आरशावर पडदा टाका
* नवदाम्पत्याच्या खोलीत आरसा
लावू नये. या खोलीत जर ड्रेसिंग टेबल ठेवला
असेल तर झोपताना तुमचे प्रतिबिंब आरशात
पडणार नाही याची विशेष काळजी घेतली
पाहिजे. परंतु, बदल करण्याची व्यवस्था
नसेल तर आरशावर पडदा टाकायला विसरू
नका.
* घरात सुख-समाधान लाभण्यासाठी,
आशावादी, उत्साहवर्धक आनंददायक चित्रेच
घरात लावावीत.
वास्तू
लोणचे घालण्यापूर्वी
* लोणचे घालण्यापूर्वी फळे व्यवस्थित
धुवून स्वच्छ फडयाने पुसून सुकवून घ्या.
पाणी राहिल्यास लोणच्यात बुरशी लागण्याची
भीती राहते. लोणच्यात मिठाचे प्रमाण योग्य
असणे अत्यावश्यक असते. मीठ कमी
घातल्यास लोणचे खराब होते.
* लोणच्याला अधूनमधून उन्हात
ठेवावे. यामुळे त्यातील अवाजवी पाणी सुकून
जाते. उन्हात ठेवताना बरणीचे तोंड कापडाने
बांधावे. लोणचे जास्त वेळ उन्हात ठेवल्यास
त्याचा रंग काळा पडतो व चव फिकी पडते.
त्वचा मऊ आणि तजेलदार
कुस्करलेला बटाटा रेशमी कापडात
बांधून रोज थोडा वेळ डोळ्यांवर ठेवल्यास
डोळ्यांखालील काळवंडलेपणा नाहीसा होतो.
लिंबाचा रस गाळलेला, दोन तोळे गुलाब अर्क,
२ तोळे ग्लिसरीन मिसळून बाटलीत भरून
ठेवावं. रात्री झोपताना चेहर्यावर चोळून लावावे.
वीस दिवस उपचार केल्याने मुरूम, पुटकुळ्या
दूर होऊन त्वचा मऊ आणि तजेलदार होते.
चेहर्यावर ग्लो येतो.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
दैनिक पंचांग शनिवार, दि. ६ एप्रिल २०२४
शनिप्रदोष, शके १९४५ शोभननाम संवत्सर, फाल्गुन कृष्णपक्ष, शततारा १५|४०
सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्ट्या वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये.
वृषभ : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा
जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल.
मिथुन : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका.
कर्क : शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.
सिंह : मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. यंत्रे व वाहने जपून चालवावीत.
कन्या : अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. व्यर्थ ताण जाणवेल.
तूळ : आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल.
वृश्चिक : आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता.
धनु : संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. आर्थिक स्थिति सुदृढ राहील. यश वाढेल.
मकर : आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही. राहत्या जागेसंबंधी अडचण राहू शकते.
कुंभ : आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल. शांत रहा. लाभदायक बातमी कळेल. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा.
मीन : अडकलेला पैसा मिळेल. भूमि, घर विकत घेण्याचे योग. आरोग्यात सुधारणा. आर्थिक स्थितीत बचत आणि निवेशाचे योग येतील. लाभदायी करार होतील. पारिवारिक वाद वाढतील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
सिफीलीस हा रोग कसा होतो? त्यावर उपाय काय?
सिफीलीस हा रोग कसा होतो? त्यावर उपाय काय?
सिफीलीस हा एक लिंगसांसर्गिक रोग आहे.
ट्रेपोनेमा पॅलीडम नावाच्या जिवाणूंमुळे हा रोग
होतो. रोग झालेल्या व्यक्तीबरोबर शरीरसंबंध
ठेवल्यास १० दिवसांनंतर केव्हाही याची लक्षणे
दिसायला लागतात. या रोगाचे मुख्य लक्षण म्हणजे
पुरुषामध्ये शिश्नावर किंवा त्यावरच्या त्वचेखाली
आणि स्त्रियांमध्ये योनिमार्गात किंवा गर्भाशयाच्या
तोंडावर पुळी तयार होते. ही फुटून नंतर व्रण तयार
होतो. हा व्रण वेदनारहित असतो व तळाशी जाडसर
असतो. त्यानंतर जांघेत एका वा दोन्ही बाजूच्या
रसग्रंथी सुजतात. मात्र वेदना होत नाही. उपचार
न झाले तरी हा व्रण महिनाभरात दुरुस्त होतो. या
व्रणाला हात लावल्यास व नंतर हात डेटॉलने स्वच्छ
न केल्यास स्पर्श करणार्याला हा रोग होऊ शकतो.
गरमी व सिफीलीसच्या दुसर्या अवस्थेत अंगावर न
खाजणारे चट्टे येतात. शरीरात ठिकठिकाणी अवधाण
येते, तोंडात व्रण येतात. तिसर्या अवस्थेत मेंदू,
हृदय व हाडे यांवर या रोगाचा परिणाम दिसून येतो.
हृदयाच्या झडपा निकामी होतात, महारोहिणीला
फुगार येतो व ती कमकुवत होते. तसेच मेंदू व
मज्जासंस्था खराब होतात. स्त्रिला सिफीलीस झाला
असेल, तर वारंवार गर्भपात होतात व मूल जन्माला
आलेच, तर त्यात व्यंगे असतात.
सिफीलीसच्या निदानासाठी प्राथमिक
अवस्थांमध्ये जंतूंचा शोध घेता येतो. त्यानंतर मात्र
या तपासणी शरीराने या जंतूंच्या विरोधात तयार
केलेल्या प्रतिद्रव्यांची मोजणी केली जाते व रोगाचे
निदान केले जाते.
या आजारावर पेनिसिलीनची इंजेशने फारच
उपयुक्त ठरतात. दररोज एक असे १० ते १५
दिवस पेलिसिलीनची इंजेशने वा एकच मोठा डोस
दिल्यास रोग बरा होतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
पतीस सिफीलीस असेल, तर पत्नीलाही उपचार
द्यावे लागतात. दुसरे म्हणजे सिफीलीसवर इतर
कोणतेही उपचार करू नयेत. काही समाजात असे
गैरसमज आहेत की, कुमारिकांशी वा प्राण्यांशी
शरीरसंबंध ठेवल्याने हा रोग बरा होतो. ही गोष्ट
अत्यंत चुकीची आहे. उलट त्यामुळे रोगप्रसार आणि
विकृती निर्माण होतात. गुंतागुंतीचे संसर्ग होऊन
मृत्यू येतो.
नैतिकता ठेवून वर्तन करणार्याला
सिफीलीससारखा रोग होणारच नाही. त्यामुळे केवळ
एकमेकांशीच प्रामाणिकपणे शरीरसंबंध ठेवणार्या
पती-पत्नींना हा रोग कधीच होऊ शकणार नाही.
म्हैसूर पाक
म्हैसूर पाक
साहित्य : ३ लहान वाट्या ताजे बेसन,
३ वाट्या साखर, ५ वाट्या तूप, वेलदोडे पूड
अर्धा चमचा, थोडे बदाम काप.
कृती : २ मोठा चमचा तूप डाळीच्या
पिठाला चोळा व मंद गॅसवर थोडे भाजा.
दुसरीकडे २ वाट्या पाणी व ३ वाट्या
साखरेचा पाक करा. त्यात भाजलेले बेसन
घाला व घोटा. दुसर्या गॅसवर तूप गरम करत
ठेवा. दर २ मिनिटांनी ३ मोठे चमचे गरम तूप
बेसनात घालत राहा.
साधारण १ वाटी तूप उरेपर्यंत तूप
घालून हलवत राहा. बेसनाचे मिश्रण चौकोनी
ट्रेमध्ये घालून हलवा. म्हणजे सगळीकडे
सारखे पसरेल. आता पातेल्यात उरलेले १
वाटी गरम तूप पूर्ण म्हैसूरपाकावर ओता असे
केल्याने जाळी छान पडते.
वास्तू
झपाट्याने प्रगती होण्यासाठी
* हिंस्त्र पशूंची चित्रे घरात लावणेही
वास्तुशास्त्रीय दृष्टीने अशुभ, प्रगतीविरोधी
मानले आहे.
* कुटुंबाची झपाट्याने भरभराट
होण्यासाठी, प्रगतीच्या संधी प्राप्त होण्यासाठी
घराच्या उत्तर दिशेस पाण्याचे किंवा झर्याचे
चित्र/छायाचित्र लावावे. उत्तर दिशेस फिश
एक्वेरियम ठेवणे किंवा कासवाचे चित्र/
छायाचित्र लावणेही लाभदायक ठरते.






