आजारानंतर केस का गळतात?

आजारानंतर केस का गळतात?

केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने यांद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटीन, मेलॅनिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, इ, प्रथिने, स्निग्धांश यांमुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते. तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्यांची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणार्‍या क्वाशिओरकॉर या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे ओढले तरी पटकन उपटले जातात.

टीव्ही पाहण्याने मुलांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त

टीव्ही पाहण्याने मुलांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त
अनेक मुले टीव्हीला चिकटून बराच वेळ कार्यक्रम बघत असतात, पण रोज तीन तास
टीव्ही पाहिल्याने मधुमेहाची शयता मुलांमध्ये जास्त वाढते, असे एका अभ्यासात म्हटले आहे.
संशोधकांच्या मते जास्त काळ टीव्ही पाहणे किंवा संगणकासमोर बसून राहणे यामुळे शरीरातील
चरबी वाढते व इन्शुलिन संवेदनशीलता कमी होते. टीव्ही किंवा संगणकापुढे तीन किंवा त्यापेक्षा
अधिक तास बसून राहिल्याने मुलामुलींना कमी वयात टाइप २ मधुमेह होतो.

सुविचार

नशिबात जे लिहिलेले आहे; ते विधिलिखित कोणी बदलवू शकत नाही. – संत तुलसीदास

टोमॅटो धिरडे

टोमॅटो धिरडे
साहित्य – तांदूळ पीठ पाऊण कप,
तिखटपूड २ लहान चमचे, आले कीस १
लहान चमचा, साखर २ लहान चमचे, मीठ,
तेल, लालसर टोमॅटो २.
कृति – टोमॅटो उकडत घाला. त्यावर
थोडासा लिंबूरस पिळा. झाकण ठेवू नये.
शिजल्यावर त्याचा रस काढून चाळणीतून
२-३ वेळा गाळून घ्या. मग रस गार झाल्यावर
त्यात तांदूळ पीठ, तिखट, मीठ, साखर, आले
कीस घाला व चांगले एकजीव मिश्रण तयार
करा. मंद आचेवर तव्यावर अथवा फ्राय पॅनवर
बेताची धिरडी घालून चांगली भाजून आवडत
असेल तर एखादी कोरडी भाजी धिरड्यावर
घालून ते गुंडाळून गरम गरम खावे.

काळी वर्तुळे असल्यास

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी
डोळ्याखालील काळी वर्तुळे असल्यास
बदामाचे तेल व केळ्याचा कुस्करलेला गर
एकत्र करू नियमित लावावे.

किचनमध्ये वास येऊ लागतो

बर्‍याचदा किचनमध्ये वास येऊ लागतो.
यासाठी दोन कप पाण्यात अर्धा कप व्हिनेगर
मिसळून उकळून घ्या व वास येत असलेल्या
जागी ओता.

वास्तू

* घरातील कोणत्याही खोलीत काटेरी
रोपटे, झाड लावू नये.
* चीक निघणार्‍या वनस्पतीही
घरात लावणे अशुभ आहे.
त्यामुळे कौटुंबिक जीवनात बेकी, दुही,
मतभेद, कलह, विणतंडवाद वाढीस लागतात.
* घरातील कोणत्याही खोलीत काटेरी
रोपटे, झाड लावू नये. * चीक निघणार्‍या
वनस्पतीही घरात लावणे अशुभ आहे.
त्यामुळे कौटुंबिक जीवनात बेकी, दुही,
मतभेद, कलह, विणतंडवाद वाढीस लागतात.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

आई – बिट्टू, तू बाबांच्या पत्राचं उत्तर दिलस का?
बिट्टू – नाही.
आई – का?
बिट्टू – आई, तुच सांगितलंस ना की आपल्यापेक्षा
मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून.

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. १५ मार्च २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, कृत्तीका १६|०८
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. पारिवारिक वाद विकोपास जातील.

वृषभ : आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील. आपली चूक स्वीकारावी लागेल.

मिथुन : मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील.

कर्क : नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक.

सिंह : कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील. खर्चाची चिंता राहील.

कन्या : पारिवारिक वाद वाढतील. खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल. निश्चितेने काम करा. बातमी मिळेल.

तूळ : कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्‍यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे.
विरोधकांपासून दूर रहा.

वृश्चिक : आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानी होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता.

धनु : नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका.

मकर : आपले निर्णय, विचार दुसर्‍यांवर थोपू नका. वेळेच महत्व समजा. आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ : आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.

मीन : यश मिळणार नाही. अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील. वेळ सत्कारणी लागेल. सांगण्यावर विश्वास ठेवू नका.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

कान का खाजतात?

कान का खाजतात?

सार्वजनिक ठिकाणी कानात बोट घालून कान गदागदा हलवणारे किंवा कानात काड्या घालून तल्लीन होऊन कान कोरणारे महाभाग तुम्ही पाहिले असतील. कान कोरडा पडला तर थोडीफार खाज येऊ शकते. ही खाज आपोआपच कमी होते; परंतु कानाच्या काही रोगांमध्ये मात्र खाज सारखीच येत राहते व उपचार केल्याशिवाय कमी होत नाही. पावसाळ्यात, दमट वातावरणात किंवा पोहणार्‍या व्यक्तींमध्ये कर्णपथात बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. अ‍ॅस्परजीलस, नायगर व कँडीडा अल्बीकन्स या बुरशींमुळे होणार्‍या संसर्गात कान खाजतात व बहिरेपणाही येतो. कानाची तपासणी केल्यास कर्णपथात काळपट वा विटकरी-काळपट रंगाची घाण जमा झालेली दिसते. ओल्या वर्तमानपत्राच्या बोळ्यासारखा रंग त्या घाणीला येतो. कानातील घाण वारंवार काढून टाकणे, पुसून घेणे, सॅलीसिलिक अ‍ॅसिड कर्णपथात लावणे, निस्टॅटीनसारखे बुरशीनाशक वापरणे अशा विविध उपायांनी हा रोग पूर्णपणे आटोयात येतो. कानावर अ‍ॅलर्जीमुळे किंवा जंतूसंसर्गामुळे फोड आले, तरीही कान सुरुवातीच्या काळात अथवा फोड फुटून खपली येण्याच्या काळात खाजतात. यावर अ‍ॅलर्जी व जंतुसंसर्गावरील उपचार करावे लागतात.