गण्या : मला तुमच्या मुलीशी लग्न करायचयं
मुलीचा बाप : तुझी कमाई किती?
गण्या : ११ हजार
मुलीचा बाप : मी तिला महिना १० हजार रुपये फक्त पॉकेट
मनी म्हणून देतो
गण्या : ते धरुनच सांगितलं…
दैनिक पंचांग गुरुवार, दि. ४ एप्रिल २०२४
—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन कृष्णपक्ष, श्रवण २०|१२
सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा. हितशत्रुंपासून पिडा संभवते. लांब रहा. आज अध्यात्माकडे कल राहिल.
वृषभ : जर आपणास एका कार्यात वाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे शय आहे. जुने मित्र व नातेवाईक यांच्या
सहवासामुळे दिवस आनंदात व्यतीत होईल.
मिथुन : धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल.
कर्क : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. पत्नीपासून सुख मिळेल.
सिंह : गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ मिळण्याची स्थिती बनेल.
कन्या : व्यवसायासाठी उत्तम वेळ. नवीन कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.
तूळ : आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा. मनोरंजनाच्या विषयांमध्ये वेळ खर्च होईल.
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रांमध्ये अजून काही विशेष कार्ये होणार नाही. वाहने जपून चालवावीत. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल.
धनु : एखादी व्यक्ती निष्कारण आपल्याला त्रास देईल मात्र शत्रू प्रभावहीन पडतील. वैवाहिक सुख वाढेल. तब्येत सांभाळा. उधारी वसुल होईल. तुमची वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल
मकर : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल. कुटुंबातील लोकांबरोबर गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडतील व मन दुःखी होईलप्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल.
कुंभ : आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार नाही. व्यापारात नुकसान मोठे होईल. आजचा दिवस मिश्रफल देणारा आहे. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.
मीन : घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शत्रू प्रभावहीन ठरतील. आजचा दिवस तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायी आहे. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
प्लीहा म्हणजे काय?
प्लीहा म्हणजे काय?
प्लीहा हे इंद्रिय आपल्या शरीरात डाव्या बाजूला असते. छातीच्या पिंजर्यामध्ये छाती व पोट यांमध्ये असलेल्या डायफॅ्रम या स्नायूच्या खाली प्लीहा असते. श्वसनाबरोबर प्लीहा वरखाली होत असते. शरीरातील रोगप्रतिबंधक शक्तीसाठी एखाद्या लसिकाग्रंथीप्रमाणे प्लीहा कार्य करते. शरीरात कोणताही ‘परकीय’ पदार्थ शिरला की, प्लीहेमध्ये टी व बी प्रकारच्या लिम्फोसाईट्स (पांढर्या रक्तपेशींचा एक प्रकार) तयार होण्याचे प्रमाण वाढते. या पेशी रोगप्रतिकारशक्तीसाठी कारणीभूत असतात. ‘बी’ प्रकारच्या लिम्फोसाईट्स परकीय पदार्थ वा अँटीजेनच्या विरुद्ध प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) तयार करतात, तर ‘टी’ प्रकारच्या पेशी अँटीजेन बाबत ‘स्मरणशक्ती’ निर्माण करतात. प्लीहेचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे दुखापत झालेल्या, निरुपयोगी झालेल्या रक्तपेशींचा नाश करणे. याचबरोबर लाल रक्तपेशीतील हिवतापाच्या जंतूंना मारण्याचे कामही प्लीहेतील पेशी करतात. त्यामुळेच हिवतापात प्लीहेचा आकार वाढलेला असतो. प्लीहा रक्तातील एकूण रक्तबिंबीकांपैकी (प्लॅटलेट) ३० ते ४० टक्के रक्तबिंबीका गाळून साठवून ठेवते. गर्भावस्थेत ५ व्या महिन्यापासून मूल जन्माला येईपर्यंत प्लीहेमध्ये रक्तनिर्मितीचे कार्य होत असते. मूल जन्माला आल्यानंतर मात्र हे कार्य थांबते. कधीकधी काही रोगांमुळे प्लीहा लाल रक्तपेशींचा खूपच जास्त प्रमाणात नाश करू लागते. त्यामुळे प्लीहेचा आकार वाढतोच, पण त्याबरोबरच अॅनेमिया या रक्तपांढरीही होते. अशावेळी किंवा प्लीहेमध्ये कर्करोग झाल्यास प्लीहा शस्त्रक्रिया करून काढून टाकावी लागते.
स्त्रियांसाठी मेथ्यांच्या सेवनाचे लाभ
स्त्रियांसाठी मेथ्यांच्या सेवनाचे लाभ
तरुण स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान पोट दुखणे, कंबर दुखणे किंवा पाय दुखणे असे
त्रास मेथ्यांच्या नियमित सेवनाने कमी होतात. प्रसूती पश्चात मातांनी मेथ्यांचे सेवन केल्यास
त्यांच्या स्तनपानात २० टयांनी वाढ होते, असे संशोधनात सिद्ध झाले आहे. रजोनिवृत्त
स्त्रियांना होणारी डोकेदुखी, कंबर-पाय दुखणे, चक्कर येणे, निराश वाटणे, निरुत्साही वाटणे हे
त्रासही कमी होतात.
नारळाजी करंजी
नारळाजी करंजी
साहित्य : १ कप बारीक रवा, १ कप
मैदा, मुटका वळेपर्यंत तुपाचं मोहन, निरस
दूध व पाणी घालून भिजत ठेवा. पीठ भिजवून
अर्धा तास ठेवा. चटणी ग्राईंडरमध्ये थोडं थोडं
पीठ घालून मऊ करुन घ्या.
कृती : एक मोठे नारळ, १ कप
साईसकट दूध, दीड ते दोन कप साखर. सर्व
एकत्र शिजवून घ्या. घट्ट झाल्यावर वाटल्यास
मिसरमधून काढा, म्हणजे सारण एकसारखं
मोकळं होईल. वेलीदोडे, जायफळपूड,
चारोळी इत्यादी घाला. पुर्याक लाटून घ्या.
सारण भरून कड दुधाने चिकटवा. मंद गॅसवर
तळा.
आरोग्यदायी केसांसासाठी
आरोग्यदायी केसांसासाठी
मध, लिंबू, ग्लिसरीन मिसळून चेहर्यावर
लावा. चेहरा मुलायम व नितळ होतो.
शिकेकाई, या औषधी वनस्पतीमुळे केस
दणकट व्हायला, तजेलदार व्हायला खूपच
मदत होते. केसामध्ये कोंडा न होण्यासाठी
याचा उपयोग होतो. शिकेकाई वापरायची
असल्यास दळून आणलेली शिकेकाई आदल्या
दिवशी रात्रीच लोखंडाच्या भांड्यात मिळवून
ठेवतात. सकाळी नहाण्यापूर्वी ती उकळून थंड
करावी. केसावर याचा खूप चांगला परिणाम
होतो.
त्यामुळे स्मरणशक्ती कमी होत जाते
* चिंच पाण्यात कुस्करून ते पाणी
गाळून त्यात साखर घालून प्यायल्याने उष्माघातात आराम वाटतो.
* ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या
संशोधकांनी एक हजार लोकांवर प्रयोग करून
असे स्पष्ट केले आहे की, स्मरणशक्ती कमी
करणारा मेजर फॅटर म्हणजे ‘ट्रान्स फॅट्स’
हा प्रकार बिस्किटात आढळून येतो. यामुळे
राग येणं, लठ्ठपणा तसेच हृदयाचे विकार
होऊ शकतात. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त
बिस्कीट खाण्याची सवय आरोग्यासाठी
धोकादायक आहे. ‘डेली मेल’ या वेबसाईटवर
प्रकाशित झालेल्या शोधानुसार बिस्किटांच्या
अतिसेवनामुळे स्मरणशक्ती कमी होत जाते.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.







