जेनेटीक मॅपिंग म्हणजे काय?

जेनेटीक मॅपिंग म्हणजे काय?

माणसाच्या प्रत्येक पेशीत ४६ रंगसूत्रे असतात. ही रंगसूत्रे २३ जोड्यांच्या स्वरूपात असतात. यापैकी २२ जोड्या शरीरसूत्रांच्या, तर १ जोडी लिंगसूत्राची असते. व्यक्तीची शारीरिक ठेवण, डोळ्यांच्या रंग, केसांचा रंग, केसांचा प्रकार, त्वचेचा रंग, उंची, लिंग या सर्व बाबी रंगसूत्रांवर अवलंबून असतात. रंगसूत्रामध्ये वा जनुका असतात. या जनुकांवर एकेक गुणधर्म अवलंबून असतो. काही आजार जनुकात झालेल्या बिघाडामुळे निर्माण होतात असे शास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे. या जनुका जर बदलता आल्या, तर ते आजार टाळता येतील. त्यासाठी माणसात आढळून येणार्‍या सर्व रंगसूत्रांचा, जनुकांचा शोध घेऊन त्यांची रचना लक्षात येणे आवश्यक होते. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांनी म्हणूनच युनेस्कोबरोबर एकत्रितपणे ह्यूमन जिनोम प्रोजेट सुरू केला होता. याची परिणती मानवी जनुकीय संरचना पूर्णपणे ज्ञात होण्यात झाली आहे. जनुकांची रचना माहीत करण्याची पद्धत म्हणजे जेनेटीक मॅपिंग होय. जेनेटीक मॅपिंग करण्यासाठी संबंधित व्यक्तीचे रक्त वा उतीद्रव्य घेण्यात येतात. प्रयोगशाळेत विविध प्रक्रिया करून शास्त्रज्ञ त्यातून डीएनए हा रंगसूत्रांतील मूलभूत घटक वेगळा करतात. या डीएनएवरील न्युलिओसाईड्सच्या विविध संरचनांचा अभ्यास करून कोणता रोग होण्याची शयता आहे याचे विश्लेषण केले जाते. भविष्यात अशा रोगग्रस्त जनुकांची दुरुस्ती किंवा त्यात बदल घडवून आणण्यात येऊ शकतील आणि जगातील अनेक रोग टाळता येतील किंवा बरे करता येतील अशी आशा निर्माण झाली आहे.

आल्याच्या चहाचे लाभ

आल्याच्या चहाचे लाभ
सकाळी एक कप आल्याचा चहा आपल्याला फक्त फ्रेशच करत नाही, तर अनेक
आजारांशी लढायलाही मदत करतो. आल्याच्या चहाचे अँटी इन्फ्लेमट्री, अँटी बॅटेरियल आणि
अँटी ऑसिडेंट गुण तब्येतीसाठी चांगले असतात.

सुविचार

मनुष्य स्वतःच स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे. : स्वामी रामतीर्थ

चॉकलेट शंकरपाळे

चॉकलेट शंकरपाळे

साहित्य : २ वाट्या मैदा, मोहनासाठी
आणि तळण्यासाठी तूप, पिठीसाखर, कणभर
मीठ, पीठ, भिजविण्यासाठी दूध, अर्धा टी
स्पून व्हॅनिला इसेन्स.
कृती : मैद्यामध्ये साखर, बेकिंग
पावडर, मीठ, व्हॅनिला इसेन्स घालून
नीट मिस करून घ्या. त्यात मूठ वळेपर्यंत
तुपाचे मोहन घालून, तूप सगळ्या मिश्रणाला
नीट चोळून घ्या. हा गोळा अर्धा तास झाकून
ठेवा. कोको पावडरमध्ये दूध घालून घट्टसर
गोळा मळा. भिजविलेले पीठ आणि कोकोचे
गोळा अलगद मिस करा. पूर्ण एकजीव न
करता कोकोच्या मार्बवसारख्या लाइन्स
दिसतील, असं मिस करा. मोठी पोळी
लाटून आवडीप्रमाणे शंकरपाळे लाटून तळा
किंवा ओव्हनमध्ये १८० अंश तापमानावर २०
मिनिटे बेक करा. या शंकरपाळ्यांवर वरून
डेमोरश शुगर भुरभुरा (ब्राऊन शुगर).

चेहर्‍याचा काळेपणा दूर करण्यासाठी

चेहर्‍याचा काळेपणा दूर करण्यासाठी
* मसूर डाळ रात्रभर भिजत ठेवून
सकाळी वाटून घ्यावी. त्यात मध किंवा
दही मिसळून चेहर्‍यावर लावीन १५-२० मि
निटापर्यंत तसेच ठेवावे. नंतर आंघोळ करावी.
त्याने काळेपणा दूर होऊन चमक येते.
* चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी
करण्यासाठी एक चमचे मुळ्याचा रस घेऊन
त्यात लोणी मिस करून चेहर्‍यावर लावावे.
२० मि. नंतर चेहरा धुवावा.

सल्ला

* केस गळू नयेत म्हणून रोज काळे
तीळ १ चमचा चावून खावेत.
* एक मूठ भुईमुगाचे दाणे भाजून दहा
ग्रॅम गुळासोबत चावून खावे. न्याहारीच्या वेळेस
असे केल्यास आवश्यक मात्रेत उर्जा प्राप्त
होते. हिवाळ्यात शरीरास उर्जेची आवश्यकता
असते.

वास्तू

* घराची पूर्व दिशा स्वच्छ व पवित्र
ठेवावी. या दिशेस पाण्याचा साठा करावा.
* मुलांचे अभ्यासाचे टेबल गोलाकार
असू नये. आयताकार, चौकोनी असावा.
‘कोन’ कट नसावे. त्याचप्रमाणे बुट-चपलांचे
स्टॅण्ड दारासमोर नसावे. घराला खेटून
कचराकुंडी नसावी.
* जर एखाद्या घरात वास्तुदोषांमुळे
वारंवार भांडणे होत असतील तर अशा घरात
खास करून आजारी माणसाच्या खोलीत
त्याच्या बिछान्याजवळ थोडेसे मीठ पाण्यात
मिसळून काचेच्या बाऊलमध्ये ठेवावे लाभ
होतो.
* घराच्या नैऋत्य (दक्षिण-पश्चिम)
दिशेला अंधार ठेवू नये. वायव्य (उत्तर-पश्चिम)
दिशेला लख्ख प्रकाशाचा बल्ब लावू नये.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

वडील : या वेळी नापास झालास तर यापुढे मला ’बाबा’
म्हणून हाक मारू नकोस चंद्या.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला,
वडील : काय लागला निकाल?
चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण
माझ्या नशिबात नाहीये बहुतेक…

दैनिक पंचांग मंगळवार, दि. ५ मार्च २०२४

श्रीरामदास नवमी, शके १९४५
शोभननामसंवत्सर, माघ कृष्णपक्ष, मूळ १६|००
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३१ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. आपणास आज संभाषणात काळजी घेण्याची गरज आहे.

वृषभ : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा.

मिथुन : आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल. वेळ अनुकूल आहे. व्यापार-व्यवसायासाठी छान दिवस. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक.

कर्क : आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत
काही योजना बनवू शकता. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा.

सिंह : पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात. स्वतःला इतर लोकांसमोर सादर करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

कन्या : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो.
इतर लोकांना तुमचे वचार पटतील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.

तूळ : बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. वेळेचे भान पाळा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.

वृश्चिक : व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. शत्रूंपासून सावध राहा. स्थिती अनुकूल राहील. खर्च वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा.

धनु : नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. स्त्री पक्षाकडे लक्ष ठेवा. अधिक श्रम करावे लागतील.

मकर : कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील चांगली बातमी आणणारा आहे. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

कुंभ : आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा. आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष द्या. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.

मीन : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंना भीती वाटेल. शत्रूंपासून सावध राहा. स्त्री पक्षाचा आधार मिळेल. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

औषध विक्रेत्याकडून तक्रारी सांगून औषधे घ्यावीत का?

औषध विक्रेत्याकडून तक्रारी सांगून औषधे घ्यावीत का?

एकदा एक गंमतशीर घटना बघायला मि ळाली. औषधे घ्यायला एका दुकानात गेलो होतो. तेवढ्यात एक गृहस्थ दुकानात आले व तावातावाने दुकानदाराशी भांडू लागले. “मी तुम्हाला संडास थांबण्यासाठी औषध मागितले होते ना?” दुकानदार म्हणाला, “अहो, मला वाटलं संडास होण्यासाठी औषध पाहिजे आहे!” हा झाला एक साधा किस्सा. याहून गंभीर व प्राणघातक ठरलेल्या घटनाही सांगता येतील. औषध व विष यात फक्त देणार्‍याच्या उद्देशाचा फरक आहे, असे म्हटले जाते. यावरून चुकीमुळे घेतलेल्या औषधांच्या परिणामाची कल्पना यावी. एकाचे औषध हे दुसर्‍यांसाठी विष ठरू शकते. डोकेदुखीसाठी उपयुक्त असे अ‍ॅस्पीरिन जठराचा व्रण असलेल्या व्यक्तीसाठी हानिकारक ठरू शकते. सल्फरच्या गोळ्यांनी एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगावर पुरळ येऊ शकते. काही औषधांमुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते. औषध विक्रेते फार्मसी अर्थात औषध निर्मिती शास्त्रातील पदविका वा पदवीधारक असायला हव्यात; पण बर्‍याचदा औषधे देण्याचे काम प्रशिक्षण न झालेल्या व्यक्तीच करतात. त्यामुळे त्यांना औषधांची माहिती नसते. तसेच औषधी निर्मितीतला पदवीधर देखील डॉटर नसतो व त्यामुळे त्याला रुग्णावर उपचार करण्याचा कायदेशीर अधिकार तर नसतोच, पण तेवढे ज्ञानही नसते. त्यामुळे वर उल्लेखल्याप्रमाणे किस्से घडतात. कधीकधी प्राणहानीही होऊ शकते. त्यामुळे औषध विक्रेत्याकडून डॉटरी सल्ल्याखेरीज व मार्गदर्शनाखेरीज कोणतीही औषधे घेऊ नयेत.