मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
21

शिंगाने दिला दगा

एका कुरणात पोटभर चरल्यावर एक सांबर पाणी पिण्यासाठी तळ्याकाठी आले. पाणी पीत असता त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले. पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहताच सांबर मनात म्हणाले, “माझी शिंगे किती सुंदर दिसतात! त्याला फुटलेले फाटे तर अवर्णनीयच! माझे सुंदर डोळे माझ्या सौंदर्यात भर घालतात, तर माझे तोंड मला किती शोभून दिसते! माझ्या अंगावरील केस माझ्या सौंदर्याला चार चांद लावतात!” पण पायाकडे दृष्टी जाताच सांबर फारच नाराज झाले. म्हणाले,” माझे हे बारीक पाय मात्र किती खराब दिसतात. माझ्या सुंदर शरीराची शोभा या पायांनी फार कमी केली. त्यापेक्षा हे पाय नसते, तर बरे झाले असते.” असा विचार सांबर करतो आहे, तोच जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. वाघाची चाहूल लागताच सांबर चौखूर धावू लागले. वाघ त्याचा पाठलाग करू लागला. थोड्याच वेळात सांबर वाघापासून खूप दूर गेले. धावता धावता एके ठिकाणी त्याची सुंदर दिसणारी शिंगे एका झाडाच्या पारंब्यात अडकली. शिंगे सोडवायचा प्रयत्न सांबर करू लागले, पण ती जास्तच अडकत चालली. इतयात वाघाने त्याला गाठले. एकाच ढांगेत त्याची मान आपल्या जबड्यात आवळली. मरता-मरता सांबर मनात म्हणाले,” हाय रे दैवा, ज्या पायांना मी दूषण दिले, त्यांनी संकटापासून मला दूर नेले आणि माझा घात केला. या शिंगांमुळेच माझे मरण ओढवले.” तात्पर्य ः नुसत्या दिखाऊपणावर न जाता एखाद्याचे गुण विचारात घेणे केव्हाही शहाणपणाचे ठरते