मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
35

इलेट्रोएन्केफॅलोग्राम म्हणजे काय?

मेंदूच्या कार्याचा आलेख म्हणजे इलेट्रोएन्केफॅलोग्राम (इइजी) होय. डोयाच्या त्वचेवर इलेट्रोड ठेवून किंवा क्वचित मेंदूच्या पृष्ठभागावर इलेट्रोड ठेवून यात मेंदूतील विद्युत प्रक्रियांचे आलेखन केले जाते. पहिला मानवी इइजी किंवा इलेट्रोएन्केफॅलोग्राम काढण्याचे श्रेय हॅन्स बर्जर या जर्मन शरीर क्रिया शास्त्रज्ञाकडे जाते. या तंत्राचा विकास पुढे डग्लस अ‍ॅड्रीयन याने केला. ब्रिटीश डॉटर विल्यम ग्रे वॉल्टरने इइजी टोपोग्राफी तंत्र विकसित केले. शरीराच्या सर्वच पेशींप्रमाणे मेंदूतील पेशींचे कार्यही विद्युत रासायनिक प्रक्रियांवर अवलंबून असते. मेंदूच्या कार्याच्या आलेखात अल्फा, बीटा, डेल्टा व थीटा या चार प्रकारची कंपने (वेव्हज्) आढळून येतात. या कंपनांची वारंवारता व आकार यानुसार मेंदूची दुखापत, एपिलेप्सी (फिटस्) तसेच मेंदूचे इतर आजार यांचे निदान करता येते. व्यक्ती मृत झाल्यास तिचा एन्केफॅलोग्राम म्हणजे एक सरळ रेष येते. असा आलेख सलग पाच मिनिटे मिळाल्यास व्यक्तीला ‘ब्रेनडेड’ असे म्हणता येते. विविध अवयव प्रत्यारोपणासाठी वापरायचे असल्यास व्यक्तीचे हृदय कार्यरत असेल तरी चालते, पण मेंदू मात्र मृत असायला हवा. अन्यथा त्या व्यक्तीचे अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येत नाहीत. आजकाल मेंदूच्या गाठी तसेच इतर रचनात्मक बिघाडामुळे होणार्‍या आजारांच्या निदानासाठी स्कॅन व एमआरआय या तपासण्यांचा प्रामुख्याने वापर होतो. या तपासण्यांना मदत म्हणून आणि एपिलेप्सीचे निदान करण्यासाठी इइजीचा वापर करण्यात येतो.