जो दुसर्याचे नुकसान कसे करावे हे जाणत नाही, त्यालाच परोपकारी म्हणून ओळखावे. : मुरारी बापू
खसखसवाले आलू
खसखसवाले आलू
साहित्य : पाव किलो बटाटे साले
काढून, चवीप्रमाणे मीठ, कढीलिंबाची पाने
अर्धा ते १ चमचा तिखट, सरसूचे तेल १
टेबलस्पून, खसखस भाजलेली १ टेबलस्पून,
बारीक चिरलेली कोथिंबीर, १ हिरवी मिरची
चिरून.
कृती : भाजलेली खसखस अर्धा तास
पाण्यात भिजत घालावी व मिसरमध्ये बारीक
वाटावी. कढईत तेल तापत ठेवून त्यात मिरची,
कढीलिंब, हिंग व हळद घालावी. त्यावर
बटाट्याच्या फोडी घालून चवीप्रमाणे मीठ
घालावे. खसखशीचे वाटण व लाल तिखट
घालून अर्धी वाटी पाणी घालावे. गॅस बारीक
करून झाकण ठेवावे व बटाटा मऊ होईपर्यंत
शिजवावे. वर कोथिंबीर व लिंबाचा रस
घालावा.
त्वचा कोरडी व रखरखीत असेल तर
जर आपली त्वचा कोरडी व रखरखीत
असेल तर दुधावरील साय घेऊन आपल्या
चेहर्यावर, हातावर व शरीराच्या इतर भागांवर
व्यवस्थित चोळा. स्नानापूर्वी शरीराच्या प्रत्येक
भागाची मोहरीच्या तेलाने मालिश करा व
स्नानाच्या पाण्यात जैतून व बदामाचे तेल
२-४ थेंब मिसळा. यामुळे शरीर मुलायम,
सुंदर होऊन उजळेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा,
नगर.
दैनिक पंचांग मंगळवार, दि. ३० एप्रिल २०२४
—-, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
चैत्र कृष्णपक्ष, उ.षा.२८|०९
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. आपले काम
धाडसाने करा. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील.
वृषभ : एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते.
नवीन योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील. प्रवासाचे योग संभवतात. घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील.
कर्क : संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापारय्व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल.
सिंह : आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या. आर्थिक नुकसानाची शयता आहे. आरोग्य उत्तम राहील. आपली कामे धाडसाने करा. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे.
कन्या : नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. आनंदाची बातमी मिळेल.
तूळ : अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकार्यांपासून लाभ मिळेल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद.
वृश्चिक : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा.
अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील.
धनु : अनपेक्षित खर्च होण्याची शयता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल. पण खाण्या-
पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या.
मकर : अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील.
कुंभ : नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील. आरोग्य नरम-गरम राहील. अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल.
मीन : महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन
आपल्यासाठी आनंद आणेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे काय?
टॉवर ऑफ सायलेन्स म्हणजे काय?
माणूस मेल्यानंतर त्याचे काय करायचे, हे त्याच्या धर्मानुसार वा मृत्यूपूर्वी त्याने काही इच्छा (उदा. देहदान) लिहून ठेवली असेल तर त्यावर ठरते. हिंदूंमध्ये मृतदेहाला अग्नी देतात. मुस्लीम आणि ख्रिश्चन लोक मात्र मृतदेह पुरतात. मृतदेहाला अग्नी देण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे लाकडांचा वापर करून चिता तयार केली जाते. आजकाल विद्युतदाहिन्यांमध्येही मृतदेहाला अग्नी देतात. अर्थात ही सोय फक्त मोठ्या शहरांमध्येच उपलब्ध आहे. तुम्हाला वाटेल, ही काय भलतीच चर्चा सुरू केली आहे! पण ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ म्हणजे काय, हे सांगण्यासाठी ही पार्श्वभूमी आवश्यक आहे. पारशी लोक ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात किंवा मृतदेह ठेवतात. हा टॉवर एखाद्या टेकडीवर बांधलेला असतो. या टॉवरच्या तळाशी सुमारे ३०० फूट परिघाचा एक गोलाकार ओटा असतो. या ओट्याच्या मध्यभागी सुमारे १५० फूट परिघाची गोलाकार विहीर असते. गोलाकार ओट्यावर मृतदेह ठेवला जातो. १५ ते ३० मिनिटांत गिधाडे गोळा होऊन त्या मृतदेहावरचे सर्व मांस खाऊन त्याचे रूपांतर हाडांच्या सापळ्यात करतात. हवा व तापमान यांच्यामुळे हाडे वाळल्यावर ती ओट्याच्या आतील भागातील विहिरीत टाकली जातात. तेथे विघटन होऊन त्यांचा भुगा होतो. भिंतीमध्ये असलेल्या छिद्रांतून पावसाचे पाणी विहिरीत येते व हाडांचा भुगा या पाण्याबरोबर वाहून जातो व मातीत मिसळला जातो. अशा प्रकार मृतदेहाची चांगल्या रितीने विल्हेवाट लावली जाते. ही पद्धत कमी खर्चाची, कमी वेळ लागणारी आहेच; पण यात भुकेल्या गिधाडांना अन्नही मिळते. मृतदेह जाळल्यामुळे होणारा धूर, प्रदूषण हे त्रासही वाचतात. मुख्य म्हणजे मृत्यूबद्दलची अनावश्यक व लेषदायी भावनिकताही यात नसते.
निरोगी गरोदरपण
निरोगी गरोदरपण
गरोदरपण ही स्त्रीच्या जीवनातील एक फार महत्त्वाची अवस्था आहे. गरोदरपणात
व्यवस्थित काळजी घेतल्यास आई व मूल या दोघांचे आरोग्य सांभाळले जाते. गरोदरपणात
काळजी घेण्याची प्रमुख उद्दिष्टे : आईला त्रास न होता गरोदरपण व बाळंतपण पार पाडणे.
या काळात निरनिराळे आजार येऊ शकतात व आधी असलेले काही आजार बळावतात. हे
आजार वेळीच ओळखून योग्य उपचार करणे, तसेच बाळंतपणातले धोके टाळून बाळंतपण
शय तितके निर्धोक करणे. गरोदरपण, बाळाचे संगोपन आदी आवश्यक ती माहिती देऊन
त्या दृष्टीने आईची तयारी करावयास हवी. जन्मणारे बाळ चांगल्या वजनाचे, अव्यंग व निरोगी
असावे म्हणून काळजी घ्यावी.





