खसखसवाले आलू

0
46

खसखसवाले आलू

साहित्य : पाव किलो बटाटे साले
काढून, चवीप्रमाणे मीठ, कढीलिंबाची पाने
अर्धा ते १ चमचा तिखट, सरसूचे तेल १
टेबलस्पून, खसखस भाजलेली १ टेबलस्पून,
बारीक चिरलेली कोथिंबीर, १ हिरवी मिरची
चिरून.
कृती : भाजलेली खसखस अर्धा तास
पाण्यात भिजत घालावी व मिसरमध्ये बारीक
वाटावी. कढईत तेल तापत ठेवून त्यात मिरची,
कढीलिंब, हिंग व हळद घालावी. त्यावर
बटाट्याच्या फोडी घालून चवीप्रमाणे मीठ
घालावे. खसखशीचे वाटण व लाल तिखट
घालून अर्धी वाटी पाणी घालावे. गॅस बारीक
करून झाकण ठेवावे व बटाटा मऊ होईपर्यंत
शिजवावे. वर कोथिंबीर व लिंबाचा रस
घालावा.