आरोग्यदायी गवती चहा
आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठ्या तक्रारींवरचा रामबाण
उपाय आहे. सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय
म्हणावा लागेल. गवती चहाला पातीचा चहा असे देखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध
असतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. गवती चहा,
सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे
आदी विकार नाहीसे होतात.
तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप
झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते. गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात
आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे. हे दुखणे असणार्या व्यक्तींनी सकाळय्संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालिश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते. गवती
चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठीदेखील वापरला जातो.
आरोग्यदायी गवती चहा
कैरीची कढी
कैरीची कढी
साहित्य : १ नारळ, कैर्या ७-८,
१ कांदा, चिमूटभर मेथ्या, बेसन गरजेपुरते,
साखर, मीठ चवीपुरते, १ चमचा तूप.
कृति : नारळाच्या खवाचे दाट दूध
काढून ठेवा. नंतर पुन्हा त्याच खवाचे पातळ
दूध काढून ठेवा. कैर्या धुवून, कापून फोडी
करून ठेवा. कांदा जाडसर चिरून ठेवा. मंद
आचेवर तूप गरम करा. त्यात मेथ्या दाणे घाला.
तडतडू लागले की कांदा टाकून वाफवून घ्यावा.
मग कैरीच्या फोडी घालून परता. त्यावर थोडे
पाणी व मीठ टाका. झाकण घालून शिजवत
ठेवा. तोपर्यंत नारळाच्या पातळ दुधात बेसन
कालवून कैरीच्या शिजलेल्या फोडीवर ओता.
मिश्रणाला उकळी येऊ लागली की त्यात
साखर घाला. त्यावर नारळाचे दाटसर दूध
ओता. उकळी आल्यावर भांडे खाली उतरा.
आवडत असेल तर या कढीत अख्ख्या २-३
लाल मिरच्याही टाकू शकता.
केसांना चमक येण्यासाठी
केसांना चमक येण्यासाठी
* १ वाटी मेंदीत आवळा, शिकेकाई,
रिठा, मेथी, कडूलिंब, तुळशीची पान १-१
चमचा घेऊन दह्यात मिसळावे. त्यात अर्ध्या
लिंबाचा रस घालून केसांना लावून १ तास तसेच
राहू द्यावे. याने केस मजबूत होतील व केसांना
चमक येईल.
* चेहर्यावरील सुरकुत्या कमी
करण्यासाठी १ चमचा दूध पावडर + १ चम
चा काकडी रस + १ चमचा मुलतानी माती,
यात गुलाबजल मिसळून हे मिश्रण चांगले
घोटून त्याचा लेप चेहर्याला लावा. लेव वाळून
त्वचा ताणली की धुऊन काढा.
दैनिक पंचांग गुरुवार, दि. १४ मार्च २०२४
—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, भरणी १६|५६
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि.
राशिभविष्य
मेष : आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका. आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव.
वृषभ : आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकार्यांना प्रभावित कराल. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही.
कर्क : व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. संमिश्र परिणामांचा दिवस. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल.
सिंह : व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारची जोखीम टाळा. संभाषणात सावगिरी बाळगा. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. कामाचा ताण जाणवेल.
कन्या : इतर लोकांना आपण प्रभावित कराल. आपल्या प्रिय व्यक्ती अधिक लक्ष मिळावे अशी अपेक्षा ठेवतात. आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृट्या वेळ सामान्य.
तूळ : आनंदाची बातमी मिळेल. आपल्या दिनचर्येचा सुरुवात गंभीर मानसिक स्वरूपाच्या कार्यांनी होईल. खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील.
वृश्चिक : काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची शयता आहे. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.
धनु : जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. मनात नवीन कल्पना सुचतील.
मकर : व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. कला जगातील व्यक्तींना लाभ मिळेल. शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल.
कुंभ : आज आपणास आपल्या सामर्थ्यावर विश्वास होईल. परंतु आपल्या मुळच्या उतावीळ स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल.
मीन : घर जमीनसंबंधी व्यवहारात फायदा होईल. खर्च होईल. मागील उधारी वसुल होईल. अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. नवीन ओळखी संभवतात. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
नखे कापताना दुखत नाहीत, पण उपटल्यास दुखतात; असे का?
नखे कापताना दुखत नाहीत, पण उपटल्यास दुखतात; असे का?
दर आठवड्याला तुम्ही नेलकटरने नखे कापत असाल. चांगलीच सवय आहे ही. पण केव्हा तरी नख कापताना नख कापण्याऐवजी उपटले गेल्याने वा ओढले गेल्याने तुम्हाला नक्कीच दुखले असेल. अगदी ब्लेडने नख कापले तरी रक्त येत नाही वा दुखत नाही. मग उपटल्यावर वा ओढल्यावर ते का दुखते? याचे उत्तर कळण्यासाठी नखाची रचना समजून घ्यायला हवी! नखे, केस, घामाच्या ग्रंथी, तैलग्रंथी हे त्वचेचेच भाग आहेत. त्वचेतील पेशींपासून निर्माण होणार्या केरॅटीनच्या जाडसर थराने नख तयार होते. वरची बाजू सोडल्यास उर्वरीत तिन्ही बाजूंनी नखाभोवती त्वचेच्या घड्या असतात. केरॅटीनच्या थराला वेदनेची जाणीव नसते, कारण तो मृत भाग असतो. त्यात सजीव पेशी नसतात. नखात पोषणासाठी रक्तवाहिनी नसते किंवा संवेदना जाणवण्यासाठी मज्जातंतूही नसतात. त्यामुळे नख कापले तरी दुखत नाही. नखाच्या बोटाकडच्या भागाला नखाचे मूळ म्हणतात. येथूनच पेशींच्या थरापासून नखाची निर्मिती होत असते. या भागातील पेशी मात्र जिवंत असतात व त्यांना रक्तपुरवठा आणि मज्जातंतूंचाही पुरवठा असतो. नखाचा आपल्याला न दिसणारा आतला भाग त्याखालील नाजूक त्वचेत गुंतलेला असतो. साहजिकच नख उपटल्यास वा ओढले गेल्यास वेदनेची जाणीव होते. नखे कापताना मात्र आपण नखाचा निर्जीव भागच कापत असतो, त्यामुळे दुखत नाही.







