चिखल्यांवर काय उपाय करावे?
चिखल्या हा आजार पाण्यात काम करणार्या,
जसे धुणे-भांडी करणे, शेतात काम करणे,
धोबीकाम इत्यादी काम करणार्या व्यक्तींमध्ये जास्त
दिसून येतो. सतत पाण्यात काम केल्याने पायांना
सूज येते. त्या भागावर खाज येऊन नंतर पुटकुळ्या,
फोड यायला लागतात. हे फोड फुटून जखमाही
होऊ शकतात. बुरशीमुळे होणार्या या रोगात नंतर
जिवाणूंचा संसर्गही होऊ शकतो.
चिखल्यांचे प्रमुख कारण पाणी असल्याने
एक-दोन आठवडे तरी पाय कोरडे ठेवावेत. पाण्यात
काम करणे आवश्यकच असेल, तर गमबूट वापरावेत
किंवा प्लॅस्टिकची पिशवी बांधून काम करावे.
पायाच्या जखमांसाठी जंतूनाशक मलम,
जेन्शन व्हायोलेट किंवा कडूनिंबाच्या पाल्याचा रस
लावणे; हे उपाय करता येतात.