नाचणीचे लाडू

0
70

नाचणीचे लाडू


साहित्य – १ किलो नाचणी भाजून दळून आणावी. तीन वाट्या पीठ, १ वाटी साजूक तूप, २ वाट्या गूळ अगर पिठीसाखर, १ वाटी कणीक, चारोळ्या, १ चमचा जायफळ पूड.

कृती – ३ वाट्या नाचणी पीठ, १ वाटी कणीक एकत्र करून तुपावर खमंग भाजून घ्यावे. पीठ गरम असतानाच गूळ चिरून
घालावा. अर्धी वाटी दुधाचा शिपका द्यावा (कोमट पिठात पिठीसाखर मिसळावी). पीठ, जायफळ पूड, गूळ एकत्र चांगले मिसळावे. लागल्यास दूध, तूप घालावे. लाडू वळावेत. ५-६ चारोळ्या प्रत्येक लाडवावर दाबून बसवाव्यात. छान दिसतात. रोगप्रतिकारशक्ती नाचणीत आहे. भरपूर प्रमाणात लोह आहे. नाचणीचा लाडू रोज खायला हरकत नाही.