वास्तू

* एझॉस्ट फॅन गॅसपासून योग्य
अंतरावर लावावा. गॅसवर हा पंखा असणे
चुकीचे असते.
* घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक
किंवा पिरॅमिड लावावे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

वडील : हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास,
मराठीत शून्य, वर्तवणूक वाईट,
अक्षर घाणेरडे.
मुलगा : बाबा, पुढे वाचा,
आरोग्य चांगले आहे.

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ८ मार्च २०२४

प्रदोष, महाशिवरात्री, शके १९४५ शोभननामसंवत्सर, माघ कृष्णपक्ष, धनिष्ठा
०७|५५, शततारा २८|५६
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : लोकांमध्ये मतभेद आणि अनोळखी लोकांचा विरोध आपणास अस्वस्थ करू शकते. आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल.

वृषभ : वेळेकडे लक्ष ठेवा. कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शयता आहे. बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते.

मिथुन : मनातल्या इच्छा पूर्ण होतील. उत्साहजनक बातम्या मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील.

कर्क : कौटुंबिक वातावरण आनंद आणेल. आर्थिक विषयांमध्ये आपल्या प्रयत्नांमुळे आपणास यश मिळेल. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो.

सिंह : करियरबद्दल आपण हट्ट धरू शकता. कठोर परिश्रम केल्यानंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत उन्नती होईल.

कन्या : महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. उत्साहवर्धक बातमी मिळाल्याने आनंद होईल.

तूळ : आपल्या कुटुंबात बर्‍याच काळापासून चालणारा एखादा वादाचा विषय आपणास अस्वस्थ करेल. व्यापारात आपल्या सेवेच्या मोबदल्यात योग्य लाभ मिळेल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी वेळ द्यावा.

वृश्चिक : काही गोष्टी आपल्या जीवनात आकस्मिकरीत्या आनंद आणतील. आपल्या नवीन आवडींना प्रोत्साहन द्या आणि जीवनात आलेल्या या परिवर्तनाचा आनंद घ्या. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल.

धनु : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे अडचणीत टाकू शकते. आज रात्री विश्रांती घ्या. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल.

मकर : आज आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो.
आनंदाची बातमी मिळेल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

कुंभ : मानसन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचे सहकार्य प्रगतीचे कारण बनेल. आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल.

मीन : ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. मानसन्मानात वाढ होईल. महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल.

                                                                                          संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते?

सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते?

जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये भिंगे अशा प्रकारे बसविलेली असतात की, त्यांच्या एकत्रित परिणामामुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात. पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप मि.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारोपट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतूंच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये; तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यांतदेखील सूक्ष्मदर्शकाद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते. असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.

सुविचार

ज्याप्रमाणे अंधारात मनुष्याची पडछाया त्याची साथ सोडून देते,
त्याप्रमाणे दुर्दैवाच्या फेर्‍यात सापडलेल्या मनुष्याचे आप्तेष्ट त्याची साथ सोडून देतात. : लाँगफेलो.

ब्लॅक टीचे होणारे लाभ

ब्लॅक टीचे होणारे लाभ
* जगभरातील प्रत्येकाची सुरुवात सकाळच्या चहाने होते. चहा प्यायल्याशिवाय फ्रेश
वाटत नाही. चहामुळे सुस्ती, आळस दूर होतो, मात्र या चहाचेही अनेक आरोग्यदायी फायदे
आहेत. दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी प्यायल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात. ब्लॅक टीचे
नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
* टी ट्रेड हेल्थ रिसर्च असोसिएशनच्या माहितीनुसार ब्लॅक टीमुळे तोंडात कॅव्हिटी निर्माण
होत नाही तसेच दातांचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. ब्लॅक टीमुळे हृदयाचे आरोग्यही
चांगले राहते.

अक्रोड सूप

अक्रोड सूप

साहित्य : १ मोठा चमचा अक्रोड
पावडर, १ मोठा चमचा अक्रोडचे लहान लहान
काप, १ मोठा चमचा क्रीम, १ मोठा चमचा
कॉर्नफ्लोअर, १ कप दूध, चवीनुसार मीठ,
१/४ लहान चमचा काळे मिरे.
कृति : सर्वप्रथम १ कप दुधात अक्रोड
पूड घालून शिजवून घ्यावे. कॉर्नफ्लोअरमध्ये
अर्धा कप पाणी घालून घोळ तयार करावा.
शिजत असलेल्या दुधात हा घोळ आणि
आवश्यकतेनुसार पाणी घालावे. मिश्रण
कालवत राहावे. यामुळे त्यात गोळे पडत
नाही. त्यात काळे मिरे आणि काप केलेले
अक्रोडचे तुकडे घालून गॅस बंद करावा. तयार
सूपमध्ये क्रीम घालून गरमा गरम सर्व्ह करावे.

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी
* वजन वाढलं असेल तर जेवणात
बटाटा व भात यांचे प्रमाण कमी करा. त्याऐवजी
डाळ, हिरव्या भाज्या व दुग्धजन्य पदार्थांचे
सेवन वाढवा. रात्रीचे जेवण झोपेच्या दोनय्तीन तास आधी घ्या. यामुळे सुलभ पचन
होऊन शांत झोप लागते. त्याचप्रमाणे जाडीही
कमी होते. दिवसभरात पर्याप्त प्रमाणात पाणी
प्या.
* मान स्वच्छ ठेवण्यासाठी शयतो
साबणाचा वापर करू नये. यासाठी
आठवड्यातून किमान दोनदा लिझिंग
मिल्कच्या सहाय्याने मान स्वच्छ करावी.

बरेचदा सेलोटेपचे टोक हातात सापडत नाही

* बरेचदा सेलोटेपचे टोक हातात
सापडत नाही. अशावेळी टेपचे बंडल फ्रीजम
ध्ये ठेवावे. टोक निघून येते.
* सतत शिंका येत असल्यास चहापत्ती
गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घ्यावी.

वास्तू

* घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक
किंवा पिरॅमिड लावावे.
* एझॉस्ट फॅन गॅसपासून योग्य
अंतरावर लावावा. गॅसवर हा पंखा असणे
चुकीचे असते.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.