पाककला

0
22

टोमॅटो धिरडे
साहित्य – तांदूळ पीठ पाऊण कप,
तिखटपूड २ लहान चमचे, आले कीस १
लहान चमचा, साखर २ लहान चमचे, मीठ,
तेल, लालसर टोमॅटो २.
कृति – टोमॅटो उकडत घाला. त्यावर
थोडासा लिंबूरस पिळा. झाकण ठेवू नये.
शिजल्यावर त्याचा रस काढून चाळणीतून
२-३ वेळा गाळून घ्या. मग रस गार झाल्यावर
त्यात तांदूळ पीठ, तिखट, मीठ, साखर, आले
कीस घाला व चांगले एकजीव मिश्रण तयार
करा. मंद आचेवर तव्यावर अथवा फ्राय पॅनवर
बेताची धिरडी घालून चांगली भाजून आवडत
असेल तर एखादी कोरडी भाजी धिरड्यावर
घालून ते गुंडाळून गरम गरम खावे.