जया एकादशी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, माघ शुलपक्ष, आर्द्रा १२|१३
सूर्योदय ०६ वा. ३२ मि. सूर्यास्त ०६ वा. ३४ मि.
राशिभविष्य
मेष : वैवाहिक जीवनात मतभेदांची शयता आहे. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. विनाकारण खर्च वाढतील. कृपया कामे घाईघाईने करू नयेत.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय नकोत. मनस्ताप संभवतो. वादविवाद टाळावेत. पितृचिंता सतावेल.
कर्क : घरातील कलह वाढण्याची शयता आहे. महत्त्वाचे निर्णय नकोत. कार्यालयातील वरिष्ठांशी जपून वागावे.
सिंह : वाहने सावकाश चालवावीत. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवाल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.
कन्या : आर्थिक व्यवहार जपून करावेत. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शयतो टाळावेत.
तूळ : काहींना मानसिक अस्वस्थता राहील. वादविवादात सहभाग टाळावा. पत्नीकडून उत्तम विवाहसौख्य प्राप्त होईल.
वृश्चिक : नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे शयतो दुपारनंतर करावीत. भाऊबंद डोके वर काढण्याची शयता आहे.
धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. मुले व पत्नी यांचा आज दिवसभर उत्तम सहवास लाभेल.
मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दिवसाची सुरुवात जरी निराशाजनक झाली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल आणि मनोबल वाढेल.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. धडाडीचे निर्णय घेऊ शकाल. दिवस आनंदात जाईल. जुन्या मित्रांचा सहवास लाभेल. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेला संकल्प पूर्ण होईल.
मीन : खर्चाचे प्रमाण कमी होईल. दुपारनंतर मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. पुर्वसुकृत फळास येईल. संततीसौख्य लाभेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.




