तांदळाची पेज घातली तर

* पनीर मऊ करण्यासाठी ते उकळत्या
पाण्यात घालून नंतर फ्राय करा.
* दही लावताना जर त्यात थोडीशी
तांदळाची पेज घातली तर दही चयासारखे
घट्ट होते.

सुरकुत्या

* संत्रा, लिंबूच्या साली सुकवून
पावडर बनवावी. त्यात मध, मलाई एकत्र
करून चेहर्‍यावर लावावे. रुक्ष त्वचा मुलायम
होईल व सुरकुत्या नाहीशा होतील.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

नवरा : माझ्या छातीत खुप दुखायला लागलय,
ताबडतोब अ‍ॅम्ब्युलन्सला फोन लाव
बायको : हो लावते, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड
सांगा!
नवरा : राहू दे..! थोड बरं वाटतय आता.

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ५ एप्रिल २०२४

पापमोचनी एकादशी, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन कृष्णपक्ष, धनिष्ठा
१८|०७
सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापारय्व्यवसायात स्थिती सुखद राहील. वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर अस्वस्थ राहाल. म्हणून तो दूर ठेवा.

वृषभ : घरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील.

मिथुन : अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. शत्रू पक्षापासून सावध राहा. आनंदाची बातमी मिळेल.

कर्क : कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल.

सिंह : आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या.

कन्या : कौटुंबिक प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. भविष्यात मान-सन्मानात वाढ होईल.

तूळ : मित्रांकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार होईल. अनुकूल स्थिती मिळेल. प्रसिद्धी मिळेल. अडकलेली कार्ये योग्य वेळी होतील.

वृश्चिक : नोकरदार व व्यापारी बंधूंना लाभ मिळेल. नेहमीपेक्षा अधिक चांगले काही घडण्यासाठी आपणास आपल्या कामात
एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे. मागील उधारी वसुल होईल. आज पति-पत्नींचे एकमेकांशी पटणार नाही.

धनु : वाद टाळा. काही अडचणींनंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. आरोग्य उत्तम राहील व एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शयता. बेबनाव होईल, त्यामुळे लेश होतील. व्यवसाय धंद्यात आज यश मिळण्याची शयता अधिक आहे.

मकर : व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम. सहकार्यांचे सहकार्य वाढेल.

कुंभ : वेळेचा सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. वाहने सावकाश चालवावीत. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबातील वातावरण सुखाचे असेल.

मीन : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पत्नी व मुले यांचा उत्तम सहवास लाभल्याने दिवस आनंदात जाईल. जुने मित्र मंडळी भेटतील. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल. वाहने व उपकरणे जपून वापरावीत.आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

चिखल्यांवर काय उपाय करावे?

चिखल्यांवर काय उपाय करावे?
चिखल्या हा आजार पाण्यात काम करणार्‍या,
जसे धुणे-भांडी करणे, शेतात काम करणे,
धोबीकाम इत्यादी काम करणार्‍या व्यक्तींमध्ये जास्त
दिसून येतो. सतत पाण्यात काम केल्याने पायांना
सूज येते. त्या भागावर खाज येऊन नंतर पुटकुळ्या,
फोड यायला लागतात. हे फोड फुटून जखमाही
होऊ शकतात. बुरशीमुळे होणार्‍या या रोगात नंतर
जिवाणूंचा संसर्गही होऊ शकतो.
चिखल्यांचे प्रमुख कारण पाणी असल्याने
एक-दोन आठवडे तरी पाय कोरडे ठेवावेत. पाण्यात
काम करणे आवश्यकच असेल, तर गमबूट वापरावेत
किंवा प्लॅस्टिकची पिशवी बांधून काम करावे.
पायाच्या जखमांसाठी जंतूनाशक मलम,
जेन्शन व्हायोलेट किंवा कडूनिंबाच्या पाल्याचा रस
लावणे; हे उपाय करता येतात.

हे पदार्थ लाभदायक

हे पदार्थ लाभदायक
आवळा, गडद रंगांच्या लाल पिवळ्या भाज्या आणि फळं. पालेभाज्या, मोडाची कडधान्ये,
मटार, मुळा यांमधून; व्हिटामिन ए, सी आणि अँटीऑसिडंटस मिळतात.
थंडीत केले जाणारे पारंपरिक पदार्थ तिळगुळ, गुळाची पोळी, अळीवाचे/ डिंकाचे/
मेथीचे/ खजुराचे लाडू योग्य प्रमाणात आवर्जून खा. गजर हलवा, उंधियो, सरसों का साग, पाया
सूप यांचा आस्वाद नक्की घ्या.

सुविचार

माणसाच्या अंगी राक्षसासारखी शक्ती असावी; परंतु त्याने तिचा राक्षसी उपयोग करू नये.

मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू

मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू

साहित्य : २ कप मुगाची डाळ स्वच्छ
धुऊन, १०-१५ मिनिटे भिजवून, फडयावर
वाळवून घ्या व मग भाजा, रवाळ दळून घ्या.
कृती : साजूक तुपावर रवाळ पीठ
भाजून घ्या. पीठ फार बारीक दळल्यास लाडू
खाताना टाळ्याला चिकटतो, म्हणून ‘भुरी
शक्कर’ घालून वळा. भुरी साखर अशी बनवा
दीड कप साखर व १ कप पाण्याचा पाक
करत ठेवा. २ थेंब लिंबाचा रस व १ चमचा
तूप घाला.
पाक पक्का झाल्यावर गॅस बंद करा.
ही साखर मिसरमध्ये दळून वापरा. या
साखरेमुळे लाडू खमंग लागतो. मऊ केलेला
गूळ घालूनही लाडू बनविता येतील.

वास्तू

फेंगशुईनुसार काच, माती किंवा
सिरॅमिकचे हंस व हंसिणीचा जोडा
शयनकक्षात ठेवल्याने नवविवाहित
दांपत्यामध्ये प्रेम व विश्वास यांच्यात वृध्दी
होत असते. शयनकक्षाच्या नैऋत्य कोपर्‍यात
ते ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल.

उजळ चेहर्‍यासाठी

उजळ चेहर्‍यासाठी
* संत्र्याची साले १०० ग्रॅम घेऊन
वाळवून वाटून पूर्ण करावे. यात १०० ग्रॅम
बाजरीचे पीठ आणि १२ ग्रॅम हळद मिसळून
पाण्यात भिजवून चेहर्‍यावर लावावं. नंतर
स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. काही दिवसांत
चेहरा उजळून निघेल.
* एक कप दूध चांगलं आटवावे. दाट
झाल्यावर एक लिंबू पिळून दूध थंड करावे.
रात्री झोपताना ते चेहर्‍यावर लावून चोळावे.
रात्रभर लावून ठेवावे. सकाळी धुवून घ्यावे.
यामुळे मुरमे बरी होऊन चेहरा उजळून
तजेलदार होतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर