
काळजीपूर्वक व्यायाम करावेत. अयोग्यपणे
केलेल्या व्यायामामुळे मान लचकू शकते.
* खुर्चीवर आरामात पाठ टेकवून बसा.
मान व खांदे सरळ ठेवा. मान प्रथम सरळ
ठेवा. डोके डाव्या खांद्याच्या दिशेने झुकवा.
मग त्याचप्रमाणे उजव्या बाजूला झुकवा. हा
व्यायाम १०-१५ वेळा करा.
* पलंगावर उताणे झोपा आणि मान
पलंगाखाली झुकती ठेवा. (लटकटी यामुळे
मान लांब होते.)

रताळ्याची खीर

0

रताळ्याची खीर


साहित्य – २ रताळी, एका नारळाचे दूध, १ वाटी बारीक चिरलेला गुळ, चिमूटभर
मीठ, थोडी वेलदोड्याची व जायफळाची पूड.

कृती – रताळी उकडून घ्यावी. नंतर साले काढून बारीक फोडी कराव्या. नारळाचे
दूध व गुळ एकत्र करावे. त्यात रताळ्याच्या फोडी घालून उकळावे. दाटपणासाठी थोड्या
रताळ्याच्या फोडी कुस्करून त्यात घालाव्या. नंतर वेलदोडे व जायफळ यांची पूड घालावी.

चहा आरोग्यास मारक

0

चहा आरोग्यास मारक


* चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास
शौचाला होत नाही. हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे, हे चहाचे काम नव्हे. चहा
रक्ताची आम्लता वाढवतो.
* नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो
आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.
* चहा समवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा
चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला मारक बनतो

दैनिक पंचांग गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी २०२४

शिवरात्रि, शके १९४५ शोभननाम संवत्सर, पौष कृष्णपक्ष, उ.षा.२६|१४
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. दिवस चांगला जाईल. महत्त्वाच्या कार्यात हितचिंतकांकडून मदत मिळेल.

वृषभ : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील.

मिथुन : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. जुने मित्र भेटतील. हितशत्रुंपासून सावधान. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील.

कर्क : शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. व्यावसायिक अडचणी सतावतील.

सिंह : मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषदायक राहील.

कन्या : अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. दिवस आनंदात जाईल. विश्वासू दगा देतील.

तूळ : आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल.

वृश्चिक : आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. नवीन ओळखी संभवतात. मानसन्मानात वाढ होईल.

धनु : संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या क्रोधावर संयम ठेवाल.

मकर : नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही मागील केलेली सत्कृत्ये आज फळास येतील.

कुंभ : आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. पूर्वीपासून आपल्या मनातील असलेले संकल्प पूर्ण होतील.

मीन : अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. पितृचिंता जाणवेल. वाहन चिंता सतावेल. आरोग्य उत्तम राहिल.

                                                                                      संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

मॅड काऊ डिसीज का होतो?

मॅड काऊ डिसीज का होतो?

५ वर्षापूर्वी युरोपमध्ये विशेषतः इंग्लंडमध्ये
प्राण्यांच्या या रोगाने हाहाकार माजवला होता.
मॅड काऊ डिसीज म्हणजे शास्त्रीय भाषेत बोव्हाईन
स्पॉन्जीफॉर्म एन्केफॅलोपॅथी. मूलतः शाकाहारी
असणार्‍या गाई-म्हशींना त्यांचे मांस वाढावे यासाठी
प्राण्यांचे मांस-हाडे यांची भुकटी या देशांमध्ये
दिली जात असे. याची परिणती या प्राण्यांमध्ये
एका संसर्गक्षम प्रथिनाच्या अर्थात ‘प्रायॉन’च्या
निर्मितीत झाली व या रोगाची लागण जनावरांमध्ये
होऊ लागली. अशी या रोगांची कारणमिमांसा दिली
जाते. १०७० मध्ये या रोगाची सुरुवात गाईंमध्ये
झाल्याविषयी शयता वर्तवली जाते. १९८६ मध्ये
हा रोग दोन गाईंना झाल्याची खातरजमा करण्यात
आली.
प्राण्यांचे मांस खाणार्‍या व्यक्तींमध्ये मेंदूवर
परिणाम करणार्‍या क्रूट्झफील्ड-जॅकॉब रोगाचा
एक प्रकार आढळून आला. कमी वयात होणारा
गंभीर रोग जीवघेणा ठरतो. यामुळे मांस खाणार्‍या
लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. इंग्लंडमधून मांस
आयात करण्यास अनेक देशांनी निर्बंध घातले.
इंग्लंडचे अर्थकारणही अडचणीत आले. यावर उपाय
म्हणून इंग्लंडमध्ये रोगग्रस्त किंवा रोग असल्याच्या
संशय असलेल्या गाई मारून टाकण्यात आल्या.
तसेच शाकाहारी प्राण्यांना देण्यात येणार्‍या आहारात
मांस-हाडे यांची भुकटी टाकणे बंद करण्यात आले.
त्यामुळे आज हा रोग बर्‍याच प्रमाणात आटोयात
आला आहे. मॅड काऊ डिसीज व उपरोक्त मानवी
रोग यातील संबंधामुळे मॅड काऊ डिसीजला महत्त्व
प्राप्त झाले. निसर्ग नियमांच्या विरूद्ध वागल्यास काय
होऊ शकेल याचे एक उदाहरण म्हणजे मॅड काऊ
डिसीज होय. या उदाहरणातून माणसाने धडा घेतला
नाही तर असे अनेक जीवघेणे रोग भविष्यात निर्माण
होतील यात शंका नाही.

फिटनेससाठी टाळा हे पदार्थ

0

फिटनेससाठी टाळा हे पदार्थ
फिटनेससाठी तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थ आहारातून कमी करा. यामुळे फॅट तर
वाढतातच शिवाय अनेक आजारांनाही आमंत्रण मिळते. जास्त मीठ असणारे पदार्थ म्हणजे सॉस,
केचअप, चिप्स, पापड टाळा. संपूर्ण शरीर व्यवस्थित काम करावे यासाठी शरीराच्या प्रत्येक
अवयवाचा व्यायाम करायला हवा.

सुविचार

महान ध्येयाचे सृजन मौनामध्ये होत असते. : साने गुरुजी

बुंदीचा चिवडा

0

बुंदीचा चिवडा

साहित्य : बुंदी २५० ग्रॅम, शेंदगाणे
१०० ग्रॅम, तिखट पूड १/२ टी स्पून, चवीला
मीठ व पिठीसाखर, ७/८ कढीपत्ते, चिमूटभर
हळद, तेल एक टेबलस्पून.
कृती : पातेल्यात तेल गरम करा.
त्यात कढीपत्ता टाका. शेंगदाणे टाका. काही
मिनिटे हलवा.
मग हळद, तिखट, पिठीसाखर घालून
हलवावे मग बुंदी टाकावी. २-३ मिनिटे
परल्यानंतर मीठ टाकावे.

सल्ला

0

चयापचय क्षमता वाढीसाठी
* नारळाच्या पाण्यात इतर फळांचा
रस आणि एनर्जी ड्रिंसच्या तुलनेत
इलेट्रोलाईटस्चे प्रमाण जास्त असते.
त्यामुळे नारळ पाण्याच्या सेवनाने नैसर्गिकरित्या
तुमची चयापचय क्षमता वाढते आणि जास्त
ऊर्जाही मिळते. नारळ पाण्याच्या सेवनामुळे
तुम्ही बराच वेळ व्यायाम आणि कष्टाचे काम
करू शकता तसेच वजनही लवकर कमी
होते.
* अक्रोडच्या साली जाळून त्याची
राख बनवा. या राखेने मंजन केल्यास दात
मजबूत, स्वच्छ आणि चमकदार बनतात.

केस गळतीसाठी

* लिंबूच्या सालीत व्हिटॅमिन सी
भरपूर प्रमाणात आढळले जाते. त्याच्या साली
सुकवून त्याची पावडर बनवा. एक चिमूटभर
पावडर फेसपॅकमध्ये घालून ती लावल्यास
त्वचा उजळली जाते.
* मेथीची पाने वाटून केसांना लावल्यास
व मेथ्या अर्धा-अर्धा चमचा सकाळ-सायंकाळ
खाल्ल्यास केस गळणे बंद होते.