हसा आणि शतायुषी व्हा!

गण्या : आजी, मी पळण्याच्या
शर्यतीमध्ये भाग घेतला.
सगळी तयारी पूर्ण झाली फक्त तुझ्या आशीर्वादाची गरज आहे.
असे म्हणून गण्या आजीच्या पाया पडतो.
आजी : सावकाश पळ रे बाबा!

दात का किडतात?

दात का किडतात?

परवा शाळेत जाणारी दोन मुले पाहिली. इतकी गोंडस की कोणीही त्यांना उचलून घ्यावे. मी हसल्यावर दोघेही हसले आणि मग मला त्यांचे किडके दात दिसले. तुम्हालाही हा अनुभव कदाचित तुमच्याच नातेवाईकांच्या मुलांबद्दल आला असेल. इतका सुंदर चेहरा, पण काय ते दात…. अरेरे! मला तर अशा वेळी खूप वाईट वाटते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, दात किडण्याची मक्तेदारी फक्त मुलांवर सोपवून चालणार नाही. सर्वच वयोगटाच्या लोकांमध्ये दात किडण्याचे प्रमाण भरपूर आहे. विश्वास बसत नसेल, तर आपल्या घरातील व्यक्तींचे आणि शेजार्‍यांचे दात पाहा. दात का किडतात, त्याची आता माहिती घेऊ. दाताला कीड लागली की, दात दुखायला लागतात. दातांना कीड लागते त्यात थोडा भाग आनुवंशिकतेचा, काही पाण्यामध्ये फ्लोराईड कमी असण्याचा आणि बराच भाग दातांची काळजी न घेण्याचा असतो. दातांची निगा नीट न राखल्यास दातांच्या फटींमध्ये अन्नकण, साखर इ. साठून सूक्ष्मजंतू वाढतात. त्यांच्यामुळे हळूहळू दातांचे टणक कवच ठिसूळ होते व झीज होऊन दाताला खड्डे पडतात. हे खड्डे दाताच्या आतल्या पोकळीपर्यंत खोलवर पोहोचले, तर पोकळी उघडी पडते. दाताच्या किडीवर उपचार म्हणजे दंतवैद्याचा सल्ला. कारण दाताची कीड कोणत्या अवस्थेत आहे, त्या अनुषंगाने तिच्यावर सुयोग्य उपचार फक्त दंतवैद्यच करू शकतो. दात किडू नयेत यासाठी काही पथ्य पाळायला हवीत. साखर व साखरेचे पदार्थ (मिठाई वगैरे…) कमी खावेत. चॉकलेट, कॅडबरीसारखे गोड आणि दाताला चिकटणारे पदार्थ खाऊ नयेत. जेवल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर चुळा भराव्या. दिवसातून दोन वेळा (उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी) दात टूथपेस्ट आणि ब्रश किंवा कडूनिंबाच्या काडीने घासावे. काही पालकांना वाटते की, लहान मुलांचे दुधाचे दात तर काय पडणारच आहेत. मग चॉकलेट खाऊन ते किडले तरी काय? पण सावधान… कारण दुधाचे दात किडले, तर त्यांच्या खालून उगवणारे कायमचे दातही किडतात आणि हे दात पडले तर मात्र तोंडाचे बोळकेच होते! तेव्हा दात नीट सांभाळायला हवे, तरच आपण निरोगी राहू.

हाडांच्या मजबुतीसाठी अननस उपयुत

हाडांच्या मजबुतीसाठी अननस उपयुत
अननसामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. मॅग्नेशियम हाडे मजबूत करण्यासाठी मदत
करते. या व्यतिरिक्त यामध्ये असलेले ब्रोमोलिन तत्त्व हाडांच्या आजारापासून आपले रक्षण करते.
सांधेदुखीचा त्रास असणार्‍या लोकांनी अननसाचे सेवन करावे. अननस हिवाळा आणि उन्हाळा
दोन्ही ऋतूंमध्ये उपलब्ध असते. यामध्ये व्हिटामिन आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे
अननस खाणे लाभदायक आहे.

सुविचार

भाग्यश्रीची एकदाही कृपा झाली नाही असा एकही मनुष्य या दुनियेत नसेल. : स्वेट मॉर्डन

सुलतानी लस्सी

सुलतानी लस्सी

साहित्य : घट्ट दही ५०० मि. लि.,
साखर १०० ग्रॅम, बर्फ चुरा लागेल तसा,
रोझ इसेन्स ४-५ थेंब, व्हॅनिला आईस्क्रीम १
स्कूप (वा अधिक), थोडे ड्रायफ्रुटस्.
कृति : साखर, इसेन्स, दही व
बर्फाचा चुरा एकत्र करा व खूप जोरात घोटा.
ड्रायफ्रुटस्चे बारीक तुकडे करा. प्रत्येक
पेल्यात थोडे आईस्क्रीम घाला. त्यावर लस्सी
ओता. त्यावर ड्रायफ्रुटस् पेरा. वाटल्यास थोडी
ट्रुटी-फ्रुटी वरुन टाका.

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी
* डोळे थंड पाण्याने धूत रहावेत. डोळे
जळजळत असल्यास काकडीच्या चकत्या वा
बर्फाचे खडे डोळ्यांवर ठेवावेत.
* मूळा किसून त्याचा रस व मलाई
एकत्र करून चेहर्‍यावर लावावे. रंग उजळतो.
* ९ डोळ्याखालील काळी वर्तुळे
असल्यास बदामाचे तेल व केळ्याचा
कुस्करलेला गर एकत्र करू नियमित लावावे.
* तुळशीची आणि पुदिन्याची पाने
समप्रमाणात घेऊन ती वाटावीत व त्यात
थोडा लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण
चेहर्‍यावर लावल्याने मुरमे कमी होतात.
* बर्‍याचदा किचनमध्ये वास येऊ
लागतो. यासाठी दोन कप पाण्यात अर्धा कप
व्हिनेगर मिसळून उकळून घ्या व वास येत
असलेल्या जागी ओता.

चहा पिल्यानंतर

* वाळलेला ब्रेड वाळवून वाटून
घ्यावा व बाटलीत भरून ठेवावा. कटलेटस्
तळण्यापूर्वी या चुर्‍यात घोळवावेत. यामुळे
कटलेटस् कुरकुरीत होतील.
* चहा पिल्यानंतर लगेच दही वा ताक
सेवन करु नये.

वास्तू

* हॉलमध्ये उत्तरेस धबधब्याचे चित्र
लावावे. * ड्रॅगनबोट- ड्रॅगनबोटीत लुक, फुक
आणि ग्याऊ या ३ चिनी देवता राहतात. ज्या
आरोग्य, संपत्ती आणि दीर्घायुष्याच्या देवता
आहेत. एकतेचे प्रतीक असलेली ही ड्रॅगनबोट
घर, ऑफिस या दुकानात ठेवावी. त्यामुळे
दुकानात ग्राहकांशी चांगले संबंध राहतात.
घरात आनंद पसरतो. तिचे तोंड दाराकडे
ठेवावे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

शेखर : ’आई, बघ टकला माणूस.’
आई : ’शांत रहा, तो ऐकेल ना.’
शेखर : ’काय? त्याला हे माहित नाही?’

दैनिक पंचांग शनिवार, दि. १६ मार्च २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, रोहिणी १६|०६
सूर्योदय ०६ वा. २९ मि. सूर्यास्त ०६ वा. ३२ मि. 

राशिभविष्य

मेष : आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास
टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शयता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल.

मिथुन : आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील.

कर्क : महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. आरोग्य नरम-गरम राहील.

सिंह : अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. पोरकटपणा करणे टाळा.

कन्या : शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपली कामे धाडसाने करा.

तूळ : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल.

वृश्चिक : पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे.

धनु : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता.

मकर : आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा.
राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सुख-शांतीचे वातावरण राहील.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.

मीन : अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर