टीव्ही पाहण्याने मुलांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त

0
41

टीव्ही पाहण्याने मुलांमध्ये मधुमेहाचा धोका जास्त
अनेक मुले टीव्हीला चिकटून बराच वेळ कार्यक्रम बघत असतात, पण रोज तीन तास
टीव्ही पाहिल्याने मधुमेहाची शयता मुलांमध्ये जास्त वाढते, असे एका अभ्यासात म्हटले आहे.
संशोधकांच्या मते जास्त काळ टीव्ही पाहणे किंवा संगणकासमोर बसून राहणे यामुळे शरीरातील
चरबी वाढते व इन्शुलिन संवेदनशीलता कमी होते. टीव्ही किंवा संगणकापुढे तीन किंवा त्यापेक्षा
अधिक तास बसून राहिल्याने मुलामुलींना कमी वयात टाइप २ मधुमेह होतो.