हसा आणि शतायुषी व्हा!

छोट्या राघूनं विचारलं,
आई, माझी किंमत किती आहे गं?
आई : बाळा, माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे.
राघू : मग त्या लाखो रुपये किंमतीपैकी सध्या मला पतंग
आणायला फक्त एक रुपया देतेस का?

वास्तू

बेडरुममध्ये हे ठेवू नये
बेडरूममध्ये झाडू ठेवणे अशुभ होय.
याशिवाय टोपली, घमेले, मुसळ, कढई व
चिमटा या वस्तूही बेडरूममध्ये ठेवणे कटाक्षाने
टाळावे. त्यामुळे वाईट स्वप्न पडतात,
आजार-धुपार उद्भवतात, अकारण अतिचिंता
करण्याची प्रवृत्ती वाढते.

मानेवर डाग

केस धुतल्यानंतर जाड टॉवेलने हलया
हाताने चोळत केस धुवावेत. तसेच थोडा
वेळ टॉवेलमध्ये लपेटून ठेवावेत. गळ्यावर व
मानेवर कोणत्याही प्रकारचा डाग असल्यास
त्यासाठी काकडी वाटून पेस्ट बनवा. त्यात
थोडे दही मिसळून मानेवर व गळ्यावर लावा.
यामुळे डाग जाऊन रंगही उजळेल, असे किमान

१५ दिवस दर दिवसाआड करावे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

दैनिक पंचांग शनिवार, दि. ९ मार्च २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर,माघ कृष्णपक्ष, धनिष्ठा ०७|५५, शततारा
२८|५६
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो.

वृषभ : योजनाबद्धरीतीने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. अनपेक्षीत परिवर्तनामुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल.

मिथुन : मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील.

कर्क : काळजीपूर्वक कार्य करा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

सिंह : संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. काही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा.

कन्या : आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील.

तूळ : थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. आपणास वरिष्ठ अधिकार्‍याकडून समर्थन मिळेल.

वृश्चिक : आपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न कराल.

धनु : पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. इतर लोकांना आपला विचार विकण्याची आपली योग्यता अप्रतिम आहे.

मकर : मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल.

कुंभ : आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अडकलेली सरकारी कामे पूर्ण होतील. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता आहे.

मीन : चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे
शय आहे. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. आज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल.

                                                                                         संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

अँटीबायोटीस म्हणजे काय?

अँटीबायोटीस म्हणजे काय?

अँटीबायोटीस अर्थात प्रतिजैविकांचे आजकालच्या औषधोपचारांत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही डॉटर प्रतिजैविकांचा उपयोग केल्याखेरीज वैद्यक व्यवसाय करूच शकणार नाही, अशी आजची परिस्थिती आहे. अलेझांडर फ्लेमिंगने अपघाताने पेनिसिलीनचा शोध लावला व तेव्हापासून आजतागायत अनेक प्रतिजैविके विकसित करण्यात आली आहेत. बुरशीपासून ही प्रतिजैविके मिळतात. काही प्रतिजैविकांचे कृत्रिमरित्या तयार होणारे पर्यायही उपलब्ध झाले आहेत. प्रतिजैविके विविध मार्गांनी जंतूंचा नायनाट करतात. काही वेळी ती जिवाणूंचे पोषण त्याला मिळू देत नाहीत, कधी त्याच्या पेशीतील केंद्रकावर हल्ला चढवतात, तर कधी त्याला हानीकारक ठरणारे पदार्थ निर्माण करतात. जिवाणूही हुशार असतात. प्रतिजैविक योग्य प्रमाणात दिले नाही वा कमी दिवस दिले, तर जिवाणूंमध्ये त्या प्रतिजैविकाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होते. ही प्रतिकार शक्ती त्यांच्या पुढील पिढ्यांनाही आपोआप मिळू शकते. त्यामुळे त्या प्रतिजैविकांचा उपयोग त्या जिवाणूला मारण्यासाठी करता येत नाही. असे होऊ नये यासाठी प्रतिजैविके पुरेशा डोसमध्ये निदान ५ दिवस तरी द्यायला हवी. पेनिसिलीन, अँपीसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन, निओमायसीन, सेफॅलोस्पोरीन अशी प्रतिजैविके आजकाल औषधोपचारांत वापरली जातात. रोगी अत्यवस्थ असेल तर वा पचनसंस्थेतून प्रतिजैविकाचे शोषण होत नसेल तर ही प्रतिजैविके शिरेतून वा स्नायूमध्येही देता येतात. अशावेळी वावडे वा अ‍ॅलर्जीची विशेष काळजी घ्यावी लागते. प्रतिजैविके म्हणजे रुग्णांसाठी जणू वरदानच होय. क्षयरोग, कुष्ठरोग यांसारख्या असाध्य समजल्या जाणार्‍या रोगांपासून कॉलरा, विषमज्वर, घटसर्प, डांग्या खोकला अशा सर्वच रोगांवर प्रतिजैविकांमुळे हुकुमी उपचार करता येतात.

हे आहेत मेथ्या खाण्याचे फायदे

हे आहेत मेथ्या खाण्याचे फायदे
* मेथ्या खाण्याची पद्धत मेथ्यांचे दाणे कच्चे खाऊ नयेत. त्या भिजलेल्या किंवा मोड
आलेल्या स्थितीतच खाव्यात.
* ४ चमचे मेथ्या वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालाव्यात आणि सकाळी उठल्यावर त्या
चावून खाव्यात. त्याची चटणी करून खाल्ल्यासही त्याचे फायदे दिसून येतात.

सुविचार

प्रारब्धाचा व पुरुषार्थाचा मार्ग भिन्न आहे; परंतु जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा अद्भुत यश प्राप्त होत असते. : दयानंद सरस्वती

पायनॅपल मावा फ्रूट चॉकलेट

पायनॅपल मावा फ्रूट चॉकलेट

साहित्य : मावा ५० ग्रॅम, पायनॅपल
पल्प ७५ किंवा १०० ग्रॅम (चवीप्रमाणे), थोडी
साखर (२ चमचे), थोडे तूप.
कृती : मावा तुपात भाजा. भाजत
आल्यावर पायनॅपल पल्प टाका. घट्ट होईपर्यंत
हलवा. नंतर २ चमचे साखर टाका. परत घट्ट
होईपर्यंत मंद आचेवर परतवा. घट्ट झाल्यावर
खाली उतरवा. जरा थंड झाल्यावर बारीक
गोल गोळ्या करा. जरा सुकू द्या.
नंतर त्याला चॉकलेट रॅपिंग पेपरमध्ये
रॅप करा. फ्रिजमध्ये १५ मिनिटे ठेवा. नंतर
बाहेर काढा. (फ्रूट पल्प तुमच्या आवडीप्रमाणे
चिकू, अ‍ॅपल, बनाना, पेरू, द्राक्ष इ. फळांचा
घेऊ शकता.)

मानेसाठी लिझिंग मिल्क

मानेसाठी लिझिंग मिल्क
* मान स्वच्छ ठेवण्यासाठी शयतो
साबणाचा वापर करू नये. यासाठी
आठवड्यातून किमान दोनदा लिझिंग मि
ल्कच्या सहाय्याने मान स्वच्छ करावी.
* काकडीची पेस्ट बनवून घ्यावी. त्यात
थोडं दही मिसळून मानेवर लावल्याने डाग दूर
होतात.

सतत शिंका येत असल्यास

सतत शिंका येत असल्यास चहापत्ती
गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घ्यावी.