वास्तू

घरात भांडणे होत असतील उपाय
* जर एखाद्या घरात वास्तुदोषांमुळे
वारंवार भांडणे होत असतील तर अशा घरात
खास करून आजारी माणसाच्या खोलीत
त्याच्या बिछान्याजवळ थोडेसे मीठ पाण्यात
मिसळून काचेच्या बाऊलमध्ये ठेवावे लाभ
होतो.
* काही कारणाने एखाद्या खोलीत
नैसर्गिक प्रकाश, ऊन, हवा येत नसेल तर
अशा खोल्या बेडरूम म्हणून वापरण्याच्या
दृष्टीने लाभदायी ठरत नाहीत. अशा खोल्यांम
ध्ये २-३ जागी चिनी माती, काच व
प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये थोडे खडे मीठ ठेवा.
यामुळे हा दोष कमी होतो.
* तिजोरीचे तोंड कोणत्याही
दरवाजाच्या बरोबर समोर येणार नाही याची
दक्षता घ्या.

कोंडा नष्ट करण्यासाठी

* दह्यात एक चमचा साखर घालून
केसांना चोळल्यास कोंडा मुळापासून नष्ट
होतो.
* स्नान करताना केसात थोडेसे
व्हिनेगर टाका व त्वरित धुवा. यामुळे केसांना
चमक येईल आणि केसांचा रंग जास्त गडद
होईल.

लोणी सुरक्षित राहण्यासाठी

आपण दूरच्या प्रवासाला किंवा
पिकनिकला जाताना सोबत लोणी नेऊ इच्छित
असाल तर ते वितळू नये यासाठी एका छोट्या
फ्लास्कमध्ये बर्फाच्या तुकड्यांसोबत लोण्याचा
पॅक केलेल्या छोट्या वड्या टाकाव्यात. लोणी
सुरक्षित राहील.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच…
पत्नी : कुठे जात आहात?
पती : मरायला चाललोय…सुसाईड करीन…
पत्नी : कुठेही जा, पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी
आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही.

हसा आणि शतायुषी व्हा!

एका पुणेरी लग्नातला संवाद…
पहिला पाहुणा : हे काय? त्यांनी जेवण काऊंटर डिजिटल
सेवा सुरू केली आहे.
दुसरा पाहुणा : हो, बरोबर आहे, तुम्ही जेव्हा गिफ्ट द्याल
त्याबरोबर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी मिळेल. तो ओटीपी
तुम्ही जेवण काऊंटरवर दाखविला की तुम्हाला जेवण मिळेल.

साखरेचा पाक केल्यावर


साखरेचा पाक केल्यावर त्यात थोडे
लिंबू पिळावे. साखरेचे कण तयार होत
नाहीत.
                                 संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

रेशम, मुलायम केसांसाठी

 


* केसांना आठवड्यातून एकदा तेल
लावावे. (विशेषत: हिवाळ्यात केस चांगले
राहतात.)
* आपण थोडीशी दक्षता घ्याल तर
आपले केसही रेशमासारखे मुलायम चमचमते
बनवू शकाल. त्यासाठी डोके धुण्याचा अर्धा
तास आधी एक लिंबाचा रस दूध वा दह्यात
फेटून केसांना लावा.

वास्तू


टॉयलेटमुळे वास्तूदोष 

जर तुमच्या घरातील एखादे टॉयलेट हे
घराच्या पूर्व, उत्तर आणि पूर्वोत्तर दिशेला येत
असेल, तर हा फार मोठा असा वास्तुदोष
मानला जातो. यामुळे सुख, आरोग्य व समृद्धी
या तिन्हींवर गंभीर नकारात्मक प्रभाव निर्माण
होतो.
हा वास्तुदोष दूर करण्यासाठी थोडी
चिनी माती, काच वा प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये
२-३ मुठी खडे समुद्री मोठ घ्या व ती प्लेट
घरात ठेवा. या प्लेटमधील मीठ १५-२०
दिवसांनी बदलत राहा. टॉयलेटचा वास्तुदोष
हा या उपायामुळे बर्‍याच प्रमाणात नियंत्रित
केला जातो.

नाचणीचे लाडू

नाचणीचे लाडू


साहित्य – १ किलो नाचणी भाजून दळून आणावी. तीन वाट्या पीठ, १ वाटी साजूक तूप, २ वाट्या गूळ अगर पिठीसाखर, १ वाटी कणीक, चारोळ्या, १ चमचा जायफळ पूड.

कृती – ३ वाट्या नाचणी पीठ, १ वाटी कणीक एकत्र करून तुपावर खमंग भाजून घ्यावे. पीठ गरम असतानाच गूळ चिरून
घालावा. अर्धी वाटी दुधाचा शिपका द्यावा (कोमट पिठात पिठीसाखर मिसळावी). पीठ, जायफळ पूड, गूळ एकत्र चांगले मिसळावे. लागल्यास दूध, तूप घालावे. लाडू वळावेत. ५-६ चारोळ्या प्रत्येक लाडवावर दाबून बसवाव्यात. छान दिसतात. रोगप्रतिकारशक्ती नाचणीत आहे. भरपूर प्रमाणात लोह आहे. नाचणीचा लाडू रोज खायला हरकत नाही.

शिंगाने दिला दगा

शिंगाने दिला दगा

एका कुरणात पोटभर चरल्यावर एक सांबर पाणी पिण्यासाठी तळ्याकाठी आले. पाणी पीत असता त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले. पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहताच सांबर मनात म्हणाले, “माझी शिंगे किती सुंदर दिसतात! त्याला फुटलेले फाटे तर अवर्णनीयच! माझे सुंदर डोळे माझ्या सौंदर्यात भर घालतात, तर माझे तोंड मला किती शोभून दिसते! माझ्या अंगावरील केस माझ्या सौंदर्याला चार चांद लावतात!” पण पायाकडे दृष्टी जाताच सांबर फारच नाराज झाले. म्हणाले,” माझे हे बारीक पाय मात्र किती खराब दिसतात. माझ्या सुंदर शरीराची शोभा या पायांनी फार कमी केली. त्यापेक्षा हे पाय नसते, तर बरे झाले असते.” असा विचार सांबर करतो आहे, तोच जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. वाघाची चाहूल लागताच सांबर चौखूर धावू लागले. वाघ त्याचा पाठलाग करू लागला. थोड्याच वेळात सांबर वाघापासून खूप दूर गेले. धावता धावता एके ठिकाणी त्याची सुंदर दिसणारी शिंगे एका झाडाच्या पारंब्यात अडकली. शिंगे सोडवायचा प्रयत्न सांबर करू लागले, पण ती जास्तच अडकत चालली. इतयात वाघाने त्याला गाठले. एकाच ढांगेत त्याची मान आपल्या जबड्यात आवळली. मरता-मरता सांबर मनात म्हणाले,” हाय रे दैवा, ज्या पायांना मी दूषण दिले, त्यांनी संकटापासून मला दूर नेले आणि माझा घात केला. या शिंगांमुळेच माझे मरण ओढवले.” तात्पर्य ः नुसत्या दिखाऊपणावर न जाता एखाद्याचे गुण विचारात घेणे केव्हाही शहाणपणाचे ठरते