बंटी : बाबा कायदा आपल्याला
एकापेक्षा जास्त लग्न का करू
देत नाही?
बाबा : बेटा, मोठा झाल्यावर
तुला कळेल की कायदा आपला
रक्षक असतो !
खरा शिष्य कोण?
खरा शिष्य कोण?
एकदा दोन तरुण स्वामी विवेकानंदांकडे गेले. त्यांना स्वामीजीचे शिष्य व्हायचे होते. तसे त्यांनी सांगितले. तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्थ बसले. दुसरे दिवशी तोच प्रकार – कंटाळले- पण एकजण स्वामीजींची रोज पूजा करे तर दूसरा त्यांना दोष देई, तुमच्यात माणुसकी नाही, तुम्ही कठोर आहात वगैरे, पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात. दोघांनाही वाटे आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहे. एकजण रोज पूजा करी. दूसरा दोष देई. एक दिवस नदीला पुर आला पहिल्याने ईलाजाने आपल्या काठावरच पूजा-स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला. दोष देणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करुन आला. असे तीन दिवस चालले. चौथ्या दिवशी पुर ओसरला. दोघेही गेले. स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देण्यार्याला शिष्य म्हणून स्वीकारले. ते म्हणाले, शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करुण येतो. निष्ठा हवी. तामसी वृत्ती बदलता येईल. पण कच खाणारी निष्ठा बदलता येणार नाही.
तात्पर्य : खरी निष्ठा महत्त्वाची.
एनिमा म्हणजे काय?
एनिमा म्हणजे काय?
शौचास होत नसेल, तर कधी रुग्णास शस्त्रक्रियेपूर्वी पोट साफ होण्यासाठी गुदद्वाराच्या मार्गाने काही औषधी मोठ्या आतड्यात सोडतात, यास ‘एनिमा’ असे म्हणतात. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नसल्यास व आहार समतोल नसल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होतो. कधी कधी मळाचे खडेही तयार होतात. लहान मुलांना संडास होत नसेल, तर कागदाची पुंगळी करून त्याला साबण लावून ती गुदद्वारात सारल्यास संडास होते किंवा गोडेतेल सोडल्यासही मळाचे खडे सुटतात व न दुखता संडास होते. संडास होत नसल्यास पोटातून औषध घेण्यापेक्षा गुदद्वारातून उपचार करणे सोयीचे ठरते. एनिमामध्ये पाव लिटर, अर्धा लिटर साबणाचे पाणी रबरी नळीच्या साहाय्याने व्यक्तीच्या गुदद्वारातून आत सोडतात. नंतर मळाचे खडे सुटून संडास होते. विष्ठा गोळा करण्यासाठी भांड्याची सोयसुद्धा असते. आयुर्वेद चिकित्सापद्धतीने गुदद्वारावाटे औषधी प्रविष्ट करून चिकित्सा केली जाते. या चिकित्सेस बस्ती चिकित्सा म्हणतात. मळास बाहेर काढणे याशिवाय इतर अनेक व्याधींची चिकित्सा, औषधी काढे व तेल गुदद्वारावाटे देऊन केली जाते. एनिमाचा वापर वारंवार करण्यापेक्षा आहारात योग्य ते बदल घडवून आणणेच आरोग्यपूर्ण जीवनाच्या दृष्टीने चांगले
सल्ला
* एक मूठ भुईमुगाचे दाणे भाजून दहा ग्रॅम गुळासोबत चावून खावे. न्याहारीच्या वेळेस
असे केल्यास आवश्यक मात्रेत उर्जा प्राप्त होते. हिवाळ्यात शरीरास उर्जेची आवश्यकता
असते.
* अॅण्टीऑसिडंट मोठ्या प्रमाणात असतात त्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत असे मानले जाते. स्वीडनच्या अध्ययनकर्त्यांच्या एका दलाने असा खुलासा केला आहे की डार्क चॉकलेट मध्ये मोठ्या प्रमाणात ‘कोकोवा’ असते.
ज्यामध्ये केटेचींस आणि प्रोसाइनीडाइंस फार अधिक असते, जे रक्तदाबावर परिणाम करते. ब्रिटीश वृत्तपत्र ‘डेली एसप्रेस’ने इंग्रीड यांच्या या संदर्भात सांगितले आहे की संतुलित आहार घेऊन तसेच धूम्रपानापासून दूर राहून डार्क चॉकलेटचे सेवन करणे हा हृदयरोग राखण्यात आणि हृदयघाताचा धोका कमी करण्याचा एक चांगला उपाय आहे.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
ऑरेंज लाडू
ऑरेंज लाडू

साहित्य : साडेतीन वाटी बारीक रवा, ४ वाट्या साखर, १ वाटी तूप, दीड वाटी
खवलेला नारळ, २ वाट्या संत्र्याचा रस, थोडे दूध, अर्धा टीस्पून ऑरेंज इसेन्स.
कृती : रवा तुपावर गुलाबी भाजून घ्या.नारळ थोडा वेगळा भाजून घेऊन रव्यात मिस
करा. साखरेत ऑरेंज ज्यूस घालून दोन तारी पाक करा. त्यात रवा-नारळ मिश्रण घालून
नीट ढवळा. इसेन्स घाला. थोडे गार झाल्यावर किंचित दुधाचा हात लावून लाडू वळा
पौष्टिकता असलेले फणस
पौष्टिकता असलेले फणस

फणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. व्हिटॅमिन ए, सी, थायमिन, पोटॅशियम,
कॅल्शियम, लोह यांचा फणसात मोठ्या प्रमाणात समावेश असतो. पिकलेल्या फणसाचा पल्प
करून तो पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास ताजेतवाने तर वाटतेच, पण हृदयाचे विकार
जडलेल्या व्यक्तींना त्याचा फायदाही होतो. फणसात मोठ्या प्रमाणावर असणारे पोटॅशिअम
रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू
शकतो. हाडांसाठी फणस खाणे खूप गुणकारी असते. या फळात असलेले मॅग्नेशियम आणि
कॅल्शियम हाडांसाठी गुणकारी असते
दैनिक पंचांग बुधवार, दि. ६ मार्च २०२४
विजया (स्मार्त) एकादशी, शके
१९४५ शोभननामसंवत्सर, माघ कृष्णपक्ष, पू.षा.१४|५२
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३१ मि.
राशिभविष्य
मेष : दिवस अनुकूल व महत्वाचा असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळेल. विशिष्ट कार्य पूर्ण होतील.
वृषभ : नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील. आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल.
मिथुन : वाहने काळजीपूर्वक चालवा. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. प्रेयसीशी संपर्क होण्याची शयता आहे.
कर्क : व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ होईल. लेखन कार्यात यश मिळेल. कोणतीही अर्ज देण्यासाठी उत्तम वेळ.
सिंह : कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्ये पूर्ण होतील. उल्हासाचा अनुभव येईल. शीघ्र अनुकूल परिस्थिती होईल.
कन्या “ मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.
तूळ : आपल्या आत्मविश्वासाचे, जोखीम घेण्याच्या वृत्तीचे प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी नवीन मार्ग काढण्याच्या आपल्या गुणांचे
वरिष्ठांकडून कौतुक होईल.
वृश्चिक : येणारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल. एखाद्या प्रोजेटसाठी किंवा महत्त्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न
वाढविण्याची वेळ आली आहे.
धनु : आपल्या आयुष्यावर झालेले परिणाम पाहण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल गंभीररीत्या विचार करण्यासाठी या वेळी आपणास एकांताची आवश्यकता असू शकते.
मकर : आज नवीन संबंध स्थापित करणे, माहितीची देवाण-घेवाण व मीटिंगच्या माध्यमातून शिकवण्याची किंवा शिकण्याची संधी मिळण्याची शयता आहे.
कुंभ : त्याची कसोटी घेणारा हा दिवस आहे. आपणास अधीर आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटेल आणि कोणत्याही प्रतिस्पर्धी प्रयत्नासाठी हा वेळ उत्तम आहे.
मीन : अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. आपल्या प्रयत्नांमध्ये इतर लोकांची मदत घेतल्याने आपले कार्य किंचित सोपे होईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.





