शुभलक्षणी लक्ष्मीदेवी
* वास्तूनुसार दुकानातील प्रवेशय्द्वाराच्या उजव्या हाताला गणेशाची व लक्षीदेवतेची मूर्ती स्थापने शुभलक्षणी मानले जाते.
लक्ष्मीदेवतेचे चित्र दुकानाच्या ईशान्य दिशेला
लावणे शुभलक्षणी समजले जाते.
* पिरॅमीड धनाशी संबंधीत बबींमध्ये
म्हणजे गल्ल्यात ठेवावा. पिरॅमीड सकारात्मक
ऊर्जा देतात.
वास्तू
करपलेली त्वचा
* टोमॅटो एक उपयुक्त वस्तू आहे. दोन
टोमॅटो घेऊन त्यांचा रस काढावा. त्याचप्रमाणे
दोन चमचे क्रीम वा मलई घ्यावी. दोन्ही पदार्थ
एकत्र मिसळून फेटून घ्यावेत आणि कापसाने
चेहर्यावर लावावेत. यामुळे करपलेली त्वचा
कोमल व उजळ होते.
* हिरव्या मुगाची डाळ व मेथ्या रात्री
भिजवून सकाळी वाटून त्याने केस धुवावेत.
केस मुलायम होतात.
फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे चिकटत असेल तर
कंबरदुखी : विशेषतः महिलांनी रात्री
झोपताना गरम पाण्याच्या पिशवीने कंबर
शेकावी. रोज १ चमचा सुंठवडा आठ दिवस
खाल्ल्याने कंबरदुखी बंद होते.
उसण भरणे- कोठेही उसण भरली,
चलक आली तर मोहरीचे तेल मालीश करून
लावावे व मग तो भाग शेकावा.
* फ्रीजरमध्ये बर्फाचा ट्रे चिकटत
असेल तर त्याच्या तळाला थोडेसे ग्लिसरीन
लावा. आता तो चिकटणार नाही.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा,नगर
दैनिक पंचांग शनिवार, दि. २७ एप्रिल २०२४
संकष्ट चतुर्थी, शके १९४६ क्रोधीनाम संवत्सर, चैत्र कृष्णपक्ष, ज्येष्ठा २८|२८
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये.
वृषभ : व्यस्त रहाल. मनोरंजनासाठी काही प्लॅन कराल. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल.
मिथुन : काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा.
कर्क : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा.
सिंह : कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.
कन्या : देवाण-घेवाण टाळा. आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात.
आनंदाची बातमी मिळेल.
तूळ : एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते.
मतभेदांपासून लांब रहा.
वृश्चिक : प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. कसूर नको. जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल.
धनु : नवीन योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक नुकसानाची शयता आहे. आनंदाची बातमी मिळेल.
मकर : लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल.
कुंभ : मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल.
मीन : मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. वैवाहिक जीवनात
सुख मिळेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भंडाऱ्याचे वाटप
भिंगारमधील सर्व मंडळांचा भाऊ भिंगारदिवे मित्रमंडळाच्या वतीने सन्मान
नगर – भिंगारमधील भाऊ भिंगारदिवे मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिंगार परिसरातील नागरिकांसाठी भंडार्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडारा वाटपाचा शुभारंभ नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला. भंडार्याचा नागरिकांनी लाभ घेतला. याबरोबरच परिसरात घरोघरी भंडार्याचे वाटप करण्यात आले. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नीलेश लंके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रदीप जाधव, भाऊ भिंगारदिवे, राजू पाटोळे, राजू साळवे, सादिकभाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भाऊ भिंगारदिवे मित्रमंडळाच्या वतीने याप्रसंगी भिंगारमधील सर्व मंडळांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाऊ भिंगारदिवे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यभर दीनदुबळ्यांना आधार देण्याचे कार्य केले. त्यांचा वैचारिक वारसा समोर ठेवून भाऊ भिंगादिवे मित्र मंडळाने घेतलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. प्रदीप जाधव म्हणाले की, भाऊ भिंगारदिवे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी आंबेडकर जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी केली जाते. अनावश्यक खर्चाला फाटा देवून परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाऊ भिंगारदिवे मित्रमंडळ विविध उपक्रमां द्वारे गोरगरीब जनतेला आधार देण्याचे कार्य करत आहे. डीजेवर नाचण्यापेक्षा गरजूंच्या घरात अन्न देऊन पुण्याचे काम करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?
मृत्यूनंतर मृतदेह कडक का होतो?
माणूस मेल्यानंतर सुरुवातीला त्याचे स्नायू शिथिल होतात व शरीर सैल पडते. ही अवस्था तीन ते चार तास राहते. त्यानंतर मात्र शरीरात काही बदल घडून येतात. स्नायूंतील बदलांमुळे मृतदेह कडक होतो. स्नायूंमध्ये मायोसीन आणि अॅटीन नावाचे तंतू असतात. त्यांच्या आकुंचन-प्रसरणामुळेच स्नायूंचे आकुंचन-प्रसरण होत असते. आकुंचन पावल्यानंतर स्नायू कडक होतात तर प्रसरणामुळे शिथिल होतात. मृत्यूनंतर शरीरात, स्नायूंमध्ये ऊर्जेची निर्मिती होऊ शकत नाही. त्यामुळे मायोसीन व अॅटीन हे तंतू एक-दुसर्यात मिसळून त्यांचे निर्जलीकरण होऊन एक कडक पदार्थ तयार होतो. साहजिकच या तंतूचे आकुंचन-प्रसरण थांबते व स्नायू व पर्यायाने मृतदेह कडक होतो. या प्रक्रियेला इंग्रजीत रायगर मॉर्टीस असे म्हणतात. भारतात मृतदेह कडक होण्याची प्रक्रिया मरणानंतर २ ते ३ तासांनी सुरू होते. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला सुमारे १२ तास लागतात. त्यानंतर १२ तासांत शरीर परत शिथिल होते. मायोसीन व अॅटीनचे विघटन झाल्यामुळे स्नायूंचा कडकपणा जातो. रायगर मॉर्टीसमुळे मृत्यूच्या वेळेसंबंधी अंदाज बांधता येतो. दुसरे म्हणजे, मरणाच्या वेळी व्यक्तीची काय अवस्था होती, हेही कळू शकते. असे हे रायगर मॉर्टीस म्हणजेच मृतदेहांचे कडक होणे. गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी याद्वारे जणू मृतदेहही मदत करतो!
आहारावर त्वचेचे आरोग्य अवलंबून
आहारावर त्वचेचे आरोग्य अवलंबून
आपल्याला सगळ्यांनाच, आपली त्वचा अतिशय सुंदर, नितळ, निरोगी असावी असे वाटत
असते. त्यासाठी आपण नाना प्रकारचे उपाय ही वेळोवेळी करीत असतो. पण त्वचेची सुंदरता ही
आनुवंशिक असते, आणि त्याशिवाय त्वचा नितळ आणि सुंदर ठेवण्यासाठी त्वचेची योग्य निगा
राखणे देखील आवश्यक आहे. आपल्या त्वचेचे आरोग्य आणि आपला आहार यांचा थेट संबंध
आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलेले काही पदार्थ
आपल्या त्वचेकरिता हानिकारक ठरू शकतात.
आलू-कॉर्न पॅटीस
आलू-कॉर्न पॅटीस
साहित्य : ३ उकडलेले बटाटे, १
कप मयाचे उकडलेले दाणे थोडे ठेचून, १
स्लाईस ब्रेड, लागल्यासच थोडे कॉर्नफ्लोअर,
१ कांदा, १ सिमला मिरची बारीक चिरून,
मीठ व आले, मिरचीचे वाटण चवीनुसार.
कृती : ब्रेड स्लाईस कुस्करून घ्यावे.
बटाटे सोलून किसून घ्यावे. सर्व साहित्य एकत्र
करावे. लहान लहान ‘टिक्की’ बनवून तळाव्या.
पुदिन्याच्या चटणीबरोबर द्याव्या.







