खरा शिष्य कोण?
एकदा दोन तरुण स्वामी विवेकानंदांकडे गेले. त्यांना स्वामीजीचे शिष्य व्हायचे होते. तसे त्यांनी सांगितले. तरी स्वामीजी डोळे मिटून स्वस्थ बसले. दुसरे दिवशी तोच प्रकार – कंटाळले- पण एकजण स्वामीजींची रोज पूजा करे तर दूसरा त्यांना दोष देई, तुमच्यात माणुसकी नाही, तुम्ही कठोर आहात वगैरे, पण दोघेही रोज येण्याचे थांबेनात. दोघांनाही वाटे आपणच त्यांचे शिष्य होण्यास योग्य आहे. एकजण रोज पूजा करी. दूसरा दोष देई. एक दिवस नदीला पुर आला पहिल्याने ईलाजाने आपल्या काठावरच पूजा-स्तोत्र वगैरे कार्यक्रम केला. दोष देणारा मात्र पुरातून जाऊन स्वामीजींची निंदा करुन आला. असे तीन दिवस चालले. चौथ्या दिवशी पुर ओसरला. दोघेही गेले. स्वामीजींनी डोळे उघडले व शिव्या देण्यार्याला शिष्य म्हणून स्वीकारले. ते म्हणाले, शिव्या देण्यासाठी का होईना तो संकटावर मात करुण येतो. निष्ठा हवी. तामसी वृत्ती बदलता येईल. पण कच खाणारी निष्ठा बदलता येणार नाही.
तात्पर्य : खरी निष्ठा महत्त्वाची.