पाककला

0
28

गार्लिक पोटॅटो

साहित्य : ४ बटाटे, २ मध्यम आकाराचे
कांदे, ७-८ लसूण पाकळ्या, लिंबाचा रस,
कोथिंबीर बारीक चिरून, साखर व मीठ
आवडीप्रमाणे, ४-५ सुया लाल मिरच्या.
कृती : बटाटे व कांद्याची साले काढून
पातळ लांबट फोडी कराव्यात. लाल मिरच्या,
मीठ व लसूण एकत्र वाटून घ्यावे. कढईत
पाव वाटी तेल गरम करून फोडणी करावी.
फोडणीत वाटण व कांदा परतून घ्यावा. त्यात
पाव चमचा हळद घालावी व बटाट्याच्या फोडी
घालाव्यात. झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी
शिजू द्यावी. लाल मिरचीमुळे भाजीला सुंदर
लाल रंग व स्वादही येतो. भाजी शिजल्यानंतर
२ टीस्पून लिंबाचा रस व कोथिंबीर घालावी.