नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड आहे. – महावीर स्वामी.
माकडाची मर्कटचेष्टा
माकडाची मर्कटचेष्टा
तळ्या काठच्या एका झाडावर एक माकड राहत होते. तळ्यात भरपूर पाणी आणि मासेही रगड
होते. एकदा काही कोळी लोक मासे पकडण्यासाठी तळ्याकाठी आले. त्यांनी तळ्यात जाळी टाकली
आणि जेवण्यासाठी ते घरी गेले. माकड झाडावर बसून कोळ्यांचा उद्योग पाहत होतेच. आपणही
कोळ्यासारखे मासे पकडावेत, असे माकडाला वाटले. तसे भराभर खाली उतरून ते तळ्यात
टाकलेल्या जाळ्याजवळ गेले. जाळे काढायचा प्रयत्न करू लागले, पण जाळे कसे काढतात आणि
कसे टाकतात, याची त्याला काहीही माहिती नव्हती. त्या नादात माकड स्वतःच जाळ्यात गुरफटत गेले.
नाका-तोंडात पाणी जाऊन त्याचा जीव गुदमरू लागला.
जाळ्यातून सुटका करण्यासाठी माकड धडपड करू लागले असता ते मनात म्हणाले,
“माझ्यासारखा मूर्ख मीच. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही, त्याच्याशी काही देणे-घेणे नाही,
अशा गोष्टीत मी कशाला नाक खुपसले बरे? नसत्या फंदात पडल्याचे हे फळ.
तात्पर्य : नसत्या फंदात पडू नये.
मेडिकल पाणी म्हणजे काय?
मेडिकल पाणी म्हणजे काय?
हसा आणि शतायुषी व्हा! हसा आणि शतायुषी व्हा! एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते. मुलगी : काय रे, भावाच्या पाया पडतोयस का? मुलगा : होय, वहिनी! जीवन चक्र बार-बार महापुरुष हमें यही समझाते हैं कि हम किसी महापुरुष से उसकी दयादृष्टि माँगें| हम उनसे दुनियावी वस्तुयें न माँगें, हम उनसे सिर्फ प्रभु को माँगें| यही इस शताब्दी में हुजूर बाबा सावनसिंह जी महाराज, परम संत कृपालसिंह जी महाराज और दयाल पुरुष संत दर्शनसिंह जी महाराज समझाते चले आए हैं कि ऐसे महापुरुष हमें नामदान देकर ८४ लाख जियाजून से मुक्त कर देते हैं, हमें शब्द के साथ जोड़ देते हैं| प्रभु का शब्द सृष्टि के कण-कण में बसा हुआ है, लेकिन हम उसे सुन नहीं सकते| सत्गुरु उसके साथ हमें जोड़कर परमात्मा से एकमेक कर देते हैं और हमारी जिंदगी का ध्येय, जो अपने आपको जानना और परमात्मा को पाना है, वह पूरा हो जाता है| (कृपाल आश्रम, अहमदनगर) २५) पतिव्रता, पार्वती उभे शब्द :- १) एक उत्तर भारतीय आडनाव २) स्वाद, गोड; चव ३) हा समाज पूर्वी दारू गाळत असे ४) पंजाबमधील एक नदी ५) धोतरजोडीतील एक भाग पर्ण ६) अतिशय वेगात ७) दांत; सुळे ११) तळमळ अस्वस्थता; तडफड १२) ताठा, अभिमान १४) खोगीर, पलाण १५) तारुण्याचा पूर्व भाग १६) स्त्रियांचे एक वस्त्र १७) चावण्याचा अवयव २०) एक फळ २१) अधिक चांगला श्रेष्ठ, अधिक चांगला शब्दगंध क्र. ६८६३ चे उत्तर अ मे रि का घ स ट स ह व ज न दा र मा न खं ड ना शि न त बा व जा मुं ब ई य बा र गी र फा ट क ल क था स वा क स र त प र डी शब्दगंध क्र. ६८६४ सौ. शैलजा कुलकर्णी १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ आडवे शब्द :- १) थोडे तिरपे ५) बी पेरण्याचे एक अवजार; तिफण ८) निकाल, फैसला, उत्पन्नाचा हिशोब ९) सोंगटी १०) गायनातील एक राग १३) जगाचा प्राण किंवा आधार; परमेश्वर १६) सर्वकाळी नेहमी १८) सुखदुःख जाणणारे इंद्रिय; माईंड १९) जलाशय; तलाव २१) वर्ष: शक; साल २२) अश्व, घोडा २३) पांडवांचे शंभर चुलत भाऊ २४) स्त्री; अशक्त, कमजोर तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला? पाणी म्हणजे काय, हे माहित नसलेली व्यक्ती सापडणे अशय आहे. पाणी हेच जीवन आहे. पाण्यासाठीच माणूस मैलोन्मैल वणवण भटकत असतो. पाणी नसेल तर आपल्या तोंडचे पाणी पळते! रासायनिकदृष्ट्या पाणी अर्थात हायड्रोजनचे दोन अणू व ऑसिजनचा एक अणू यांचे संयुग. पाण्याला कोणताच रंग नसतो, वास नसतो आणि पाण्याच्या स्त्रोतानुसार विशिष्ट चव असते. पाणी असेल तर आणि तरच संस्कृतीचा विकास होतो. कारण पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगधंद्यासाठीही पाणी आवश्यक असते. असे बहुगुणी पाणी. शरीरात तर ६३ टक्के पाणीच असते. पाण्याची दुसरी बाजू पाहणेही महत्त्वाचे ठरेल. प्रदूषित पाण्यामुळे माणसाला अनेक रोग होऊ शकतात. जीवजंतू, अनेक विषारी रासायनिक पदार्थ, किरणोत्सर्गी पदार्थ यामुळे इत्यादींमुळे पाण्याचे प्रदूषण होते. यामुळे टायफॉईड, कावीळ, हगवण, कॉलरा आदि रोग किंवा विषबाधा होऊ शकते. किरणोत्सर्गी पदार्थांमुळे कर्करोग होऊ शकतो. नुसते पाहून पाणी शुद्ध, सुरक्षित आहे वा नाही, हे ठरविता येत नाही. स्वच्छ दिसणार्या पाण्यात सूक्ष्म विषाणू किंवा रासायनिक पदार्थ, किरणोत्सर्गी पदार्थ असू शकतात. यामुळे विविध रोग होऊ शकतात. यासाठी पाणी शुद्ध आहे वा नाही हे तपासण्यासाठी त्याच्या प्रयोगशाळेत तपासण्या कराव्या लागतात. प्रयोगशाळेत पाण्याची भौतिक, रासायनिक व जैविक तपासणी केली जाते. या तिन्ही तपासण्यात जे पाणी सुरक्षित सिद्ध होईल तेच पाणी पिण्यास योग्य असते. सर्वसामान्यपणे पाण्याचे जैविक परीक्षण केले जाते, कारण रासायनिक तपासण्यांना जास्त वेळ लागतो. लोरिन, ब्लिचिंग पावडर आदिंचा वापर करून पाणी जैविकदृष्ट्या शुद्ध करता येते. अगदी घरच्या घरीही लोरिनच्या गोळ्या वा द्रावण वापरून पाणी शुद्ध करता येईल. पाणी हे जीवन असले तरी दूषित पाणी दरवर्षी लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत होत असते. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण फार महत्त्वाचे असते.
वास्तू
वास्तुत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता वाटू लागल्यास देवापुढे अखंड (चोवीस
तास) नंदादीप तेवत ठेवण्याची पद्धत आहे. यायोगे घरात हळूहळू शांतता निश्चितपणे
निर्माण होते, असा अनुभव आहे. हा नंदादीप वार्याने वगैरे चुकून विझला, तर एवढे मनाला
लावून घेऊ नये. तो पुन्हा लावावा व त्याला नमस्कार करावा. ह्या नंदादीपाच्या वातीचे
तोंड नेहमी पूर्व वा उत्तर दिशेलाच असावे.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
शाही खिचडी
शाही खिचडी
साहित्य – ३ वाट्या दिल्ली राईस, दीड वाटी मुगाची डाळ, १ बटाट्याचे मध्यम काप,
हिंग, हळद, १ वाटी मटार दाणे, २ कांदे, २ इंच आलं, तूप, १५-२० लसूण पाकळ्या, मिरच्या,
दही, थोडे काजू, बदाम, बेदाणे, जिरे, मीठ, गरम मसाला आणि सुया मिरच्या.
कृती – खिचडी करण्याच्या आधी १ तास अगोदर डाळ व तांदूळ एकत्र करून धुवून
ठेवावे. कांदे उभे पातळ चिरावे. पातेल्यात तूप तापवून काजू, बदाम, बेदाणे तळून घ्यावे. त्याच
तुपात कांदा तळून घ्यावा. कांदा लालसर कुरकुरीत तळावा. आलं लसणाची पेस्ट करावी. पातेल्यात तूप तापवून
हिंग, जिरे, हळद, सुया मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट घालून हे सर्व जिन्नस परतावे. त्यात
डाळ, तांदूळ, बटाटे, मटार दाणे टाकावेत. ते चांगले परतून तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे.
चवीनुसार त्यात मीठ, गरम मसाला घालून मंद आचेवर खिचडी शिजू द्यावी. खिचडी वाढताना
ती गरमागरमच वाढावी.
डोकेदुखी होण्यामागची कारण
डोकेदुखी होण्यामागची कारण

उन्हाळ्यात घामावाटे खनिजांचे होणारे उत्सर्जन, तहान भागविण्यासाठी आईस्क्रीम किंवा कृत्रिम
शीतपेयांचा केलेला अतिरिक्त वापर, समतोल आहाराचा अभाव, अपुरी झोप, सतत दडपणाखाली
असलेला मेंदू, मानसिक ताणतणाव, वेळी-अवेळी खाणे, तेलकट, मैद्याच्या पदार्थाचा आहारात असलेला
समावेश या कुपथ्याने शरीरात विजातीय घटक साठतात याचा परिणाम म्हणजे डोकेदुखी होय.
दैनिक पंचांग शनिवार, दि. १७ फेब्रुवारी २०२४
रथसप्तमी, भीमाष्टमी, शके १९४५
शोभननामसंवत्सर, माघ शुलपक्ष, भरणी ०७|४७
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
राशिभविष्य
मेष : प्रवासात दगदग, पती पत्नीतील मतभेदांना थारा देवू नका. कार्यालयामध्ये वरिष्ठांशी आदबीने वागा. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी.
वृषभ : आर्थिक लाभ, सर्व कार्यात यश, जागा खरेदीसाठी चांगला दिवस. वाहनसुख मिळेल. दिवस अत्यंत आनंददायक वातावरणात जाईल.
मिथुन : संततीविषयक समस्या, खर्चात वाढ, व्यापारात मंदी जाणवेल. मागील उधारी उसनवारी वसूल होईल. पितृचिंता सतावेल.
कर्क : स्थावर इस्टेटी संदर्भात अडचणी, राजकारण्यांना अती ताण. मागील भाऊबंदकी डोके वर काढेल.
सिंह : सर्व प्रकारचे लाभ, प्रवासात यश, व्यावसायिक प्रगती. मित्रांमध्ये मिळून मिसळून वागाल. कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. शत्रू प्रभावहीन ठरतील.
कन्या : वैवाहिक जोडीदाराच्या चुकीमुळे आर्थिक तणाव वाढेल. पत्नीकडून उत्तम विवाहसौख्य मिळेल. दिवस आनंदात जाईल.
तूळ : आप्तजनाशी वितुष्ट, शारीरिक आळस वाढेल. मातृचिंता सतावेल. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.
वृश्चिक : योग्य विचारसरणीमुळे व्यक्तींना नमवाल. मागील पुर्वसुकृत फळास येण्यासाठी चांगला दिवस.
धनु : सर्व क्षेत्रात प्रगतीची घोडदौड, धनलाभ, वास्तुचे योग. जुने मित्र भेटण्याचे उत्तम योग आहेत.
मकर : आर्थिक उत्पन्न वाढेल, कमाईचे नवे साधन उपलब्ध होईल. वडीलोपार्जीत मालमत्तेमधून मोठे लाभ संभवतात.
कुंभ : करणीबाधा व शत्रुपीडेमुळे मानसिक त्रास होईल. दिवस वाईट आहे मात्र संयमाने वागल्यास यश मिळेल.
मीन : कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी, वाईट संगत व व्यसनापासून दूर राहा. संततीसौख्य लाभेल. दूरचे प्रवास होतील. महत्वाकांक्षा वाढतील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.




