आईस्क्रीम मस्तानी

आईस्क्रीम मस्तानी

साहित्य : थंडगार दूध एक कप,
कोणत्याही आवडत्या फेवरचे आईस्क्रीमचे अर्धे
स्क्रप, रोझ सिरप एक टी स्पून, बदाम व काजू
खापा अर्धा टे. स्पून, साखर चवीनुसार.
कृति : ग्लासच्या तळाला आईस्क्रीम
घाला. त्यावर रोझ सिरप घाला. दुधात हवी
तर आधीच थोडी साखर घोळवून ठेवा.
आईस्क्रीमवर दूध ओता. त्यावर ड्रायफ्रूटस्
घाला. अलगद ढवळा व प्या.
टीप – पिस्ता, आंबा, केशर, पिस्ता
यापैकी कोणत्याही फेवरचे आइस्क्रीम
वापरावे.

आमलेल्या त्वचेसाठी

आमलेल्या त्वचेसाठी
* जर आपली त्वचा आमली असेल तर
बेसनासारखी दुसरी वस्तू नाही. गुलाबपाण्यात
बेसन मिसळून उटणे तयार करा.
* चेहर्‍यावर व शरीरावर लावा. नंतर
स्नान करा. अत्यंत उत्साही तर वाटतेच परंतु
सुगंधही येतो.
* त्वचेवर दररोज मध लावल्यास
त्वचेवरील डाग कमी होतात. तसेच त्वचेचा
रुक्षपणाही नाहीसा होतो.
* चेहर्‍यावर मुरुम असतील तर तुळस,
पुदिना, कडूलिंबाच्या पानाची पेस्ट १५ ते २०
मिनिटे लावून ठेवा.

वास्तू

* कन्या दर्शनावेळी कन्येने फिक्कट
पिवळे किंवा गुलाबी वस्त्र धारण करावे.
कन्येच्या शयनगृहात शंकर-पार्वती किंवा म
हालक्ष्मी-विष्णूची तस्वीर असावी. बाहेरच्या
कक्षात मोर-लांडोर किंवा हंस-हंसिणीची
जोडी असावी.

वापरलेली चहाची पावडर फेकून नये

* वापरलेली चहाची पावडर फेकून न
देता ती गुलाबाच्या रोपट्याच्या कुंडीत वाळवून
टाकावी. खतासारखा उपयोग होतो.
* स्टीलची भांडी, सिंक व नळाच्या
तोट्या इ. स्वच्छ करण्यासाठी सोडा वापरा.
त्यामुळे ती नव्यासारखी चमकू लागतील.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

रात्री झोपताना,
मॉम म्हणते : गुड नाईट बेबी,
माँ म्हणते : शुभ रात्री बेटा,
आणि … आई म्हणते : चुलीत घाल तो मोबाइल आणि
झोप आता.

दैनिक पंचांग मंगळवार, दि. १२ मार्च २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, रेवती २०|३०
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वादाची स्थिती टाळाल.

वृषभ : कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी. वादाची स्थिती टाळा. आर्थिक नुकसानाची शयता आहे. प्रशासकीय कामे पूर्ण होतील.

मिथुन : आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका. महत्वाकांक्षा वाढतील. शत्रू वर्ग पराभूत होईल. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम.

कर्क : यथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी.

सिंह : बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. आर्थिक नुकसानाची शयता आहे. शत्रू वर्ग पराभूत होईल. महत्वाकांक्षा वाढतील.

कन्या : दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते पण नंतर आपल्या मनात अनेक प्रकारच्या काळज्या घर करू शकतील. अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील.

तूळ : मित्रांबरोबर सामुदायिक उपक्रम किंवा पिकनिकच्या रूपात दिवसाचा आनंद घेऊ शकता. आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी स्वतःचे सादरीकरण योग्य पद्धतीने करा. आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका.

वृश्चिक : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. दिवस चांगला आहे. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. मान-सन्मान वाढेल. दिवस चांगला आहे.

धनु : आज पैसे आणि बळाची विशेष भूमि का राहील. नंतर केव्हातरी एखाद्या सामाजिक समारंभात आपल्या विचारांचा परिणाम होईल. आपल्या छान वागण्याने इतरांना हवेहवेसे वाटू शकता.

मकर : महत्वाच्या बातम्या मिळाल्याने आपण एक सुखद परिस्थितीत आपणास बघाल. नोकरीपेशा व्यक्तींना अनुकूल परिस्थितीत असल्याचे जाणवेल. यथायोग्य विचार करून कामे कराल.

कुंभ : जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा
व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील.

मीन : आर्थिक व व्यापारिक मुद्द्यांबद्दल आपले गंभीर विचार श्रेयस्कर ठरतील. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एकांतात वेळ घालवण्याची आपली इच्छा पूर्ण होण्याची शयता आहे. बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल.

                                                                                   संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

किरणोपचार म्हणजे काय?

किरणोपचार म्हणजे काय?

अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणूबाँबसारख्या विध्वंसक अस्रामुळे होणार्‍या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणामच खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग, इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गापैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात. क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणार्‍या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी-अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचेच दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही, हे बघण्यासाठी होतो. गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या साहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यतः शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.

अ‍ॅसिडीटी टाळण्यासाठी उपाय

अ‍ॅसिडीटी टाळण्यासाठी उपाय
उपाशीपोटी राहण्याची सवय टाळा. आजच्या जीवनात पोट रिकामे ठेवून दिवसभर कामात
व्यस्त राहणार्‍या व्यक्तींना हा त्रास खात्रीने होतो. जेवणाच्या वेळा ठराविक असाव्यात. दर चार
तासांनी थोडे थोडे खावे. रात्री जेवल्यावर अर्धा तास शतपावली करावी. चालण्याचा व्यायाम
करून वजन आणि विशेषत: पोट कमी करावे.

सुविचार

जो स्त्रीपासून उत्पन्न झालेला आहे; असा कोणताही माणूस मग तो शूर असो वा भेकड असो; आपले नशीब कधीच बदलू शकणार नाही.

पाचक

पाचक
अनेक वेळा अपचन, मळमळ, उलटी,
पचन नीट न होणे या तक्रारीवर जो एक घरगुती
उपाय केला जातो. तो म्हणजे पाचक खाणे.
आता हे पाचक कशाचे अन् कसे बनवले जाते
ते पाहू या –
साहित्य : २५० ग्रॅम आले, सहा रसदार
लिंबे, एक वाटी साखर, १ चहाचा चमचाभर
मीठ, २५ ग्रॅम काळ्या मनुका, चवीनुसार
शेंदेलोण, पादेलोण.
कृती : प्रथम आले स्वच्छ धुऊन घ्या.
मग ते किसून घ्या. लिंबाचा रस काढून घ्या.
त्या रसात साखर, मीठ, शेंदेलोण, पादेलोण,
काळ्या मनुका हे पदार्थ चवीनुसार घाला.
मग त्या रसात आपण किसलेले आले घाला
अन् नीट ढवळून बंद झाकणाच्या बाटलीमध्ये
भरून ठेवा. हे पाचक अबाल-वृद्धांना अजीर्ण
झाले, अपचन झाले, मळमळ होत असेल,
तोंडाला चव नसेल तर थोडेसे खायला द्या.
तसेच हे पाचक पाण्यात मिसळून ते पाणी
प्यायले तरी पण फायदा होतो.