स्पायर्स ब्रेड पोटॅटो

स्पायर्स ब्रेड पोटॅटो

साहित्य : ४ उकडलेले बटाटे, २
वाट्या वाफवलेले मटार, १ कांदा, १ टोमॅटो,
थोडी कोथिंबीर बारीक चिरून, आले-लसूण
पेस्ट, ५० ग्रॅम लोणी, अर्धी वाटी दूध, १
चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, ६ ब्रेड
स्लाइसचा चुरा, एक चमचा जिरे-मिरे, गरम
मसाला व मीठ.
कृती : बटाटे उकडून, सोलून,
कुस्करून घ्यावेत. त्यात दूध आणि लोणी
फेटून घ्यावे. जिरे-मिरे भरड वाटून त्यात
मिसळावे. मीठ घालावे. ब्रेडचा अर्धा चुरा
मिसळावा. थोड्या तेलावर कांदा, मिरची
टोमॅटो परतून घ्यावे. त्यात आले-लसूण
पेस्ट, कोथिंबीर, मीठ, साखर, चिमूटभर
गरम मसाला घालावा. मटार घालून मिसळून
खाली उतरवावे. आता बेकिंग डिशला लोणी
लावावे. त्यात बटाट्याचा अर्धा गोल थापावा.
वरून उरलेला ब्रेडचा चुरा पसरावा. थोडे
लोणी घालून आणि ओव्हनमध्ये १६० अंश
वर वीस मिनिटे भाजावे.

वास्तू

घरातील दोष करा नाहिसे
घरात सकाळी खिडया उघडून
ठेवाव्यात. उत्तर-पूर्व दिशेच्या खिडया, दारे
येथून सूर्यप्रकाश आल्यास घरातील दोष
तसेच आजारपण दूर होतात.

चेहर्‍यावरील मुरुम घालवण्यासाठी

टोमॅटो आपल्या चेहर्‍यावरील मुरुम
घालवण्यासाठी उत्तम औषध आहे. २००
ग्रॅम टोमॅटो व ओल्या हळदीचा रस नियमित
तीन महिने चेहर्‍यावर लावल्याने मुरुम नाहीसे
होतात व चेहरा सतेज होतो.

पोटदुखी

पोटदुखी : ओवा व साखर गरम
पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते.
लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही
कमी होते. अगदी तान्हे बाळ असेल तर
आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच
वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते. मात्र,
गॅसेसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर
हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती
दिल्याने आराम पडतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

बायको : कशी दिसतेय मी…
नवरा : प्रियंका चोप्रा दिसतेयस…
बायको : खरच… डॉन मधली की क्रिश मधली
नवरा : बर्फी मधली…

गुरुजी : कोंबडी आधी का अंड?
गणेश : आधी चणे, मग अंड, मग २ बीयर, शेवटी कोंबडी
आणि बील
गुरूजी कोमात जातात

दैनिक पंचांग रविवार, दि. २८ एप्रिल २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, चैत्र कृष्णपक्ष, मूळ २८|४९
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : कामांची प्रशंसा हाेईल. भागीदारी पक्षात हाेऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील. जाेखमीची कामे टाळा. एखाद्याच्या सहयाेगाने कार्ये पूर्ण हाेतील.

वृषभ : अध्ययनात छान यश. अर्थ प्राप्तिचा याेग. उपजीविकेच्या स्त्राेतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ.

मिथुन : उपजीविकेच्या स्त्राेतातून लाभ हाेईल, लाेकप्रियतेत वृद्धि हाेईल. राेग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ.

कर्क : उत्तम वाहनसुख. तब्बेतीत सुधारणा. धार्मिक कार्यात वेळ जाईल. काळजीपूर्वक काम करा. महत्वाचे काम टाळा.

सिंह : काेणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आराेग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल.

कन्या : मनाला प्रसन्नता वाटेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. मित्रांकडून आर्थिक लाभ हाेईल. आनंदाची बातमी मिळेल.

तूळ : आजचा दिवस कठाेर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबराेबर व्यतित करण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक : मानसिक सुखशांती मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबाकडून सहयाेग मिळेल. काैटुंबिक
सभासदांशी वादविवाद टाळा.

धनु : वेळ मनाेरंजनात व्यतीत हाेईल. प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. कामाचा भार अधिक राहील.

मकर : मनाेरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. मनाेरंजनासाठी काही प्लॅन कराल. व्यवसायिकांना दिवस संमिश्र.

कुंभ : काळ अनुकूल आहे कामे सहज हाेतील. राजकारणी लाेकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित हाेईल. जाेडीदाराबराेबर घालवलेली वेळ सुखद राहील.

मीन : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही प्रश्नांची साेडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल. शत्रूंपासून दूर राहा. देवाण-घेवाण टाळा.

संकलक : अ‍ॅड. साै. पूजा गुंदेचा, नगर.

लहान मुले माती का खातात?

लहान मुले माती का खातात?

नवीनच रांगायला शिकणारी मुले जे दिसेल ते तोंडात घालतात. काही मुले माती खातात, पेन्सिल खातात. याचे कारण काय ते आता पाहू. आहारात लोह व कॅल्शियम या क्षारांची कमतरता असल्यास, मुलाला वरचे अन्न सुरू न केल्यास, अ‍ॅनेमिया वा रक्तक्षय (कोणत्याही कारणामुळे) असल्यास मुले माती खातात. काही मुलांमध्ये, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही ही भावना वाढीस लागल्यानेही ते माती, पेन्सिली वगैरे खाऊन सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. कृमींची लागण झालेली मुलेही माती खातात. माती खाल्ल्याने कृमींची लागण होऊ शकते. मुलाला लोहक्षार जास्त प्रमाणात दिल्याने मुले माती खाणे बंद करतात. तसे न झाल्यास मानसिक कारणांचा शोध घ्यावा लागतो. माती खाणार्‍या मुलाच्या पाठीत धपाटा मारताना मातेने या कारणांकडे थोडे लक्ष दिल्यास त्याचे माती खाणे थांबू शकेल.

कोरफड कफावर उपयुत

कोरफड कफावर उपयुत
लहान मुलांच्या कफावर कोरफड फार उत्तम गुण देते. कोरफडीची पाने विस्तवावर थोडी
गरम करुन त्याचा अंगररस काढावा आणि त्यात किंचिंतसे मीठ टाकून लहान मुलास पिण्यास
द्यावे. म्हणजे परसाकडे साफ होऊन कफ नाहीसा होतो.

सुविचार

चांगुलपणाचा मार्ग भयाने भरलेला; परंतु त्याचा परिणाम अति उत्तम असतो. : दयानंद सरस्वती

पनीर-आलू पॅटीस

पनीर-आलू पॅटीस

साहित्य : अर्धा किलो उकडलेले
बटाटे, ४-५ लसूण पाकळ्या बारीक
चिरलेल्या, १ चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी
ओले खोबरे, पाव किलो पनीर किसून, १ मोठा
कांदा बारीक चिरून, २-३ मिरच्या बारीक
चिरलेल्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर,
दीड चमचा मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा
चमचा गरम मसाला, १ ब्रेडचे तुकडे, २ चमचे
कॉर्नफ्लोअर, चार ताज्या ब्रेडच्या तुकड्यांचा
चुरा, तळण्यासाठी तेल.
कृती : बटाटे उकडून त्यांची साले
काढून गरम असतानाच किसावेत. गुठळी राहू
देऊ नये. त्यातच कॉर्नफ्लोअर मिसळलेल्या
ब्रेडचा चुरा व थोडे मीठ घालून मळून घ्या.
आता तेल व ब्रेडचा चुरा सोडून उरलेले सर्व
साहित्य एकत्र कालवून घ्यावे. हे सारण तयार
झाले. आता लाडवाएवढा बटाट्याचा गोळा
घेऊन पुरणाच्या उंड्याला करतो तशी वाटी
करावी. एक चमचा सारण घालून मोदकाप्रमाणे
तोंड बंद करावे व शेंडीही दाबावी. गोल किंवा
बदाम असा कुठलाही आकार द्यावा. हा गोळा
ब्रेडच्या चुर्‍यामध्ये घोळवून पुन्हा हाताने वर
चुरा दाबावा. कढईत तेल गरम करून त्यात
गोळे तळून घ्यावेत. सगळे पॅटीस एकदम
करून घेऊन तळायच्या वेळी ब्रेडच्या चुर्‍यात
घोळवून घ्यावेत व नंतर तळावेत.