बहिरे मूल मुकेही असते का?

बहिरे मूल मुकेही असते का?

बहिरेपणा म्हणजे कमीअधिक प्रमाणात ऐकू न येणे, हे तुम्हाला माहित असेलच. आपल्या कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे तीन भाग असतात. या तीन भागांपैकी एकात जरी दोष असला, तरी बहिरेपणा येऊ शकतो. याखेरीज मेंदूपासून निघणारी आठवी नस किंवा मेंदूचा ध्वनिज्ञानकेंद्राचा भाग यांपैकी कोठेही दोष असेल, तरीही ऐकू येत नाही. काही मुले जन्मताच मूकबधिर असतात. म्हणजे त्यांना ऐकूही येत नाही व बोलताही येत नाही. ही एक जन्मजात अशी बरी न होणारी व्याधी आहे. ऐकणे आणि बोलणे यांचा जवळचा संबंध आहे. आपण बोलायला कसे शिकतो, ते आता पाहू. लहान बाळाला आवाज आल्यास ते तिकडे वळून पाहायला लागते. येणारा आवाज आणि त्यासोबत होणार्‍या तोंडाच्या, ओठांच्या हालचाली यावर बालकाचे बारीक लक्ष असते! आपले अनुकरण करतच ते पहिल्यांदा “बाऽऽऽबा”, ताऽऽता” असे शब्द बोलते. ऐकू न आल्यास साहजिकच त्याला बोलता येत नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ऐकू न आल्याने सभोवतालच्या परिस्थितीचे त्याला पुरेसे आकलनही होत नाही. त्यामुळे मुलाला भोवतालच्या गोष्टींबाबत रस वाटत नाही व त्याचा एकूणच विकास नीट होत नाही. यावरून बहिरे मूल बर्‍याचदा मुके असल्याचे तुम्हाला आढळेल किंबहुना बहिरे असल्यानेच ते मुकेही असते. लहान बाळाने आवाजाला प्रतिसाद दिला नाही, तर तात्काळ त्याच्या कानांची तपासणी करून घ्यावी. बहिरेपणाचे निदान झाल्यास बोलण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण मुलाला द्यावे लागते. अर्थात असे शिक्षण देणार्‍या संस्था संख्येने फार कमी आहेत. मात्र असे शिक्षण दिल्यास मूकबधिर मुले काही प्रमाणात स्वावलंबी बनू शकतात

चांगल्या स्मरणशतीसाठी कॉफी

चांगल्या स्मरणशतीसाठी कॉफी


ब्लॅक कॉफी चांगल्या स्मरणशतीसाठी फयदेशीर असते. या सोबतच मेंदूला सतर्क करते
आणि नर्व्हस सिस्टम अ‍ॅटिव्ह राहते. कॉफी डिमेन्श म्हणजेच वेडेपणापासून दूर ठेवते. कॉफी या
पेयामध्ये निकोटीन असल्यामुळे ते प्रमाणात घेणेच योग्य ठरते.

सुविचार

जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग आहे; तो म्हणजे परिश्रम. – सुविचार संग्रह.

हसा आणि शतायुषी व्हा!

गण्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली
गण्या – साहेब मला फोनवर धमया मिळत आहेत
पोलीस – कोण आहे तो जो तुम्हाला धमया देत आहे?
गण्या – एम.एस.ई.बी.वाले म्हणतात..
बिल नाही भरल तर कापून टाकीन

गोटा खोबरे खराब होऊ नये म्हणून


गोटा खोबरे खराब होऊ नये म्हणून
ते फोडून साखरेच्या डब्यात ठेवावे. मऊ व
चांगले राहाते.
संकलक: अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा,नगर.

मुलतानी माती


मुलतानी माती रात्रभर भिजत ठेवावी.
सकाळी त्यात मोहरीचे तेल मिसळून केसांना
लावावी व थोड्या वेळानंतर धुवावी

वास्तू

घरासासाठी जर एखाद्या घरात आपले बरे न बघवणारी व घराच्या सुख, शांती, ऐश्वर्य यांना अपशकून करणारी, दृष्ट लावणारी माणसे येत असतील, तर यावर उपाय म्हणून आपल्या घराच्या मेन गेट वा मुख्य दाराच्या
जवळपासच्या घराच्या आतील भागात थोडे थोडे खडे मीठ रोपाच्या आड लपवून ठेवले तर बाहेरच्यांची दृष्ट घराला लागणार नाही.

तोंडली चना भाजी

तोंडली चना भाजी

साहित्य – २५० ग्रॅम तोंडली, १ कप काबुली चने रात्रभर पाण्यात भिजवून नंतर उकडलेले, अर्धा कप नारळाचा खव, २ लाल मिरच्या, अर्धा लहान चमचा धने, अर्धा लहान चमचा जिरे, अर्धा लहान चमचा मोहरी, अर्धा लहान चमचा हळद, चिमूटभर हिंग, ५-६ कढीपत्ते, १ लहान चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ.

कृति – तोंडल्यांचे उभे चार तुकडे करून घ्या आणि बिगर पाण्याच्या वाफेवर शिजवून घ्या. लाल मिरच्या, धने व जिरे मिसळून मिसरमध्ये वाटून घ्या. नंतर नारळाचा खव टाकून फिरवा. पाणी घालू नका. कढईत तेल तापवून हिंग, जिरे, मोहरीची फोडणी द्या. नंतर तोंडली, काबुली चने, मीठ व हळद टाका. मंद आचेवर ३ मिनिटे परता. नंतर लिंबाचा रस टाका. चपाती, भाकरी व भातासोबत ही सुकी भाजी सर्व्ह करा

अडाणी माणूस

अडाणी माणूस

एक गरीब आणि अडाणी माणूस शहराबाहेर असलेल्या झोपडीत भाडे भरून राहत होता. झोपडीसमोर रिकाम्या जागी त्याने काही भाजीपाला लावल्या होता. शेजारीच एका बिळात एक ससा राहत होता. तो दररोज त्या भाजीच्या वाफ्यात येऊन त्यातील भाज्या फस्त करीत असे. त्याच्या त्रासाला वैतागून तो माणूस शहरात असलेल्या मालकाकडे जाऊन म्हणाला, “मालक, मी झोपडीसमोरच्या जागेत काही भाजीपाला, फळझाडे लावली आहेत. शेजारचा ससा सारखा तेथे येऊन भाजीपाला, फळझाडे खाऊन जातो. त्यावर दगड फेकले, धावून गेले, त्याला भीती दाखवली तरी तो कशालाच जुमानीत नाही. तेव्हा आपण त्याचा बंदोबस्त केला तर बरे होईल. तेव्हा आपण उद्या तेथे येऊन त्या सशाचा बंदोबस्त करू, असे त्या माणसाला सांगून परत पाठविले. दुसर्‍या दिवशी मालक घोड्यावर बसून बरोबर काही मित्र, कुत्रे असा लवाजमा घेऊन तेथे आला. मग मालक व बरोबर आलेले त्याचे घोडेस्वार मित्र त्या माणसाला म्हणाले, सशाच्या बिळाजवळ जाऊन जोरजोराने शिंग वाजव म्हणजे ससा बाहेर पडताच आम्ही त्याचा समाचार घेऊ. यावर तो माणूस जोरजोराने शिंग वाजवू लागला. कुत्री भुंकू लागली. आवाजाने बिळातील ससा घाबरला आणि बाहेर पडून भाजी व फळझाडांच्या वाफ्यातून सैरावैरा धावू लागला. ससा पाहताच कुत्रीही त्याच्या पाठी लागली. मालक आणि त्याचे घोडेस्वार मित्रही सशापाठी धावू लागले. ससा सर्व भाजीपाल्यात पळत आसरा शोधू लागला. थोड्याच वेळात ससा तेथून निसटून जाण्यात यशस्वी झाला. बराच वेळ झाला. काही हालाचाल दिसली नाही. तेव्हा सर्वांना कळून चुकले ससा दुसरीकडे पळून गेला आहे. मग त्या माणसाचे लक्ष भाजी आणि फळझाडांच्या पिकाकडे गेले असता त्याचा झालेला विध्वंस पाहून त्याने कपाळाला हात लावला. घोडेस्वार आणि कुत्र्यांनी सर्व पिकात नाचून सर्व मळा उजाड करून टाकला होता.

तात्पर्य- कधी कधी रोग परवडला पण औषध नको असे म्हणण्याची पाळी येते.

लहान मुलांना गुदद्वाराच्या जागी खाज का येते?

लहान मुलांना गुदद्वाराच्या जागी खाज का येते?

खूप वेळा लहान मुले संडासच्या जागी (गुदद्वाराजवळ) खाजवताना दिसतात. विशेषतः संध्याकाळ व रात्रीच्या वेळी ही बाब प्रकर्षाने जाणवते. खाज येण्याच्या अनेक कारणांत खरूज, त्वचादाह, अ‍ॅलर्जी इत्यादींचा समावेश होत असला; तरी अशी खाज फक्त गुदद्वाराजवळ न येता शरीरात अनेक ठिकाणी येते. तंतूकृमी किंवा एन्टेरोबियस व्हर्मीयूलॅरिस नावाच्या जंताची लागण झाली की, या जागेवर खाज येणे हे लक्षण दिसून येते. सोबतच चिडचिड करणे, झोप न येणे, अंथरुणात नकळत लघवी होणे ही लक्षणेही दिसून येतात. वारंवार खाजवल्यामुळे रक्त येते, जंतुसंसर्ग होऊन कधी कधी पू सुद्धा येतो. भारतात अनेक जणांना हा रोग असतो. या जंताची मादी एक सेंमी लांब असते. नर मात्र ०.३ सेंमी इतका लांब असतो. हे जंत पचनसंस्थेतील लहान आतडे, आंत्रपुच्छ, मोठे आतडे यांच्या आवरणाला चिकटून असे राहतात. फलन झाल्यावर रात्रीच्या वेळेस मादी गुदद्वाराबाहेर येऊन सुमारे १०,००० अंडी घालते व मरण पावते. स्त्रियांमध्ये क्वचित ही जंताची मादी गुदद्वारातून बाहेर येऊन योनीमार्गात जाते व गर्भाशयातून पोटाच्या आतील आवरणात जाऊ शकते. मादीच्या गुदद्वाराबाहेर येण्यामुळे, अंडी घालण्यामुळे गुदद्वारापाशी खाज येते. ही अंडी अस्वच्छपणामुळे व खाजवल्यामुळे नखाच्या घाणीतून परत तोंडात जातात. लहान आतड्यात गेल्यानंतर त्यातून अळी बाहेर येते. महिन्याभरात त्याचे प्रौढ जंत तयार होऊन पुन्हा हे चक्र सुरू राहते. या जंतांसाठी पिरँटील पामोएट वा मेबेंडॅझोल हे औषध प्रभावी ठरते. वैयक्तिक स्वच्छता नीट राखल्यास या जंताची लागण होणार नाही. नखे कापणे, शौचाला जाऊन आल्यानंतर तसेच जेवणापूर्वी हात साबण लावून पाण्याने स्वच्छ धुणे, एकमेकांचे कपडे न घालणे; या सोप्या गोष्टींमुळे या जंतांची लागण आपल्याला टाळता येते.