जगात भुते असतात का?

0
80

जगात भुते असतात का?

लहानपणापासून तुम्हाला भुताखेतांची भिती दाखवली गेली असेल. अंधार, बागुलबुवा तसेच भुते यांच्याबद्दल कोणत्याही लहान मुलाला भीती वाटतेच ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, तसे भीती कमी होत जाते. खरेच का जगात भुते असतात? या प्रश्नाच्या दोन्ही बाजूंनी अत्यंत निर्धारपूर्वक बोलणारे अनेक जण भेटतील देव आहे किंवा नाही पुनर्जन्म आहे किंवा नाही; तसाच हाही एक वादाचा तर कधी वितंडवादाचा मुद्दा होऊ शकतो. माहिती नसलेल्या गोष्टींबद्दल गूढतेचे वलय निर्माण होतेच. त्यामुळेच सर्वांनाच भुतांच्या गोष्टीत कमालीचे स्वारस्य असते. भुते माणसाच्या मनात असतात. असे म्हणतात व ते खरे आहे. माणसाच्या मानसिक दौर्बल्याचा एक आविष्कार म्हणजे भूते होत. भुताचे अस्तित्व शास्त्राने अमान्य केले आहे. भूत हे कोणालाही सिद्ध करता आलेले नाही. भूताने झपाटणे, भूतबाधा आदि गोष्टी हे मनोविकार असल्याचे सिद्ध झाले आहे. बर्‍याचदा एखाद्या व्यक्तीला भूतबाधा झालेली आहे, असे ठरवून मांत्रिकाकडे तिला नेण्यात येते. तेथे भूत उतरवण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीचा शारीरिक छळ केला जातो. कधी कधी ती व्यक्ती मृत्युमुखीही पडते. असे होणे हे सुसंस्कृत समाजासाठी एक लांछनच होय. भुतांचे अस्तित्वच नाही ती केवळ एक कल्पना आहे.