दैनिक पंचांग रविवार, दि. १८ फेब्रुवारी २०२४

0
124

शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ शुलपक्ष, रोहिणी ०९|२३
सूर्योदय ०६ वा. ३२ मि. सूर्यास्त ०६ वा. ३४ मि.


राशिभविष्य
मेष:  श्रम अधिक झाल्यामुळे  दमल्यासारखे वाटेल. एखादे काम न झाल्यामुळे
अप्रसन्न राहाल.

वृषभ : वाहने काळजीपूर्वक चालवा. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल.

मिथुन:  मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्यउत्तम राहील. आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे.
महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील.

कर्क : व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ
होईल. लेखन कार्यात यश मिळेल.

सिंह :  कोणताही अर्ज देण्यासाठी उत्तमवेळ. आरोग्य चांगले राहील.

कन्या :  कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील.

तूळ :  शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल. जिभेला सुखावणारा दिवस असेल. मित्र आनंद
देतील .

वृश्चिक :  मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण
उत्तम राहील.

धनु :  कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल.

मकर :  मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ  : आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगति होईल.

मीन :  एखाद्या प्रोजेटसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची
वेळ आली आहे.

                                                               संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.