वास्तुदोष घालविण्यासाठी
मधुर संगीत निर्माण करणारे भिंतीवरील
घड्याळ घरातील शुभ सकारात्मक उर्जेचे
संतुलन करते, असे फेंगशुईने मानले आहे.
किचनमध्ये जर एखादा वास्तुदोष असेल
तर त्यात दगडी व धातूची दक्षिणमुखी गणेश
प्रतिमा स्थापन करावी.
दैनिक पंचांग रविवार, दि. १० मार्च २०२४
दर्श अमावास्या, शके १९४५ शोभननाम संवत्सर, माघ कृष्णपक्ष, पू.भा.२५|५५
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
राशिभविष्य
मेष : साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र राहील.
वृषभ : मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. मागील उधारी उसनवारी वसूल होईल.
मिथुन : संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला तरी यश मिळेल.
नोकरदारांनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी. बेपर्वाईने वागु नका.
कर्क : कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील.
सिंह : जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल.
कन्या : मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शयता आहे. काळजीपूर्वक कार्य करा.
तूळ : मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे.
वृश्चिक : पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये वरिष्ठांचा सल्ला घेऊन पाउल टाका.
धनु : धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल.
मकर : आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. कार्यालयामध्ये सहकार्य मिळेल
कुंभ : आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. आरोग्य
नरम-गरम राहील. खाण्या-पिण्याविषयीची पथ्य पाळावी लागतील.
मीन : मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ वार्ता देखील मिळतील. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
इलेट्रोएन्केफॅलोग्राम म्हणजे काय?
इलेट्रोएन्केफॅलोग्राम म्हणजे काय?
मेंदूच्या कार्याचा आलेख म्हणजे इलेट्रोएन्केफॅलोग्राम (इइजी) होय. डोयाच्या त्वचेवर इलेट्रोड ठेवून किंवा क्वचित मेंदूच्या पृष्ठभागावर इलेट्रोड ठेवून यात मेंदूतील विद्युत प्रक्रियांचे आलेखन केले जाते. पहिला मानवी इइजी किंवा इलेट्रोएन्केफॅलोग्राम काढण्याचे श्रेय हॅन्स बर्जर या जर्मन शरीर क्रिया शास्त्रज्ञाकडे जाते. या तंत्राचा विकास पुढे डग्लस अॅड्रीयन याने केला. ब्रिटीश डॉटर विल्यम ग्रे वॉल्टरने इइजी टोपोग्राफी तंत्र विकसित केले. शरीराच्या सर्वच पेशींप्रमाणे मेंदूतील पेशींचे कार्यही विद्युत रासायनिक प्रक्रियांवर अवलंबून असते. मेंदूच्या कार्याच्या आलेखात अल्फा, बीटा, डेल्टा व थीटा या चार प्रकारची कंपने (वेव्हज्) आढळून येतात. या कंपनांची वारंवारता व आकार यानुसार मेंदूची दुखापत, एपिलेप्सी (फिटस्) तसेच मेंदूचे इतर आजार यांचे निदान करता येते. व्यक्ती मृत झाल्यास तिचा एन्केफॅलोग्राम म्हणजे एक सरळ रेष येते. असा आलेख सलग पाच मिनिटे मिळाल्यास व्यक्तीला ‘ब्रेनडेड’ असे म्हणता येते. विविध अवयव प्रत्यारोपणासाठी वापरायचे असल्यास व्यक्तीचे हृदय कार्यरत असेल तरी चालते, पण मेंदू मात्र मृत असायला हवा. अन्यथा त्या व्यक्तीचे अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येत नाहीत. आजकाल मेंदूच्या गाठी तसेच इतर रचनात्मक बिघाडामुळे होणार्या आजारांच्या निदानासाठी स्कॅन व एमआरआय या तपासण्यांचा प्रामुख्याने वापर होतो. या तपासण्यांना मदत म्हणून आणि एपिलेप्सीचे निदान करण्यासाठी इइजीचा वापर करण्यात येतो.
जेवणाच्या आधी गोड का खाऊ नये ?
जेवणाच्या आधी गोड का खाऊ नये ?
जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात
नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊन करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.
जेवण घेताना आपल्या जेवणात गोड पदार्थ हटकून असतात, मात्र काही वेळा आपण प्रथम गोड
पदार्थ खाण्यावर भर देतो. तो चुकीचा आहे. मसालेदार भोजनाच्या वेळी सुरुवात गोड पदार्थाने
करू नये. साधे भोजन करताना प्रथम भात, चपाती, भाजी, दही, ताक, रायता असा क्रम
असावा त्यानंतर गोड पदार्थ खावा. याबाबत महत्त्व सांगणारा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर प्रकाशीत
केला आहे. संगीत ऐकत भोजनाचा स्वाद कसा घ्यावा. गोड आधी का खाऊ नये. याचे मार्गदर्शन
करण्यात आले आह
केअर सरबत (टिकाऊ)
केअर सरबत (टिकाऊ)
साहित्य : पाणी ५०० मि.लि., साखर
१ कि., केशर काड्या ४-५, केशर इसेन्स
३-४ थेंब, वेलची पूड ८ ग्रॅ., सिट्रीक अॅसिड
अर्धा ते एक टी स्पून.
कृती :
साखर व पाणी एकत्र करा. ढवळत
पाक करा. कोमट पाक गाळून घ्या. केशर
काड्या याच पाकातील चमचाभर पाकात
प्रथम चुरडा व त्यात उरलेले सर्व जिन्न टाका.
ढवळा. निवल्यावर बाटलीत भरा.
व्हॅनिलाचा ‘डुप्लिकेट’
व्हॅनिलाचा ‘डुप्लिकेट’
अनेकांच्या आवडीच्या व्हॅनिला
आइस्क्रीममध्ये खरंखुरं व्हॅनिला नसतंच.
ओरिजनल व्हॅनिला फारच महाग असतो.
भारतीय चलनात व्हॅनिलाला प्रत्येक किलोमागे
अडीच ते तीन लाख रुपये मोजावे लागतात.
व्हॅनिलाच्या एका शेंगेची किंमत आहे दहा ते
बारा रुपये. इतकं महागडं उत्पादन फारसं
कोणाला परवडत नाही. त्यामुळे व्हॅनिलाप्रमाणे
असणार्या व्हॅनिलीन नावाच्या पदार्थाचा वापर
केला जातो. व्हॅनिलीन हा पदार्थ डांबरापासून
(कोलचार) बनतो. डांबरापासून आधी
पायप्रोनाल बनवतात. पायप्रोनाल हे डोयातील
उवा मारायचं औषध आहे. पायप्रोनालपासून
व्हॅनिलीन बनवतात. ज्याला व्हॅनिलीनसारखा
वास येतो. अशा व्हॅनिलायुक्त पदार्थामुळे
ल्युकोमिया किंवा ब्लड कॅन्सरसारखे आजार
वाढतात.







