शिक्षक : विश्वास म्हणजे काय?
बंड्या : उद्याचा दिवस आपण बघणार की नाही याची
खात्री नसतानाही आपण २८ दिवसाचा नेटपॅक मारतो
यालाच म्हणतात विश्वास…काही जण तर ८४ दिवसांचा
मारतात अतिआत्मविश्वास.
फ्रिज बंद झाल्यास
फ्रिज बंद झाल्यास
* काही कारणाने घरातील फ्रिज
बंद असेल आणि चुकून पूर्ण नारळ खोवला
तर जादा झालेला किस वाया जातो किंवा
ठेवलेल्या वाटीस खवट वासही येतो. अशा
वेळेस लागेल तेवढाच नारळ खवून घ्यावा.
मोठ्या पातेल्यात पाणी घालून त्यामध्ये वाटी
ठेवावी.
* वापरलेली चहाची पावडर फेकून न
देता, ती गुलाबाच्या कुंडीत वाळवून टाकावी.
खतासारखा उपयोग होतो.
टोळीचा गर्व
टोळीचा गर्व
झाडाच्या ढोलीत एक म्हातारे घुबड विश्रांती घेत असता फिरत-फिरत एक टोळ तेथे आला. त्याने आपल्या भसाड्या आवाजात गायला सुरूवात केली. बराच वेळ झाला तरी तो आपले बेसूर गायन थांबविण्याचे चिन्ह दिसेना. त्याच्या गायनाने घुबडाची झोपमोड होऊन त्याचे डोके ठणकू लागले. तेव्हा घुबड टोळाला विनंती करीत म्हणाले, “मित्रा आता तू येथून निघ. तुझ्या या पिरपिरीने मला वैताग आणलाय.” त्यावर टोळ गुर्मीतच म्हणाला, “ए चोरट्या, गप्प बैस. दिवसभर लपून बसतोस. रात्री सर्वजण झोपले, की कुठे तरी चोरी करून पोट भरतोस. तुला शरम कशी वाटत नाही? अशा प्रकारे त्याचा धिक्कार करीत टोळ त्याला शिव्या घालू लागला. त्यावर घुबड म्हणाले, “बाबा रे, माझे ऐक, नाही तर मागाहून पस्तावशील,” तरीही टोळाने आपला हेका न सोडता पुन्हा गायला सुरूवात केली. तेव्हा घुबड मनात म्हणाले,” आता याची खोड मोडलीच पाहिजे.” मग उघडपणे टोळाला म्हणाले,” अरे टोळभाऊ, माझे चुकलेच. खरे तर तू किती सुंदर गातोस ! तुझा गळा किती चांगला! ती कोकिळसुद्धा तुझ्यापुढे गाण्याचे धाडस करणार नाही. अरे, मी विसरलोच बघ. माझ्याजवळ एक अमृताची कुपी आहे. गाऊन-गाऊन तुझा घसा कोरडा पडला असेल, ये मित्रा, मी तुला थोडे अमृत प्यायला देतो. म्हणजे सुकलेल्या तुझ्या घशातून आणखी मंजूळ स्वर बाहेर पडतील.” टोळालाही ते खरेच वाटले. अमृत मिळण्याचे आशेने ते घुबडाजवळ जाताच घुबडाने त्याला पंज्यात पकडून खाऊन टाकले. तात्पर्य ः आपली कुवत किती आहे हे प्रथम ध्यानी घ्यावे.
फिंगर प्रिंट्स म्हणजे काय?
फिंगर प्रिंट्स म्हणजे काय?
अनेक वेळा तुम्ही फिंगर प्रिंटबद्दल ऐकले असेल. एखाद्या हिंदी चित्रपटात खून करून पळालेल्या वा खून केल्याचा संशय असलेल्या व्यक्तीच्या हाताच्या बोटांचे ठसे बुद्धिमान पोलिस इन्स्पेटर कोणत्या तरी निमित्ताने (जसे त्याचा पाणी प्यायलेला ग्लास मिळवून वगैरे!) घेतानाही तुम्ही पाहिले असेल. त्याच्या हुशारीला दादही दिली असेल. हाताच्या बोटांच्या ठशांचा खरेच काही उपयोग होतो का, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आधी हे लक्षात घेऊ की, बोटांच्या शेवटच्या पेरावर असलेल्या उंचवटे व खोलगट भागांवर हे फिंगर प्रिंट अवलंबून असतात. तुमची बोटे स्वच्छ धुवा. नंतर एखादे भिंग घेऊन त्याखाली बोटे बघा. तुम्हाला असे दिसेल की, बोटांवर चित्रात दाखवल्याप्रमाणे आकार दिसतील. यांना अनुक्रमे आर्च (पद्म), लुप (शंख), व्हर्ल (चक्र) व काम्पोझिट (संमिश्र) आकार असे म्हणतात. बाह्यत्वचा व अंतःत्वचेवर असणार्या उंचवटे व खोलगट भागांवर हे आकार अवलंबून असतात. हे जन्मल्यापासून दिसून येतात व आयुष्यभर बदलत नाहीत. त्वचा जर नष्ट झाली तर मात्र तेही नष्ट होतात. शंख, चक्र, पद्म व संमिश्र आकार यांच्या विविध रचना तयार होतात. दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट सारखे केवळ अशयच असते. दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट्स सारखे असण्याची शयता एकास चौसष्ट हजार दशलक्ष इतकी कमी असते. म्हणजे जगाच्या तिसपट लोकसंख्येच्या तिसपट लोकसंख्येतच दोन व्यक्तींचे फिंगर प्रिंट्स सारखे असू शकतात. या वैशिष्ट्यांमुळे गुन्हेगार पकडण्यासाठी ठशांचा खूप उपयोग होतो. कोणत्याही वयात ते बदलत नाहीत. हाताच्या बोटाची त्वचा शाबूत असलेल्या मृतदेहाचेही फिंगर प्रिंट्स घेता येतात. त्यामुळे व्यक्तीची खात्रीशीरपणे ओळख पटवता येते. एवढेच नाही तर, सांकेतिक भाषेत त्यांची माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवता येते. साहजिकच त्यामुळे बँकेतून पैसे काढताना निरक्षर व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा घेतात. नोकरीत कायम झालेल्या व्यक्तींच्या सर्व बोटांचे ठसे घेऊन ठेवतात. चोर पकडल्यावर पोलिसही त्याच्या बोटांचे ठसे घेऊन ठेवतात. ओळख पटविण्यासाठी त्याचा पुढे उपयोग करतात. फिंगर प्रिंट्सच्या आधारे अनेक गुन्ह्यातील खरा गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
बटाट्याचे काप
बटाट्याचे काप

साहित्य – ३ मध्यम आकाराचे बटाटे, १ कांदा, तांबडे तिखट अर्धा टीस्पून,
चवीप्रमाणे मीठ, फोडणीचे साहित्य, तेल, ओले खोवलेले खोबरे, कोथिंबीर पाव वाटी.
कृती – बटाट्याची साले काढून त्याच्या पातळ काचर्या कराव्या. कांदाही आवडीप्रमाणे
पातळ उभा किंवा बारीक चिरावा. कढईत १ ते २ टेबलस्पून तेल तापवून मोहरी, हिंग
जिरे घालून फोडणी करावी. पाव चमचा हळद घालून लगेचच चिरलेला कांदा परतावा. कांदा
लालसर रंगाचा झाल्यानंतर बटाट्याच्या काचर्या घालून परतावे. एक वाफ आल्यानंतर
तिखट-मीठ घालावे. भाजी मऊ शिजल्यानंतर शेवटी ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. या
भाजीत एक चमचा साधा मसाला घालूनही भाजी चांगली होते. तांबड्या तिखटाऐवजी
आवडीप्रमाणे हिरवी मिरची बारीक चिरून वापरली तरी छान लागते.
शेविंगसाठी नॅचरल लोशन
शेविंगसाठी नॅचरल लोशन

दाढी करताना कोरफडीचा गर प्रथम गळ्याला एक इंचाचा कोरफडीचा तुकडा घेऊन
तो चोपडावा. कोरफडीचा उरलेला तुकडा घेऊन फ्रीजमध्ये ठेवावा व नियमितपणे वापरावा.
दाढीपूर्वीचे लोशन दाढीनंतरचे लोशन असे काहीच या प्रकाराने दाढी केल्यास लावावे लागत
नाही. दाढी केल्यानंतर चेहरा अगदी उजळ होऊन स्वच्छ होतो.
दैनिक पंचांग बुधवार, दि. १ मे २०२४
कालाष्टमी, महाराष्ट्र दिन, शके १९४६
क्रोधीनामसंवत्सर, चैत्र कृष्णपक्ष, श्रवण
२७|११
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.
मेष : आपल्या संपर्कात येणार्या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील.
वृषभ : योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. काही नवीन संधी मिळतील. शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. शत्रू पराजित होईल.
मिथुन : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. पोरकटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.
कर्क : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रितीने कार्य करण्यास आपली मदत करेल. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील.
सिंह : गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. शांत राहाण्याचा प्रयत्न करा. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शयता आहे.
कन्या : आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. घरातील वातावरण आनंददायी राहील. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल. काम व इच्छित योजनेला अमलात आणण्याचे
प्रयत्न करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा.
वृश्चिक : आपल्याला कार्यालयामध्ये अथवा घरामध्ये आज थोडा मनस्ताप होण्याचा योग आहे. वाहने जपून चालवावीत. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा.
धनु : मागील उधारी उसनवारी वसुल होईल. बाहेरचे पदार्थ, हॉटेलिंग वगैरे जपून करा. मागील उधारी वसुल होईल. कौटुंबिक सुख वाढेल. शत्रू पराभूत होतील. व्यापारय्व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. मित्रांचे सहकार्य मिळेल.
मकर : मागील काही दिवसांपासून जे आपण नियोजन केलेले आहे ते आज फळास
येईल. उपकरणे जपून वापरा. व्यापारय्व्यवसायात जोखमीचे काम टाळा. प्रेम- प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च
अधिक होईल.
कुंभ : बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागतील. कुटुंबियांचा सहवास लाभेल. नोकरदार कामात व्यस्त राहातील. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. आरोग्य नरम-गरम राहील.
मीन : आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. सुख-शांतीचे वातावरण राहील. हसत खेळत वेळ खर्च होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
त्से त्से माशी म्हणजे काय?
त्से त्से माशी म्हणजे काय?
तुम्ही म्हणाल काय बुवा हे नाव! त्से त्से माशी ही घरात नेहमी दिसणार्या माशीसारखीच एक प्रकारची माशी आहे. त्से त्से माशी व घरातील माशी यांच्यात बरेच साम्य आहे. त्से त्से माशी अर्धा इंच लांब असते व तिचा रंग पिवळसर किंवा गडद तपकिरी असतो. कात्रीच्या पात्यांसारखे पंख असलेल्या या माशीची सोंड खूप तीक्ष्ण व मजबूत असते. या सोंडेनेच ही माशी चावते व त्वचेला छिद्र पाडून रक्त प्राशन करते. आपल्या सुदैवाने ही खतरनाक माशी आफ्रिका खंडात आढळते. आपल्याकडे ती दिसून येत नाही. त्से त्से माशी सुमारे १०० दिवस जगते. ती अंडी न घालता सरळ अळ्यांनाच जन्म देते. त्से त्से माशी माणसांना, पक्ष्यांना किंवा प्राण्यांनाही चावतात. या माशा प्रामुख्याने दिवसाच चावे घेतात. या माशांमुळे ‘स्लिपींग सिकनेस’ या रोगाचा प्रसार होतो. ‘ट्रिपॅनोसोमा ब्रूसी’ नावाचे या रोगाचे जंतू त्से त्से माशीमुळे निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. अशा व्यक्तीला सुरुवातीला ताप येतो. तापासोबत शरीरातील लसिकाग्रंथी मोठ्या होतात, सूजतात. कालांतराने मेंदूवर परिणाम होतो. हा रोग झालेली व्यक्ती अशक्त होत जाते व वर्ष-दीड वर्षात मरण पावते. या गंभीर रोगाचे त्यामुळेच दूरगामी, सामाजिक व आर्थिक परिणाम होतात. “नाकावरची माशी देखील उठत नाही” असे आपण गमतीने म्हणतो. पण जर देश आफ्रिकेतला असेल आणि माशी ‘त्से त्से’ असेल तर मात्र खैर नाही. कारण अशी माशी आपल्या प्राणावरच बेतू शकते. त्से त्से माशा राहतात ती झाडेझुडपे नष्ट करून व डी.डी.टी., डायएल्ड्रीनसारख्या कीटकनाशकांचा वापर करून या माशीचा बीमोड करता येतो.




