दैनिक पंचांग रविवार, दि. १० मार्च २०२४

0
36

दर्श अमावास्या, शके १९४५ शोभननाम संवत्सर, माघ कृष्णपक्ष, पू.भा.२५|५५
सूर्योदय ०६ वा. २८ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. व्यापार-व्यवसायात स्थिती संमिश्र राहील.

वृषभ : मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. मागील उधारी उसनवारी वसूल होईल.

मिथुन : संभाषणात सावधगिरी बाळगावी लागेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. कार्यात विलंब झाला तरी यश मिळेल.
नोकरदारांनी इतर व्यक्तींची मदत घेऊन कामे करावी. बेपर्वाईने वागु नका.

कर्क : कौटुंबिक विषयांमध्ये आशादायक काळ आला आहे. खर्च अधिक होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. व्यापार व्यवसायात आशादायक परिणाम मिळतील.

सिंह : जोखीम असलेल्या कार्यात गुंतवणूक टाळा. आर्थिक स्थितीत हळू-हळू सुधार होईल.

कन्या : मित्रांचा पाठिंबा मिळेल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शयता आहे. काळजीपूर्वक कार्य करा.

तूळ : मोठ्यांचा सल्ला घ्या. आरोग्य चांगले राहील. एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल. आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ उत्तम आहे.

वृश्चिक : पैशासंबंधी स्थिती ठीक राहिल. इच्छित विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये वरिष्ठांचा सल्ला घेऊन पाउल टाका.

धनु : धर्मविषयक कामामध्ये पैसा खर्च होईल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल साहाय्याबरोबर सन्मान वाढेल. आपणास समाधानकारक स्थिती मिळेल.

मकर : आर्थिक विषयांमध्ये स्थिती चांगली राहील. स्त्री पक्षाकडून लाभ मिळेल. कार्यालयामध्ये सहकार्य मिळेल

कुंभ : आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. आरोग्य
नरम-गरम राहील. खाण्या-पिण्याविषयीची पथ्य पाळावी लागतील.

मीन : मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ वार्ता देखील मिळतील. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल.

                                                                                     संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.